भारतीय राजमुद्रेत बदल केल्याच्या निषेधार्थ जन आंदोलनाचा निर्धार.
*आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने स्विकारलेले राष्ट्रीय प्रतिक सम्राट अशोकाची राजमुद्रा सध्याच्या धर्मांध केंद्र सरकारने छेडछाड करुन त्यात अनावश्यक बदल करून बुद्धांचा इतिहास नामशेष करण्याचा संतापजनक प्रकार चालू केला आहे. पुर्वी असणारी शांत, संयमी सिंहमुद्रा आक्रमक, हिंसात्मक, रागीट आणि भयानक स्वरुपात निर्माण करुन नवीन संसद भवनावर बसविण्यात येणार असून परवा या अक्राळविक्राळ हावभाव असलेल्या राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राजमुद्रेची विटंबना करण्याचा हा कुटील डाव आहे. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या निंदनीय घटनेला वेळीच विरोध करुन राष्ट्रीय प्रतिकाचे विद्रुपीकरण थांबवावे
तसेच सन २०१८मध्ये भिमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणार्या आंबेडकरी चळवळीतील निरपराध कार्यकर्त्यांवर शासनाने सुडबुद्धीने चळवळीचे खच्चीकरण करण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत, या सर्व कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष -संघटनांच्या आयोजित बैठकीत जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येठ नेते डी एस डोणे होते.
सुरवातीस निमंत्रक विद्याधर कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर सोमनाथ घोडेराव यांनी स्वागत केले.
या बैठकीत अँड इंद्रजीत कांबळे, प्रा. शहाजी कांबळे,सुभाष देसाई, प्रा. अशोक कांबळे, बाजीराव नाईक,रंगराव कामत , सुशीलकुमार कोल्हटकर सुधाकर माने, अँड तेजस पठाणे,बि के कांबळे, मच्छिंद्र कांबळे, चरणदास कांबळे, आर के कांबळे, टी एस कांबळे यांनी भूमिका मांडली.
या वेळी प्रमोद कदम, सुरेश सावर्डेकर, रणजित केळुस्कर, पंडित चोपडे, अमित मेधावी, आनंदराव कांबळे, अशोक हातकणंगलेकर, दादासो गायकवाड, सदानंद डिगे,सुरेश कांबळे, प्रविण आजरेकर, सर्जेराव फुले, दिलीप कांबळे, सिकंदर मधाळे, सखाराम कुरणे, दयानंद मालेकर,अनिल कुरणे, रघुनाथ कांबळे,
उपस्थित होते. शेवटी जयसिंग जाधव यांनी आभार मानले.