डॉ.जे.जे. मगदुम इंजीनियरिंग कॉलेजला ए. आए. डेटा सायन्स व एम. सी. ए. या नवीन दोन कोर्सची मान्यता
जयसिंगपूर – येथील डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाला B. Tech कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग मध्ये “आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स” व Post Graduate करिता “मास्टर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशनस्” (MCA)या दोन कोर्सना नव्याने मान्यता मिळाली आहे, चालू शैक्षणिक वर्षांपासून विदयार्थ्यांना याचा लाभ घेता येईल अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
नवीन तंत्रज्ञानास अनुसरून कोणतेही काम करत असताना मानवाची जागा संगणकाने घेतलेली आपण पाहतोय. भविष्यात काम अचूक व कमी वेळेत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आणि त्यासाठी समाजात आर्टिफिशिएल इंटलिजन्सची मागणी वाढते आहे. नव्याने विकसित होणाऱ्या रोबोट टेकनॉलॉजि मध्ये याची मागणी आहे त्यासाठी संबंधित कोर्सचा फायदा विद्यार्थ्यांना होईल या उद्देशाने हा कोर्स आपण सुरु करत आहोत. तसेच भविष्याची दिशा ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा व ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षण घेता यावे यासाठी एम. सी. ए. हा कोर्स आपण सुरु करत आहोत अशी माहिती डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी दिली. महाविद्यालयातील सर्व अत्याधुनिक प्रयोगशाळा, साधन सामग्रीचा, डिजिटल ग्रंथलयाचा,प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव असलेल्या शिक्षकांचा लाभ निश्चितच विद्यार्थी व पालकांना होईल असा विश्वास त्यांनी दिला.
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील ३३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, सर्व साधारण ८० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरी संधी आणि यू. पि. एसी., एम. पी. एस. सी. मध्ये कार्यरत असलेल्या विदयार्थ्यांची संख्या पाहता आपल्या महाविद्यालयाचे सर्वोत्तम प्लेसमेंट हे उद्देश असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्याचे रजिस्ट्रार श्री.एस. टी. जाधव यानी केले आहे.
महाविद्यालयाने पालक विद्यार्थी सोईस्तव कॉलेजमध्ये मोफत प्रवेश माहिती कक्ष सुरु केला आहे अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.
डॉ.जे.जे. मगदुम इंजीनियरिंग कॉलेजला ए. आए. डेटा सायन्स व एम. सी. ए. या नवीन दोन कोर्सची मान्यता
