‘कोल्हापूर प्रेस क्लब’ आणि ‘श्रम फाऊंडेशन’ यांच्या वतीने रविवारी आरोग्य – श्रम कार्ड शिबिर – वालावलकर हॉस्पीटल येथे आयोजन – रोटरी क्लब – जाधव ग्रंथालयाचे सहकार्य
कोल्हापूर, २१ जुलै - ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ आणि ‘श्रम फाऊंडेशन’ यांच्या वतीने पत्रकारांसाठी २४ जुलैला शिवाजी उद्यम नगर येथील वालावलकर रुग्णालय येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पत्रकारांसाठी आरोग्य - श्रम कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात श्रम कार्ड काढणे, डोळे-दात यांची पडताळणी, रक्तदान शिबिर, तसेच अन्य आरोग्य पडताळणी केली जाणार आहे. ‘श्रम कार्ड’साठी आधार कार्ड, तसेच बँक पास पुस्तक - नोंदणी भ्रमण ध्वनी आवश्यक आहे. तरी यांसाठी प्रेस क्लब येथील श्री. बकरे यांच्याकडे २३ जुलैअखेर नाव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष मोहन मेस्त्री, संचालक श्री. राजेंद्र मकाटे आणि श्रद्धा जोगळेकर यांनी केले आहे.
या शिबिरासाठी रोटरी चे डॉ. नासिर बोरडसवाला, डॉ. प्रवीण कुंभोजकर, सचिन मालू, क्रीडा संघटक श्री. काका पाटील, संतोष कुलकर्णी, जाधव वाचनालयाचे विजय जाधव ,फिरोज मुजावर , संदीप अथणे , सावली चे किशोर देशपांडे यांचे सहकार्य लाभले असून ते उदघाटन सत्रात उपस्थित राहणार आहे. या शिबीरात विरेंद्र वणकुद्रे - सह वैद्यकीय पथक पाहणी करणार आहेत तर जाधव वाचनालयाचे शहाजी पाटील हे श्रम कार्ड काढणार आहेत . तरी समस्त पत्रकारां नी यांचा लाभ घ्यावा असे आहवान संयोजक संस्थानी केले आहे .