विदर्भात निघणार 1 आँगस्टला मंडल यात्रा,7 आँगस्टला नागपूरात समारोप
-युवक,विद्यार्थ्यामंध्ये अधिकार आणि कर्तव्याप्रती करणार जागृती
नागपूर: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघणार आहे.ही यात्रा येत्या सोमवारला 1 आँगस्टरोजी नागपूरातील सविंधान चौकातून रवाना होणार आहे.या मंडल यात्रेला 1 आँगस्टरोजी सकाळी 11 वाजता माजी खासदार डाॅ.विकास महात्मे,विधानपरिषद आमदार अभिजित वंजारी,विधानपरिषद आमदार डाॅ.परिणय फुके ,जेष्ठ मार्गदर्शक नागेश चौधरी,सदाशिव हिवलेकर,प्रा.दिवाकर गमे,प्रा.रमेश पिसे,संजय शेंडे,प्रभाकर मांडरे,प्रदिप गायकवाड,प्रा.नामदेव राऊत,प्रा.ज्ञानेश वाकुडकर,श्रावण फरकाडे,मोतीलाल चौधरी,कृष्णाजी बेले,संध्या राजुरकर,वंदना वनकर,मनोज चव्हाण,अ्रड.अंजली साळवे,अर्चना कोठेवार,विजय बाभुळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हि मंडल यात्रा १ ते ७ ऑगस्ट दरम्यान भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर,यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात पोचणार आहे.या जिल्ह्यात रॅली आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योती आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना तसेच यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी आज परिस्थितीत शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.यात्रेचा समारोप सेवादल महाविद्यालय सक्करदरा(नागपूर)च्या सभागृहात रविवार 7 आँगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे राहणार आहेत.तर स्वागताध्यक्ष म्हणून संजय शेंडे राहणार आहेत.या यात्रेच्या यशस्वीतेसाठी ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच,संघर्ष वाहिनी,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संविधान मंच, स्टु़डटंस राईटस असो.सेल्परिसपेक्ट मुव्हमेंट,भोयर पवार महासंघ,सर्व समाज ओबीसी मंच,आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनांचा सहभाग राहणार आहे.
बैठकीत सर्व समाज संघटनांनी ओबीसी , एन.टी., व्हि.जे.एन.टी. , एस.बी.सी. यां ओबीसी प्रवर्गातील नागरीकांना तसेच बहुजन समाजासाठी सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना या यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोर्राम,ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे,संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे,ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर,सेल्परिस्पेक्ट मुवमेंटचे बळीराज धोटे,प्रा.डहाके,प्रा.विलास काळे आदींनी केले आहे.