महालक्ष्मी पत संस्थेच्या चेअरमन पदी पाटील तर व्हाईस चेअरमन पदी तिकोटी यांची बिनविरोध निवड
कोरोची
हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील श्री. महालक्ष्मी नागरी पतसंस्थेचे सन २०२२-२०२३ ते सन २०२७- २०२८ या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध होऊन निवडणूक अधिकारी मक्सुद जी.शिंदी यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड २६ जुलै रोजी झाली.यावेळी चेअरमन पदी शांतीनाथ भुपाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी इंद्रवदन मोहनेश्वर तिकोटी यांची बिनविरोध निवड झाली.नुतन चेअरमन पाटील म्हणाले की, गेल्या ३४ वर्षोत संस्थेने सभासदांचे हित लक्षात घेऊन त्यांना चांगल्या सुविधा पुरविल्या आहेत.ठेवीदारांची विश्वासहर्ता व कर्जदारांचे सहकार्य यामुळे संस्था नावलौकिकास आली आहे.त्यामुळे निवडणूकीची बिनविरोध परंपरा कायम ठेवली आहे.नवनिर्वाचित संचालकांचे सत्कार निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित संचालक. अशोक बोरगावकर, अशोक काणे ,निजाम सनदी, संतोष वाघेला, रत्नजीत बनकर, रंगराव शेंडगे, जगन्नाथ भोई, स्मिता पाटील व मान्यवर उपस्थित होते.आभार सेक्रेटरी महेश कडाले यांनी मानले.