डॉ. राजेश नाईक यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त “85” वे रक्तदान
“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे “, या उक्तीला अनुसरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राजरत्न वाघमारे, डॉ. सौ. संगिताताई मेहता, डॉ. सौ. जयाताई सावरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री राहुल भोयर, सौ. वंदनाताई झाडे, सौ. गंधमालाताई गायकवाड यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, नागपूरच्या नियामक समिती तथा कार्यकारी समितीमधिल मा. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी तथा सदस्य, आखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे माजी कार्यकारीणी सदस्य तथा श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या “85” व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली.
या निमित्ताने श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदान का प्रमाणपत्र तथा स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना सन्मानित करण्यात आले.