मुंबई,ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ; सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देण्याबाबत आदेश

मुंबई,ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ; सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देण्याबाबत आदेश

मुंबई,ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

🎤सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देण्याबाबत आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

सर्विस बुक हे शिक्षकांचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांजवळ सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे असा आग्रह शिक्षक आमदार स्व. मोते सर नेहमी धरायचे अनेक संस्था व शाळांकडून सर्विस बुक ची दुय्यम प्रत देण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यावर मा. शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन सर्विस बुक व सॅलरी स्लिप मिळत नसल्याची तक्रार केली व निवेदन दिले. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. याबाबत शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनी याबाबत कार्यवाही करीत मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व ज्यु. कॉलेज यांना याबाबत आदेश दिले आहेत. आदेशाची कॉपी सोबत देत आहे त्याचे अवलोकन करावे. अशी माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *