अशोक स्तंभ बलणारे संविधान का बदलणार नाहीत ?
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. 9762636662
देशात एकहाती सत्ता दिल्यास हुकमशाही येण्यास वेळ लागत नाही, असे अनेक जाणकारांनी म्हटले आणि लिहून ठेवले आहे. त्यात विरोधी पक्ष जर निद्रिस्त अवस्थेत असेल तर देशाचा व देशातील प्रतिकांचा सत्यानाश होण्यास वेळ लागत नाही. हे आज तरी तंतोतंत लागू पडत कारण देशात जे सरकार आहे ते इव्हीएम मशिन्सची पैदाईश असून काँग्रेसने केलेल्या कारनाम्याची ही लोकांसमोर आलेली आपत्ती आहे ? अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही. कारण हे दोन्ही पक्ष ‘मिल बाटके खानेवाले और लोगों के बहोत बहोत चाहनेवाले’ पक्ष आहेत. त्यामुळे मा. कांशीराम म्हणत की, काँग्रेस आरएसएस की, माँ है !, त्याच आरएसएस निर्मीत भाजपची पिलावळ सत्तेच्या मस्तीने नवनवे उपद्व्याप करताना दिसत आहे. हा उपद्व्याप म्हणजे राष्ट्रीय चिन्हाची हेळसांड हे संघ धार्जिणे लोक करत असताना मात्र आमचा बहुजन समाज आपली बायको लेकरं अन् बायकोची साडी यापलीकडे समाजात काय चालल हे पहायला तयार नाही, ही खुप मोठी शोकांतिका आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते नवीन संसद भवन येथे बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण झाले. तेव्हा तो स्तंभ पाहून मोदी सरकारला असा अक्राळ विक्राळ स्तंभ उभारून नेमके काय साध्य करायाचे आहे ?असा प्रश्न अनेकांना पडल्यामुळे यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादात अनेकांच बेगडी प्रेम व्यक्त होताना दिसत आहे. या वादात अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेत एक ट्वीट करत म्हणतात की, नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील आहे. आणि सिंहाला दात असतील तर तो दाखवणारच तो स्वातंत्र्यातील सिंह आहे. गरज लागली तर तो चावेल सुद्धा असं म्हणत त्यांनी या सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रेची पाठराखण करणारी भूमिका घेतली आहे. त्या दिसण्यास व बुद्धीने अर्धचंद्र असलेल्या अनुपम खेर यांना विचाराव वाटत की, आज जे राष्ट्रीय चिन्हाची हेळसांड करत आहेत ते स्वातंत्र्य लढ्यात सामिल होते का ?ज्यांना धमन्यात केवळ षंढत्वाच रक्त वाहत आहे त्यांच्याकडून स्वातंत्र्याच्या गप्पा झाडणे म्हणजे सत्तेत बसलेल्या भाजपच्या तृतीय पंथीयांकडून लहान मुलाला पाजण्यासाठी दुधाची अपेक्षा ?करण्यासारखे आहे.
यासंदर्भात, संजय सिंह यांनी एक ट्विट शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. मला १३० कोटी भारतीयांना विचारायचे आहे की, राष्ट्रीय चिन्ह बदलणाऱ्यांना ‘देशविरोधी’ बोलायचे की नाही ? मी १३० कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांना ‘देशद्रोही’ बोलावे की नाही ?असा त्यांनी प्रश्न केला. (सकाळ १३ जूलै २०२२) तणमूल काँग्रेसचे खा. जवाहर सरकार यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्र सोडले. “मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय चिन्हाचा, भव्य अशोक स्तंभाचा अपमान केला आहे. मूळ अशोक स्तंभ शांत, संयमी, सुंदर आणि डौलदार आहेत. तर मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ रागीट, असुरक्षित हिंसेचे प्रतीक वाटत आहे. त्यामुळे नवीन इमारतीवरील अशोक स्तंभ ताबडतोब बदलावा अशी मागणीही त्यांनी केली. (लोकसत्ता १२ जूलै २०२२) तसेच संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी साहेब तुम्ही नवी संसद नवीन अशोक स्तंभ बनवणार पण तुम्ही नवीन भारत बनवू शकत नाहीत. तुम्ही धर्मांध व जातीयवादी भारत बनवू शकता पण संविधानाचा जागर करू शकत नाहीत. नवीन संसदेवर अशोक स्तंभ बसवला गेला त्यातील सिंह उग्र हिस्त्र डरकाळी फोडणार बसवला त्यामुळे मित्रांनो आज यांनी अशोक स्तंभ बदलला उद्या भारतीय संविधान बदलतील. जणू काय मोदींना हा देश गिळून टाकायचा आहे अशी भावमुद्रा त्यांनी सिंहाची केली आहे असे म्हणाले. https://youtu.be/i1Em2elTsRशहY
ह्या संघोट्या पिलावळींनी दिल्ली येथिल जंतर मंतर येथे संविधान दहन केले त्याच वंशाच्या पिलावळीच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत त्यामुळे अशा विकृतींचा नायनाट करायचा असेल तर केवळ बँलेट पेपरची मागणी करून त्या मतदानाच्या माध्यमातून यांचा कृष्णा भास्कर केल्याशिवाय पर्याय नाही.
भारताचे राष्ट्रीय प्रतिक म्हणजेच आपली राजमुद्रा, सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच घेतलेली आहे. सारनाथ येथील स्तंभ खूप प्रसिद्ध आहे. हा अशोक स्तंभ मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक सम्राट अशोक यांनी निर्माण केला आहे. त्याशिवाय त्यांनी भारतात असे अनेक स्तंभ निर्माण केलेले आहेत. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून हे स्तंभ खूप प्रसिद्ध आहेत. बौद्ध धर्माची अखंडतेचे प्रतिक म्हणून हे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. या स्तंभावर चार सिंह आहेत. हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल इ. प्राण्यांचे चित्र कोरले आहे. स्तंभावर एक चक्र आहे या चक्राला अशोक चक्र असे संबोधतात. स्तंभावर कमळाचे फुल देखील कोरलेले आहे. यात जे सिंहाचे प्रतिक दाखवले आहे तो सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. हे सिंह गर्जना करत आहेत असे दर्शविल्या गेलेले आहे. ही गर्जना म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार असा अर्थ मानल्या जातो. तसेच बौद्ध धर्मात सिंहाला खूप महत्वाचे मानले गेले आहे. तर घोडा म्हणजे गती आणि उर्जेचे प्रतिक आहे तसेच बैल म्हणजे कठोर परिश्रम, मेहनत आही स्थिरतेचे प्रतिक आहे. तर हत्ती म्हणजे अफाट सामर्थ्याचे प्रतिक आहे. या प्राण्यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेले एक चक्र देखील आहे. या चक्राला अशोक चक्र म्हणतात. चक्रातील २४ आरे मनुष्यातील २४ गुणांचे वर्णन करतात. काही इतिहासकारांच्या मते हे २४ आरे दिवसातील २४ तास दर्शवितात. म्हणून या चक्राला ‘समय’ चक्र देखील म्हणतात. त्यामुळे सांगावं वाटत की, देशात नथूरामचा जागर करणारे विदेशात फिरताना बुद्धांच नाव घेऊन फिरतात, कारण ह्यांच्या हेडगेवार, गोळवलकर, शामाप्रसाद मुखर्जी, सावरकर गोडसे यांना देशाबाहेर फिरस्ती श्वास देखिल ओळखत नाही. बाहेर ओळखण्यासाठी कार्य म्हत्वाच आहे. ह्याच कार्य पृष्ठभाग थंड करणे आणि करून घेणे त्यापलीकडे ह्या षंढांचे काय काम आहे ?
नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या आवारामध्ये केलेल्या पूजेवरुनही आक्षेप घेत यामुळे भारताची सर्व धर्मसभावाची भूमिका यामधून दिसून येत नसल्याची टीका केली आहे. (लोकसत्ता १२ जूलै २०२२) संसदेच्या नवीन इमारतीच्यावर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करतेवेळी प्रधानमंत्री महोदयांनी पुजेचा घाट बांधण योग्य आहे का ?त्यांनी खुशाल काकड आरती माकड आरती करून पुजा करत बसावी त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही पण जर ते संविधानिक पदावर बसून असले फडतूस चाळे करणार असतील तर आम्ही त्याचा निषेध का म्हणून करू नये ?मा. नरेंद्र मोदींनी आपण संविधानीक पदावर आहोत याच भान ठेवल पाहीजे. पण, ज्यांच्या मस्तकाला रेशिमबागेचा विषाणू ढसला आहे. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आहोत ? मोदींच्या ह्या गैरवर्तनुकीमुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत त्यात एमआयएमचे अध्यक्ष खा. असादुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करत म्हटले की, संविधान आपल्या संसदेच्या, सरकारच्या आणि न्यायव्यवस्थेच्या शक्ती एकमेकांपासून वेगळ्या ठेवते. सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीच्यावर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करणं योग्य नाही, पंतप्रधानांनी सर्व संसदीय नियमांची पायमल्ली केली आहे तर लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभा ही सरकारपेक्षा गौण नाहीय असही ते म्हणाले. तर सीपीआय (एम)चे नेते सिताराम येच्चुरी हे म्हणाले की, पंतप्रधानांनी नवीन संसदेच्या इमारतीवर राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करतेवेळी पंतप्रधानांनी पूजा केली. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीयाला त्यांच्या विचारणीनुसार धार्मिक मान्यतांवर विश्वास ठेवण्याचा अधिकार आणि संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र त्याचवेळी संविधानाने सरकारचा कोणताही धर्म नसतो असं स्पष्ट केलंय त्यामुळे हे संविधानातील नियमांचं उल्लंघन आहे. संविधानात लोकशाहीच्या तिन्ही वेगवेगळ्या तत्वांना वेगळं स्थान आहे- कार्यकारी (सरकार), विधिमंडळ (संसद आणि राज्यांच्या विधानसभा) आणि न्यायपालिका. तसेच काँग्रसेचे नेते आणि प्रतोद मणिकम टागोर यांनीही ट्विटरवरुन म्हटले की, माननिय अध्यक्ष मोहोदय, संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात. इथं विरोधी पक्षाचे नेते कुठे आहेत ? माझ्या मते हे काही भाजपाचं कार्यालय नाही. (लोकसत्ता १२ जूलै २०२२)
त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटत की, भाजपची सत्ती ही देशातील केवळ ३३ टक्के लोकांची पसंती आहे बाकी ६७ टक्के लोकांना ही मनुवादी व्यवस्था नको आहे. ह्या लोकांना सांगावं वाटत की, देशाच जे मानाकनं अशोक स्तंभ यात जस ते छेडछाड करू शकतात तसेच ते तुमचे मुलभूत हक्क म्हणजे भारतीय घटनेचे कलम १९ मध्ये जो बोलण्या लिहण्याचा अधिकार दिला आहे त्यात बदल करू शकतात ?करण संसदेतील भाषणात अनेक शब्दांवर अनेक निर्बंध या मुनूच्या व्यवस्थेने घातले आहेत. त्यामुळे वेळीच डोळे उघडा अन्यथा तुम्ही कस रहाव कस आणि किती बोलव याची नियमावली रेशिमबागेच्या मस्तकातून निघाल्यास नवल वाटू देऊ नका. तेव्हा अजून वेळ बाकी आहे ही मनुवादी व्यवस्था पायदळी तुडवायची असेल तर त्यावर एकमात्र उपाय म्हणजे इव्हीएम बंदीसाठी जनांदोलन उभारून मतदानासाठी केवळ बँलेट पेपरचीच मागणी करा. तुमचे हक्क अधिकार हा माणूस कधीच वाचवू शकणार नाहीत ते वाचवायचे असतील तर त्यासाठी आधी बँलेट पेपरवर सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या पाहीजेत. तेव्हा उठा संघर्षाची तयारी ठेवा. कारण संघ धार्जिणे लोक ज्यांनी आज अशोक स्तंभ बदलला ते उद्या संविधान का बदलणार नाहीत ?त्यामुळे
ही मनुची व्यवस्था पायदळी तुडवा, त्यातच तुमच भल होणार आहे. अन्यथा तुमचा आणि सर्व समाजाचा सत्यानाश तर अटळ आहेच.