हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम- एक दिवशीय प्रेरणा कार्यशाळा
डॉ बाबासाहेब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र नागपुर (mced) तर्फे आयोजित हाय टेक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम एक दिवशीय प्रेरणा कार्यशाळा सामाजिक न्याय भवन नागपुरला आयोजित करण्यात आली.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दिपप्रज्वलन व संविधान उद्देशिका वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बार्टी महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रचा लाभ घेवून आपला स्वतःचा उद्योग उभारणी करुण स्वतःच मालक बनावे. व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आपला उद्योग उभारणी साठी बार्टी व mced मदत करेल.असे मत प्रतिपादन केले.
कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी श्री. आलोक मिश्रा विभागीय अधिकारी नागपुर, प्रमुख उपस्थित श्रीमती कवाड़े मैडम संशोधन अधिकारी जा.प. समिति नागपुर, कार्यक्रमाचे आयोजक श्री हेमंत वाघमारे राज्य समन्वयक बार्टी व प्रकल्प अधिकारी/केंद्र प्रमुख mced उपकेंद्र हिंगणा (नागपुर), विषय तदन्य मार्गदर्शक श्री अशोक वठारे श्री आदर्श कांत , श्री.नितिन आवळे, श्रीमती सुजाता आवळे, श्री.अमोल रंगारी, तसेच हुदय गोडबोले समतादूत प्रकल्प अधिकारी नागपुर, श्रीकांत कुलकर्णी प्रकल्प अधिकारी उद्योग भवन नागपुर, सतीश सोमकुंवर समतादूत हिंगणा, आदी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत वाघमारे प्रकल्प अधिकारी/केंद्र प्रमुख mced यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश सोमकुंवर समतादूत हिंगणा तर आभार हुदय गोडबोले प्रकल्प अधिकारी नागपुर यांनी मानले. कार्यक्रमासाठी समन्वयक सुषमा भटकर संगीता ढोने, विपिन लाढ़े यांचे सहकार्य लाभले.