माझा देश म्हणजे जगण्याची परवानगी?
((राईट टू लिव्ह ऐवजी राईट टू लायसन))

माझा देश म्हणजे जगण्याची परवानगी?<br>((राईट टू लिव्ह ऐवजी राईट टू लायसन))

माझा देश म्हणजे जगण्याची परवानगी?
((राईट टू लिव्ह ऐवजी राईट टू लायसन))

जगण्याची परवानगी म्हणजेच लायसन टू लिव्ह जगण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू लिव्ह
निवडीचा अधिकार म्हणजेच राईट टू चॉईस
देश नसण्याचा अधिकार म्हणजे नेशन रजिस्टर सिटीजनशिप हे सर्व जगण्याचा अधिकार उध्वस्त करणारे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले जागतिक व भारत देशिय कायदे आता विरोधाच्या आवाजाला संपवून टाकत आहेत असहमतीचा अधिकार हा जगण्याचा अधिकार आहे आणि परवानगीचा अधिकार हा जगणे नाकारण्याचा अधिकार आहे आमचे जगणे हे इतरांच्या मेहेरबानी इच्छेवर जेव्हा अवलंबून असते तेव्हा मरण स्वस्त होत राहते भारतीय लोकशाहीचा मरण स्वस्त काळ हा जवळ आला आहे इथे नागरिक नाहीत परंतु देश आहे विद्यापीठे आहेत परंतु विद्यार्थी नाहीत शासन आहे परंतु कारभार नाही हिंसा रोखणारे कायदे आहेत परंतु अहिंसा नाही धर्म आहे परंतु धर्माचरण नाही बुद्धिवाद आहे परंतु हृदय भाऊ क ता नाही असा देशाचा प्रवास जगण्याची परवानगी देणारे अधिकार स्वतःकडे घेऊन पुढे निघाला आहे हिंसा हेच वर्तमान निर्माण झाले आहे भूक आणि अत्याचार हेच पर्यावरण तयार झाले आहे अशा या देशात इतरांच्या जगण्याच्या अधिकार नाकारण्याचा उनुमादी विचार येतो कोठून याचा शोध घेण्याची सुरुवात कलाक्षेत्रात झाली आहे भारतातील कलाक्षेत्र हिंसा आणि भय यांनी व्यापलेले आहे

विचार करणारे लोक हे संपवले पाहिजेत कलेतून संदेश देणारे लोक संपवले पाहिजे स्तुती न करणारे लोक संपवले पाहिजेत विरोध करणारे लोक नष्ट केले पाहिजेत दुय्यमत्व न स्वीकारणारे लोक त्यांचा जगण्याचा अधिकार नाकारला पाहिजे शोषण आणि अत्याचारला विरोध करणारे लोक यांना तुरुंगात कायम ठेवले पाहिजे गुन्हेगारी आणि षडयंत्र उघड करणारे माध्यमे आणि अविष्कार स्वातंत्र्याचे बुलंद आवाज चिरडले पाहिजेत

आमचे प्रभुत्व आणि श्रेष्ठत्व आणि रक्त व वर्ण अभिमान
हे मान्य करा आम्ही कपट व हिंसा वापर करून ही व्यवस्था कायम आमच्या हातात ठेवू शकतो आम्हास कोणी रोखू शकत नाही हे आमचे सामर्थ्य आहे हे सामर्थ्यच आम्ही सतत वापरून विरोधी विचार नष्ट करणार विरोधी व्यक्ती नष्ट करणार निसर्ग संपदा आम्ही हवी तशी वापरणार आणि निर्मम शोषण निर्मम लूट करणार ही नु अंश अत्याचारी प्रवृत्ती हे आमचे दैनंदिन वर्तन आहे समाज अस्वस्थ करणे हे सहज शक्य असते भयग्रस्त समाज हा नियंत्रित करणे सोपे असते भरडलेला समाज हा अत्याचाराला सतत बळी पडतो तो न्याय मागण्याच्या लढ्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही न्याय मागणारे सर्व प्रकारचे लढे हे राष्ट्र नावाच्या प्रतीकाच्या विरोधात आहेत हे आम्ही ठरवू शकतो राष्ट्रभक्ती हे आम्ही तयार केलेले हिंसा राजकारणाचे कथानक आहे राष्ट्रभक्ती ही इतरांनी करायची असते राष्ट्रभक्तीच्या निकषांना इतरांनी पात्र ठरायचे असते त्याला राष्ट्रीय एकजूट म्हणायचे असते त्याला राष्ट्रभक्ती म्हणायचे असते त्याला देश प्रेम म्हणायचे असते शोषणाच्या विरोधात न्यायाच्या मागणीसाठी गरिबांच्या बाजूने उभे राहणारे पर्यावरण व निसर्ग वाचवणारे हे या देशाचे शत्रू आहेत भ्रष्टाचाराला विरोध करणारे हे राष्ट्र द्रोही आहेत हे सर्व आम्ही गृहीत धरून पुढे निघालो आहोत आम्ही आता लायसन टू लिव्ह म्हणजेच कोणाकोणाच्या जगण्याचा अधिकार ठरवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे त्यामुळे जनसामान्यांच्या जगण्याचा अधिकार हा जरी आता घटनात्मक असला तरीही तो द्यायचा किंवा नाही हे आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे देशद्रोही पण राष्ट्रविरोधी या गुन्हेगारी कारणांच्या खाली हव्या त्या व्यक्तीने जनसंमुहांना आम्ही आता अडकवत राहणार आम्ही विचार नष्ट करणार आमच्या हिंसा व उनवादी वर्तनाला पाठिंबा देणारे समर्थक आम्ही तयार करणार की जे सतत शोषणाला बळी पडत राहतील आक्रोश रक्तपात व वाट्याला आलेली हिंसा हे जीवन मानून जगत राहतील असे एक देशी वर्तमान आम्ही तयार करणार आहोत आम्ही इतिहास नाकारतो योगदान नाकारतो आम्ही कायदे नाकारतो आम्ही स्वातंत्र्य नाकारतो आम्ही गर्दी आणि जमाव तयार करतो गर्दी आणि जमावांच्या हातात आम्ही हिंसेची शस्त्र देतो आणि तेच देश चालवतात त्यांना आम्ही अप्रत्यक्ष चितावणी देतो असा कोणीही आरोप करू शकत नाही कायदा त्याचे काम करतो आहे असे आम्ही सत्य कथन करीत असतो
लेखक कवी चित्रकार मूर्तिकार पत्रकार साहित्यिक विचारवंत अर्थतज्ञ मानवी हक्काच्या लढ्यातील कार्यकर्ते विधीतज्ञ हे सर्व भारताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करते पूर्वी होते आता त्यांच्या विरोधाचा आवाज उमटला तर आम्ही त्यांच्या जगण्याचा अधिकार नष्ट करू शकतो असे भय व अंधकार पर्यावरण म्हणजे आमची राष्ट्रभक्ती होय
देश आहे परंतु नागरिक नाही देश आहे परंतु विरोधी विचार नाही देश आहे जगण्याचा अधिकार नाही देश आहे अहिंसा नाही देश आहे शांती सद्भाव नाही देश आहे भूक निर्मूलन नाही देश आहे अभिव्यक्ती नाही देश आहे न्यायाचा आक्रोश नाही देश आहे समृद्ध पर्यावरण नाही देश आहे सांस्कृतिक सद्भाव नाही देश आहे बहु संस्कृतिक बंधुभाव नाही असा एक आमच्या स्वप्नातील सूड आणि हत्या करीत पुढे निघालेला देश आहे हा देश कला विरोधी आहे हा देश विचार विरोधी आहे हा देश विरोधी असहमतीच्या अधिकाराच्या विरोधात आहे

आम्ही सर्व सहमतीचे भारतीय नागरिक आहोत आम्ही कलावंत आहोत आम्ही पत्रकार आहोत आम्ही अभिव्यक्ती आणि जगण्याचा अधिकार सिद्ध करत पुढे जात आहोत परंतु आमच्या जगण्याचा अधिकार हा परवानगीचा अधिकार या नव्या कुटील कायद्यातून आम्ही निर्माण केला आहे त्याचे भले नाव आयडी असेल त्याचे नाव भारतीयतत्व असेल?
जगभर अभिव्यक्ती आणि जगण्याचा अधिकार यांचा संघर्ष हा राजकारण्यांच्या निर्मूल सत्तावादाने उध्वस्त केला जात आहे सत्ता ही हिमसेने पुढे जाते अभिव्यक्ती आणि जगण्याचा अधिकार हा स्वातंत्र्याच्या पर्यावरणातून सशक्त होतो हे जगाच्या प्रवासातील खोटे ठरणारे आजचे वास्तव आहे जगातील सत्ताधीश शोषण आणि हिंसा आणि कपटी यांच्या आधारे आपली सत्ता मांड विचारसरणी उध्वस्त करीत राज्यव्यवस्था नाममात्र ठेवीत पुढे निघालेल्या आहेत भारत हा त्यातीलच एक स्वातंत्र्याचा मातृभूमी असलेला देश आहे असे गौरव आणि म्हटले जाते परंतु पुन्हा हा देश वंश आणि सूड
या सनातन हिंसा ने निवांच्या आधारे पुढे निघाला आहे या त्याच्या मार्गात कला साहित्य हे आपल्या अभिव्यक्तीच्या आधारे जनप्रबोधन करू पाहते आहे त्यासाठी हम सब सहमत है या नावाने सर्व प्रकारे अभिव्यक्त होत आहेत
स्वातंत्र्याची 75 वर्षे ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे राष्ट्रभक्ती ही आत्मपरीक्षणाच्या आड येता कामा नये राष्ट्र निर्माणच्या बांधणीच्या दृढ संकल्पनांचा प्रयत्न करणे हा स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा महोत्सव आहे हा निव्वळ घोषणांचा काळ नाही काय कमावले काय गमावले हे सतत तपासणे आणि चुका कमी करणे आणि सुधारणांच्यासाठी सहमती सहयोग सहकार्य आणि सहप्रवास करीत पुढे जाणे म्हणजे स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव होय हा देश नागरिकांच्या शिवाय असू शकत नाही शांती सदभावाच्या शिवाय असू शकत नाही सांस्कृतिक सदभावाच्या शिवाय निर्माण होऊ शकत नाही जगण्याच्या अधिकार नाकारून स्वातंत्र्याचा मृत महोत्सव साजरा करणे ही या देशाच्या प्रत्येक नागरिकाची घोर फसवणूक आहे अहिंसा निर्माण करणे बंधुभाव प्रस्थापित करणे. ऐक्य निर्माण करणे सुसंवाद आणि सह अस्तित्व हे जगण्याचे निकष बनवणे हे भारतीय जनप्रवासाचे टप्पे आहेत अजूनही गाठण्यात भारताला यश आलेले नाही द्वेष सूड तुच्छता आणि जगण्याचा अधिकार नाकारणे हे मानवी विकार हे भारताचे वर्तमान विषारी प्रबोधन आम्ही तयार करीत नाही ना असे प्रश्न या देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला जेव्हा विचारेल तेव्हा हा देश सत्ता उनवादाच्या अंतिम उद्दिष्ट पासून मानवी सभ्यता व स्वातंत्र्य व जगण्याचे अधिकार हे संरक्षित करण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने चालू लागेल त्यासाठी या देशातील विचार कला सृजन संशोधन पारदर्शकता आणि जावदायित्व या मूल्यांच्यासाठी अथक प्रयत्न करणारे असंख्य नागरिक हेच अमृत महोत्सवाचे खरे भाष्यकार ठरतात
हिंसा विचार नष्ट करते हिंसा प्रबोधन नष्ट करते हिंसा संवाद नष्ट करते हिंसा सहमती नष्ट करते हिंसा संघटित प्रयत्न रोखते हिंसा संकल्प आणि उद्दिष्टे ठेवू नका या प्रकारची भय अवस्था निर्माण करते आज भारताचे राजकीय पर्यावरण हे देशाचे सत्ता पर्यावरण आहे पण तो देश नाही इथल्या बहु संख्यांक जनसमुहाचे स्मरण आणि विस्मरण हे सत्ता केंद्रित झाले आहे त्यामुळेच राष्ट्र निर्माण आणि अमृत महोत्सव याचा संबंध जोडून या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या वर्तनातील सुधारणा वादाची नितांत गरज प्रतीत व्हायला हवी ती वर्तनात यायला हवी तसेच सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत हे प्रयत्न झाले तरच हा देश नागरिकांच्या शिवायचा देश या अवस्थेपासून रोखता येईल इथे देश आहे परंतु नागरिक नाहीत हा देश आहे परंतु इथे स्वातंत्र्य नाही हा देश आहे परंतु इथे अभिव्यक्ती नाही हा देश आहे परंतु शांती आणि सद्भाव नाही अशी अवस्था येऊ द्यायची नसेल व इतरांच्या जगण्याचा अधिकार शिरसावंद्य मानून हा देश पुढे जायला हवा तरच शिक्षण क्षेत्र म्हणजे सत्यानास क्षेत्र हे होऊ द्यायचे नसेल तरच धैर्य संघर्ष हेच मार्ग सामूहिकपणे देश वाचवण्यासाठी स्वीकारावे लागणार आहे साहित्याची लाचारी अभिव्यक्तीतील हिसा सत्ताधीशांची निर्म म शोषण वृत्ती हे या वर्तमानातील भया वह प्रश्न आहेत

म्हणून चित्रकला जी मातृभूमी स्वातंत्र्यदेवता या मिथक कल्पनांच्या आधारे विकसित झाली तीच चित्रकला आज या प्रतीक वाद्यांच्या हिसेची बळी जात आहे हीच चित्रकला पुन्हा उभे राहते आहे स्वातंत्र्याचा क्रोश राष्ट्र निर्माण ची हाक हिंसेविरुद्धचा बुलंद आवाज चित्रकला देते आहे तुरुंगातून ती विचार आणि निर्माण यांचा संकल्प करते आहे मानव्याच्या शोषणाने चित्रकला अस्वस्थ होते आहे आजच्या उच्च अभिजात चित्रकारांच्या हम सब सहमत आहे या दिल्ली स्थित ऑगस्टपर्यंत मधील संयोजित राष्ट्रीय लेखक चित्रकार महोत्सवाच्या प्रदर्शनाचे संदेश रूप आहे असे सारांश रूपाने आशयाच्या अंगाने स्पष्ट करावेसे वाटते जिथे देश आहे परंतु नागरिक नाही हे उद्याचे वर्तमान आज स्पष्ट करावे म्हणूनच हा लेखन प्रपंच सम्यक पणे केला आहे

शिवाजी राऊत प्रेस
सातारा 4 ऑगस्ट 2022 वेळ नऊ वाजून पन्नास मिनिटे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *