कबनूरमध्ये संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
कबनूर- (प्रतिनिधी चंदुलाल फकीर) येथील गावभागातील मंदिरात मंगळवारी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची 672 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पहाटे पोलीस नाईक सागर चौगुले व प्रमोद पाटील यांच्या हस्ते संत नामदेव महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर पूजा व आरती करण्यात येऊन पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी प्रमिला महाडिक भजनी मंडळाचे भजन झाले त्यानंतर संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पालखी व रथातून दिंडी काढण्यात आली. नामदेव मंदिरापासून निघालेल्या दिंडी मध्ये महिला वर्ग फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या. टाळ मृदंगाच्या निनादात व एकनाथ -नामदेव- तुकाराम नामाचा गजर करीत दिंडी परत मंदिरात आली. यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी उपसरपंच निलेश पाटील ‘प्रकाश पाटील नागप्पा यांच्या हस्ते आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दुपारी ह. भ. प. दीपक भोईटे यांचे कीर्तन झाले. नामदेव शिंपी समाज अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाडीक यांनी सर्व नियोजन केले होते. याकरता आप्पा गायकवाड,महावीर फरांडे, नामदेव सुतार, लक्ष्मण माडीवाळे, नारायण कोपर्डे,प्रभाकर जाधव आदींचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
कबनूरमध्ये संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
