हे पुस्तक नव्हे तर स्वरूप दर्शक आयना!
विंदा म्हणतात,दिशा बुडाण्या इतपत पाणी आहे पण बुडाताना धन्यता वाटावी असं कुठंही नाही!अशीच काहीशी सद्यस्थिती.
वर्तमानकाळात राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय,शैक्षणिक, आर्थिक अथवा धार्मिक… इत्यादी,अशा साऱ्याच स्थारावर तीव्र अधीपतन सुरु असताना. भारतीय मानवतावादी विचार संस्कृती मावळतीला निघाली आहे असं वाटत असताना त्याच मावळतीला दिशादर्शक तारा म्हणूनच मी, शिवाजी राऊत यांच्या “प्रत्यभिज्ञा ” या प्रस्तुत पुस्तकातील लिखाणाला मानेल.
आपल्याशी निगडित घडणाऱ्या साऱ्याच स्थरावरील घासराणीला केवळ एक “चिंतनशील शिक्षण” नामक धागाच तारक ठरेल हे सहज जाणीव करून देणारा वर्तमाणातच त्यावर त्यावर सक्षम कृतीची गरज आहे असे ठाशीवपणे सांगणारा समकालातील गहिरा वैचारिक लेखक म्हणूनच मी शिवाजी राऊत सरांचा उल्लेख करेल.संवेदनशील लिखाण कायमच पुढील पिढीला संचित म्हणून मिळत असते ते हे माझ्या पिढीसाठी संचित आहेत
जिथे आज तीस सेकंदाचे विडिओ बघून स्व मनोरंजन साधणारा रसिक वर्ग वाढत असताना.लिखाणात रंजकता निर्माण करून वाचकाला रोमँटिसाईझ भावनात गुंतवून शाब्दिक आफू न देता,
स्वतःच्या तत्वचिंतणावर विश्वास ठेवून सरळ, स्पष्ट, प्रसंगी कठोर बोलून स्वतःच म्हणणं अधोरेखित करणारे हे लेखन आहे असं मी म्हणेन.वाचून विचार करणारच वाचक लेखकाला ही अभिप्रेत आहे. काय समीक्षा होईल, किती खप होईल हे याची फिकीर लेखकाने नक्कीच केली नाही हे अगदी पहिली चार पाने चाळतानाच त्यातील निर्भीडतेतुन सहज लक्षात येते.
अज्ञानाची जाणीव करून देणारी कोणतीही गोष्टच ज्ञान असू शकते या बद्दल सजग करणारा हे लेखक पुस्तकाचा ऐकून ढाचा हा आपल्याला समोर आरसा म्हणून उभा करतात ज्यात आपल्याला आपल्याकडे पहिला लावतात. मानवी मनावर झालेले अमानवी बदल त्या आरशात दाखवून देतात. लिखाणातील काही भाग इतका स्पष्ट की, सारं मान्य होत त्या आरशात काही वेळाने आपले राजकीय धार्मिक संस्कारणातून अल्पवधीतच बनलेले आपलेच हिडीस स्वरूप पाहण्याची हिंमत ही होत नाही.
वाचावे का? अशा प्रश्नाशी येऊन थांबलेल्या नव्या पिढीला का वाचावे? याच उत्तर ही पुस्तकाच्या सुरवातीलाच मिळाले ज्याने त्याच पुस्तकाची पाने मी वाचक म्हणून सहजगत्या पलटत गेलो.सगळ्या व्याख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी राऊत सर, “शब्द हे प्रेरित अर्थासाठी वापरण हे विचारांचा आग्रह असतो!” असं म्हणताना शब्दांची नवी व्याख्या ते करून जातात.शब्दतुन वाक्याची शरीर रचना होऊन भाषेच व्यक्तीत्व बनते हे नकळत सांगून
भाषेवरचे विवेचन हे भाषाशास्त्रीय अंगाने न लिहिता ते भाषा व्यवहार अंगाने जास्त चर्चीले गेले आहे जे भाषा पंडित्या पेक्षा जास्त मानवी संवाद रूपाने भाषेची गरज काय? हे स्पष्ट करून मग भाषेच विश्लेषण करतात मग त्यासाठी
व्याकरण हे भाषेच शरीर बनवतं. गुलाब शब्द वाचताना त्याच्या सुगंधाचीही जाणीव व्हावी ती अशी सजग संवेदनशीलता मानवाला प्राप्त व्हावी व शब्दोशब्दि राहावी म्हणजे क्रूर शब्द उच्चरताना उच्चरकाला त्यातील अमानवी अर्थ बोध होईल अशी मनोमन इच्छा शिवाजी राऊत यांना असेल ज्यामुळे त्यांना अभिप्रेत आनंद निर्माण साक्षरता प्राप्त होईल असे जाणवते. शब्द राजकारण अर्थाचा गोंधळ माजवतात असं सांगताना समकाळात त्याचा राजकारण्यांनी सोयीने वापर केला आणि वेगवेगळे “नरटीव्ह सेट” करण्याचा प्रयत्न हे ते सांगायला चुकले नाहीत.
इंग्रजी भाषेला विरोध करताना मातृभाषा हीच ज्ञान भाषा आहे,असावी असा री ला री ओढणारी चर्चासत्रे सर्वत्र होत असताना आपल्याला मातृभाषेच तरी आपल्याला किती ज्ञान आहे असा मूलभूत प्रश्न विचारतात. खरं तर ऐकून पुस्तकात अनेक वाक्यनं नंतर येणारी प्रश्नचिन्हेच अधिक महत्वाची आहेत ही प्रश्नचिन्हे देऊन लेखक म्हणून काही विचारणा करतात, पुढे ते त्यावर वर विस्तारणे बोलतात त्यानंतर पुन्हा जाऊन प्रश्न वाचावा इतका तो दाखलपत्र वाटू लागतो. पुस्तकात अधिक संख्येने प्रश्नरूपी वाक्य ओघाने येतात. त्यातील काही वाक्यानं नंतरची प्रश्नचिन्हे ही त्यांनी वाचकांच्या मनात ठेवली आहेत हे त्या संबंधीत वाक्यात हरवलेल्या वाचकाला नक्की जाणवेल.मराठी भाषेतील सजीवतेत संत साहित्याने अधिक प्राण ओतले, त्याच भाषेची अवस्था वर्णन करताना संत तुकाराम आधारे ते “भाषा मरण पहिले म्या डोळा!”असं म्हणून एकाच वाक्यात आपण काय मराठी भाषिक म्हणून आपण काय केले आहेत हे सांगतात पण इथे मला शेकडो वर्षाच्या परंपरेला आपण दिलेली तिलांजली एकाच वाक्यात नमूद करणारी त्यांची लेखक म्हणून प्रतिभा किती उच्च आहे, हे वेगळे काय सांगावे.
पुढे जाऊन ते भारतीय शिक्षणातील “आपोआप वाद” असा नवशब्द निर्मितीने प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेला उपरोधी टोला ही लागावतात.
शिक्षणात “गुणवत्ता ” म्हणजे प्राप्त संधी त्यातून वर्चस्व प्रस्थापित व्हावे असे समाजाला वाटते का? असा कळीचा प्रश्न विचारून चांगळवादाने “गुणवत्ता” शब्दाची बिघडवलेली गुणवतत्ता अबोलपणे बोलून जातात. ओळीच्या मधलंही वाचावं याच वाचकाकडूनच प्रत्येक्षिक ते इथे करून घेतात.”सनातन क्षमा” प्रकरणात सनातनीवृत्तीची तर सोडा पुरोगाम्यांची ही परखड समीक्षा ते करतात. आणि इथेच लिखाण एकांगी आहे का शोधणाऱ्या समीक्षा साठीची ही आणि “प्रत्यभिज्ञा” या अद्वैतवादी दर्शनाचीही कसोटी हे पुस्तक पार करते तसेच पुस्तक शिर्षकाची समर्पकता पूर्ण होते.मग “नितीशून्य धर्म ” हा शब्द वाचकाला तो असेल त्या धर्माच्या तपासनीचा विचार करायला लावतात. मग आनंद निर्मितीला पूरक साक्षरता सहजतेतून येणाऱ्या समतेतच आहे असं वैश्विक शांतता कुठल्या मार्गाच शेवटचं ठिकाण म्हणून उंगली निर्देश करतात. वैयक्तिक असते ती भावना आणि सामूहिक असते ती सद्भवना हे सांगताना वैश्विक अहिंसेसाठी दोन्ही स्थरावरील सद्यस्थितीला मानसशास्त्रीय आवश्यक बदल आजाणतेपणी नमूद करून जातात. शैक्षणिक मानसशास्त्राचा तत्वचिंतक असण्याचा अविर्भाव न आणता अवघड संकल्पना सोपी करून मांडताना केवळ स्वतः मधला नितांत शिक्षक जागा ठेवणे हे कठीण काम ते सहज करून जातात. शिक्षक शब्दा वरून आठवले की, शाळेत बहुसंख्य विध्यार्थी साधारणपणे दहा, वीस, तीस………. करत करत ऐंशी, नव्वद…. शंभररर….. नंतर हुश होतात. असं शंभर पर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक ठेवणारा वाचक शिक्षक या पुस्तकाच्या शंभराव्या पानावर येतो तेव्हा “शिक्षक बुद्धिजीवी हवेत ” या प्रकारणाशी येऊन स्वतःच्याच मनात धाकधूकिची प्रचिती घेतील. ज्या बुद्धीजीवित्वाची राऊत सर मांडणी करतात त्यात आपण अनेक अंगाने किंवा कुठल्यातरी एका अंगाने बसत नाही हे जाणीवपात्र ठरतील.
संपूर्ण पुस्तकात पर्यावरण हा शब्दची अनेक ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे मग ती राजकीय पर्यावरण, धार्मिक पर्यावरण,भाषिक पर्यावरण असे अनेक पर्यावरण सह शब्द सापडतील. मानवाच्या सांभावतालातील विशिष्ट आवरणाला आपण त्या पर्यावरण नावाने ओळखतो पण ह्या व्याख्या निर्माण करणाराच त्या पर्यावरणाच्या केंद्रस्थानी असतो मग राजकीय, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक…अशा कोणत्याही पर्यावरणाच्या प्रदूषनाची जबाबदारी ही मानवानेच घ्यायला हवी हे ही जबादारीने सांगतात. हा पर्यावरण शब्द वापरून लेखक इथे त्याची व्याप्तीचा परीघ किती मोठा आहे हे सांगून त्यात झालेले वैचारिक प्रदूषण परिघाच्या आत येणाऱ्या घातक आहे हे सांगू इच्छितात.
कमी पृष्ठ संख्या मानाने लेखक अधिक गोष्टींना स्पर्श करून जातात आणि वाचकाला ही त्यांच्या प्रति अभिज्ञ करून जातात. पूस्तकाचे लेखक शिवाजी राऊत हे माहितीला माहित करून देणारा केवळ दुवा नाही तर साजगते बद्दल साजग करून वाचकाला स्वरूपा बद्दल प्रत्यभिज्ञा करतात.
असे बहूआयमी लेखन आमच्या पर्यंत पोहोचवले याबद्दल लेखक शिवाजी राऊत सरांचे मनपूर्वक अभिनंदन त्याच बरोबर सोईचे छापनाऱ्या प्रकाशकाचा यादीत न जाता अशा लिखाणाला वाचकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल प्रकाशक रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचे ही खूप आभार.
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर आशय संबंधित माझ्या एका रेखाटनाचा समावेश शिवाजी राऊत सरांनी केला त्याबद्दल ही त्यांचे खूप खूप धन्यवाद!
अमित दिलीप ढावरे
पाडेगाव,
ता.फलटण जि. सातारा
amitdhaware02@gmail. Com