साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
अण्णा, लाखो पदव्यांची
विद्वत्ता आली कुठून
शिक्षण फारसं नसताना
साहित्यसंपदा कशी झाली लिहून
मानुनी गुरु बाबासाहेबांना
साकारले लोक साहित्य
साध्या सोप्या शब्दात
दावले जीवनाचे हित…
लावणी,पोवाडा माध्यमातून
केली लोक जागृती
सत्तावीस पुस्तकांमधूनी गातो
फकिराची महती…
चाळीत राहताना सुद्धा
कशी लागली आस
पोटाचा प्रश्न सुटला नव्हता
कसा मिळाला घास…
कधी मिळाला वेळ तुम्हाला
करण्या साहित्य लिखाण
सारे काही मिळाले आम्हा
परी राहिलो कोरडे पाषाण…
भीमरावांचे स्वप्न पूर्ण करण्या
घातले बदलाचे घाव
सवलती घेऊन देखील आम्ही
घेत नसे नाव…
केले बंदिस्त विचारधारा
जातीच्या कुंपणात
माजलो,मातलो आम्ही
अण्णा, अडकलो धर्मात…
खरे सांगू अण्णा आम्ही
घेतला नाही एक ही गुण
सारे जवळ असतानाही
शोधले पूजले पुराण पाषाण…
बदल आमच्यात करण्यासाठी
घालावा डोक्यात घाव
सवलती संपल्यावर
वर्मी बसेल घाव…
लढण्याची जिद्द द्यावी
असे व्हावे प्रयत्न
पुन्हा एकदा यावे अण्णा
घेऊनी साहित्य रत्न…
डॉ.योगेश साळे
लेखक,कवी,साहित्यिक, प्रवचनकार
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद,कोल्हापूर
मो. 7719986661