श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 672 वा
संजीवन समाधी महोत्सव साजरा
फोटो –
इचलकरंजी/प्रतिनिधी –
श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 672 वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमांनी साजराकरण्यात आला. संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी दुपारी 12 वाजता समाधी निरुपण सोहळा संपन्न झाला. सायंकाळी संपूर्ण शहरातून श्री संत नामदेव महाराजांच्या पालखीची दिंडी काढण्यात आली.
येथील संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 672 व्या संजीवन समाधी महोत्सवा निमित्त सोमवार 18 जुलैपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले होते. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंगळवार 26 रोजी हभप तानाजी पाटील कोंडीवडे (ता. आजरा) यांनी समाधी निरुपण सादर केले. सौ व श्री ओंकार विजय खटावकर आणि सौ व श्री ज्ञानेश्वर पिसे यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांची महाआरती करण्यात आली. सायंकाळी श्री नामदेव भवनपासून दिंडी काढण्यात आली. जनता बँक, महात्मा गांधी पुतळा, मंगळवार पेठ, नारायण टॉकीज, झेंडा चौक नाट्यगृह मार्गे ही दिंडी नामदेव भवन येथे आल्यानंतर नैवेद्य आरती करण्यात आली. या कार्यक्रमात श्री नामदेव समाज सेवा मंडळ, श्री संत नामदेव युवक संघटना, श्री नामदेव महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.