संजय राऊत पुनश्च इडी फेर्यात!
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
संजय राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू झाली आहे. सात जनाचे पथक आज सकाळीच संजय राऊत यांच्या मुंबईच्या घरी पोहचले. शिवसेनेच्या नेते खासदार संजय राऊत यांना मुंबई गोरेगाव येथील पत्राचा येथील गैरव्यवहारात संदर्भात ईडीने नोटीस बजावली होती अनेकदा नोटीस बजावून सुद्धा संजय राऊत चौकशीला गेले नव्हते. यामुळे आज सकाळीच ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील गडावर धाड टाकली. यापूर्वीही संजय राऊत यांच्या अलिबाग येथील मालमत्तेवर इडीने टाच आणली होती.
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ प्रकल्प अनेक वर्ष रखडलेला आहे. आणि या प्रकल्पाबद्दल महाराष्ट्रातील दोन नामवंत पत्रकार युवराज मोहिते आणि पंकज दळवी यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही पत्राचाळ लवकरच टाँवर टोलेजंग इमारतीत रूपांतर होणार होती. आणि या पत्राच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची बातमी यापूर्वी आली होती. विकासक व संजय राऊत यांच्यातील व्यवहार संशयास्पद होता अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
संजय राऊत यांची चौकशी ही आकसाने केली आहे. केवळ शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेना नेता म्हणून त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा व6बळाचा वापर करून च ससेमिरा लावून संजय राऊत यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप शिवसेनेकांनी केला आहे. त्यांच्या समर्थकांनी घराजवळ येऊन घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एक महिना अधिक काळ लोटला गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी म्हणजेच शिंदे गटातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर प्रखर टीका केली होती. असे म्हटले जाते की संजय राऊत यांच्या अतिरेकी वागण्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली आहे. आणि जर संजय राऊत यांनी तोंड बंद केलं नाही तर शिवसेनेत उरलेसुरले नेतेही शिवसेना सोडून जातील असे भाकीत शिंदे गटातील आमदाराने केले. नुकतीच संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे आणि या वायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये अत्यंत शिवराळ भाषा वापरली गेली आहे आणि यामुळेच संजय राऊत आणि चौकशी होऊन त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही संजय राऊत यांच्याघरावर ईडीचे धाड पडली होती. त्यावेळी देशातील महत्त्वाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना त्रास देत आहे याची कल्पना पंतप्रधानांना दिली होती. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त विधान, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा रखडलेला प्रश्न, इडी सारख्या तपास यंत्रणेचे शिवसेनेतील नेत्यावर दबाव अशा प्रकारच्या वातावरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यपालावरती आपल्या ठाकरे शैलीत तोफ डागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे या सर्वांनीच महाराष्ट्रातील राज्यपालांवरती टीका केली आहे राज्यातील कारभार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हाकत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत राज्यपालांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा विकास घडवण्यात राजस्थानी व गुजराती लोकांचा हात असताना इडीच्या धाडी मात्र मराठी लोकांवरती का पडत आहेत? असा प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत