देशातील युवकांनी फासी वादाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हावे -कुमार सप्तर्षी यांचे आवाहन

देशातील युवकांनी फासी वादाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हावे -कुमार सप्तर्षी यांचे आवाहन

देशातील युवकांनी फासी वादाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हावे
कुमार सप्तर्षी यांचे आवाहन
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील विशेष व्याख्या न

दिनांक आठ ऑगस्ट 2022 भारतातल्या युवा वर्गाला फॅसीझमच्या विरुद्ध बोलावे लागेल देश वाचवण्यासाठी अजून चार वर्षे शिल्लक आहेत या देशातल्या युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फॅसीझमच्या विरोधात लढण्याचा दृढ संकल्प करावा आणि स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी आयुष्यातील तीन वर्षे द्यावीत जसा प्रति सरकारने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचा जिल्ह्यामध्ये आदर्श प्रयत्न करून भारताला तो आदर्श दिला होता त्याच जिल्ह्यातून दुसऱ्या दा. प्रतिसरकारणे देशात येऊ घातलेल्या पासीवादाविरुद्ध विरुद्ध लढण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी केले

छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, सातारचे प्रतिसरकार समिती सातारा महात्मा गांधी स्मारक समिती सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चे विशेष व्याख्यान प्रसंगी स्वातंत्र्यसंग्राम आणि देश उभारणीतील युवकासमोरील आव्हाने या विशेष व्याख्यानात डॉक्टर सप्तर्षी हे बोलत होते
विचार मंचावर आमदार शशिकांत शिंदे अन्वर राजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य रोशन शेख स्वातंत्र्य सेनानी पतंगराव फाळके स्मारक समितीचे अध्यक्ष शिवाजी राऊत असलम तडसरकर इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर मासाळ ….सर हे विचार मंचावर उपस्थित होते

कुमार सप्तर्षी यांनी युवकांशी साधलेल्या या वैचारिक भाषणाच्या मध्ये पुढील अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला
हा देश सुधारक आणि 1800 जाती यांच्यामध्ये विभागला गेल्याचे सांगून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की या देशांमध्ये मनुस्मृती हा उकिरड्यावर टाकून देण्यासारखा विषमतेचे समर्थन करणारा ग्रंथ आहे हा पाप-पुण्याचे समर्थन करणारा ग्रंथ आहे आपली जात आपला धर्म हे जैविक अपघात असल्याचे सांगून डॉक्टर सत्तरशी म्हणाले की आजच्या युवकांना मागून आई-वडील निवडण्याचा जर पर्याय दिला तर आजचे युवक 27 मजले घर बांधणाऱ्या अंबानी ची निवड पालक म्हणून करतील या युवकांनी हे समजावून घेण्याचे गरज आहे की जगात नाही असे अस्पृश्यता भारतात आहे इथे पाप-पुण्याच्या शुभच्या असंख्य कल्पना आहेत या सगळ्या टाकून देण्याची गरज आहे ब्राह्मणांचे सोहळे आणि अस्पृश्यांचे ओवळे ही भेदनीती परंपरागत चालत आले आहे अमानुष अस्पृश्यता आम्ही खेड्यामध्ये पाहिली असल्याचे सांगून सप्तर्षी म्हणाले की या देशात शोषणाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कुलकर्णी देशमुख पाटील आणि त्या सुभ्याचा राजा सरदार यांचे संघटित प्रयत्न या देशातील शेतकरी गरीब यांना लुटत आहेत बहुसंख्यांक नावाचे जातीचे भावकीचे राजकारण महाराष्ट्रामध्ये टोकाला गेले आहे जात ही इथे प्रत्येकाला मेल्या नंतर खांद्यावर नेण्यासाठीच फक्त उपयोगी पडते हे विसरू नये जातीचा विकासाशी कौशल्यशी काही एक संबंध नाही असे नमूद करून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की इथल्या राजेशाहीच्या राजीव युवकांना खूप लाडात कोडात वाढवण्याची इथे प्रथा आहे आमच्या पंतप्रधानांनी लिहिलेल्या आमचे बालपण या पुस्तिकेचा उल्लेख करून डॉक्टर सप्तर्षी यांनी राजपुत्र रडला नाही पाहिजे याची एक कथा विद्यार्थ्यांना ऐकवली अशा राजेशाहीच्या कालखंडातून ऊन शकुन पोर्तुगीज ब्रिटिश हे पाशच्यात इथे आले आणि त्यामुळे त्यांच्यासह अनेकांनी आपल्यावरती राज्य केले येथील जनतेवर शतकानून शतका अत्याचार झाला आहे देशमुख पाटील ब्राह्मण यांनी दलित आणि अल्पसंख्यांक यांना कित्येक शतके सतत मारले असल्याचे सांगून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की आजही स्वातंत्र्याचे स्मारक हा बहुतांश समाजाचा श्रद्धेचा चिंतनाचा आचार मूल्याचा विषय होत नाही साताऱ्यात प्रतिसरकारच्या स्मारकाला विरोध होतो हे त्याचेच धोतक असल्याचे सांगून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की कुलकर्णी देशमुख पाटील यांच्या अत्याचाराचे जमिनीच्या लुटीचे राजकारण हे युवकांना कळाले पाहिजे तरच स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत कळेल

डॉक्टर सप्तर्षी पुढे म्हणाले की 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले. त्यांनी आफ्रिकेत लोकांच्यासाठी तेथील इंडियन लोकांच्यासाठी शिक्षणाचे आश्रमात प्रयोग केले. त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून मुलांना शिकवले ते शिक्षक बनले ते त्यांचे अनुभव भारतात त्यांना फार उपयुक्त पडले असल्याचे सांगून डॉक्टर म्हणाले की भारतात प्रत्येक माणसाची समज जातीपर्यंतच आहे जातीच्या पुढे पुढे भारतीय नागरिकांची समज जात नाही त्यांची समज जातीच्या तिथेच संपते तेव्हा देश समाज याचा प्रश्नच येत नाही ज्या देशात बहुसंखांक समाजाचा विचार देव आणि जात इथे संपतो तो समाज प्रगती करू शकत नाही असे सांगून डॉक्टर म्हणाले की धर्मांतर करून करून प्रश्न सुटत नाहीत गांधींनी भारतातील अस्पृश्यता ओळखली होती म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात खालच्या समाजाला सोबत घेतले होते गांधीजींच्या सोबत स्वातंत्र्य लढ्यात महिला मोठ्या संख्येने होत्या ज्या समाजावर अत्याचार होतो त्या तळागालागाळातील समाजाला गांधी हे आपले उद्याचे आशा केंद्र वाटत होते असे सांगून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की धर्मापेक्षा राजकीय नीतिमत्ता फार महत्त्वाची आहे भारतात गांधीपूर्वी धार्मिक नीतिमत्तेला खूप महत्त्व देण्यात येत असे मात्र महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात राजकीय नीतिमत्ता ही श्रेष्ठ बनवली जग सर्व महात्मा गांधीजींच्या अहिंसेचा विचार आज स्वीकारत आहे गांधीजींचा 2 ऑक्टोबर हा जन्मदिन जगभर साजरा होतो आहे जगातील महासत्तांच्याकडे अनेक वेळा पृथ्वी भाजून काढता येईल इतक्या अनु बॉम्ब आहेत अशावेळी या महासत्तावादी देशांना म गांधीजींच्या अहिंसा विचाराचा पुरस्कार करावा लागतो येथील युवकांनी समजावून घेण्याची गरज आहे भारत हा प्राचीन देश असल्याचे खोटे सांगत आहे पाच हजार वर्षाच्या संस्कृतीचे गोडवे गात आहे पण लोकशाहीची भूमी हे अमेरिका आहे तिचा इतिहास 500 वर्षाचा आहे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहे अशा वेळेला आपण वर्तमान आणि भविष्याचा विचार करून देश पुढे नेला पाहिजे पाठीमागे काय घडले काय केले हे सतत काढून हा देश प्रगतीपथावर जाणार नाही असे नमूद करून डॉक्टर म्हणाले की आपण सहिष्ण असूनही असहिष्ण करण्याचे माथी तयार करण्याचे व भडकवण्याचे काम सध्या चालू आहे हे राजकारण युवकांनी ओळखले पाहिजे हा देश पाश्चात्य लोकांच्या आक्रमणानंतर घडत चाललेला देश आहे

भारतामध्ये उतरंडी जाती व्यवस्था आहे रांजण ते गाडगे या चातूर्वणाने व्यवस्थेचे वरचे छोट्या तोंडाचे घाडगे सतत बोलते ठेवले आहे आणि भार सोडणारे तळाचा रांजण हे तोंड शतकानुशतके गप्प ठेवून ते राहिले आहे अशीच समाजाची वर्णव्यवस्थेची अवस्था आहे हे युवकांनी समजावून घेण्याची गरज आहे

धर्म आणि आजचा युवक यांचा संबंध स्पष्ट करताना डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की कुराण बायबल गीता हे जगातले सगळे धर्म व सगळे ग्रंथ अपूर्ण आहेत कोणताही धर्म परिपूर्ण नाही व कोणताही धर्म टाका ऊन आहे म्हणून सर्व धर्माच्या सह जीवन जगण्याचे पारंपारिक शहाणपण युवकांनी स्वीकारले ची गरज आहे हिंसा करण्यास जे सांगते ते हिंदुत्व नसते हिंदुत्वात हिसा नाही असे नमूद करून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की इथली सगळी प्रसार माध्यमे ही हिंदुत्वाच्या व सत्ताधारी विचारसरणीच्या नेत्यांसाठी काम करीत आहेत समस्या मांडत नाहीत गांधी आणि आंबेडकर हे युवकांनी समजावून घेण्याची गरज आहे ज्या कॅबिनेट मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे नाव नाही अशी नेहरूंनी दिलेली मंत्र्याची यादी गांधीजी टाकून देतात हे भारत कधी समजावून घेणार आहे का? असा प्रश्न विचारून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की हा देश सर्वांचा आहे स्वातंत्र्य हे तळातील समाजाची पहिली गरज आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या प्रतिसरकारच्या चलेजावच्या आंदोलनातून व देशभरच्या ऑगस्ट क्रांतीतून मिळालेले स्वातंत्र्य हे आता बदलवण्याचे प्रयत्न चालू आहेत या देशातील सातशे राजे हे स्वातंत्र्यानंतर विलीन झाले होते आता मात्र त्यांना केंद्रातील सरकार मंत्री पदे देऊन पुन्हा तुम्हाला तनखा सुरू करू तुमच्या जमिनी मुक्त करू अशी आश्वासने देऊन सर्व छोट्या-मोठ्या राजांना वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेचे समर्थक बनवण्याचे प्रयत्न इथे चालू आहेत हे युवकांनी समजावून घेण्याची गरज असल्याचे नमूद करून डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की ज्यांच्या डोक्यात 24 तास जात असते असा बहुसंख्यांकाचा देश प्रगती करू शकत नाही म्हणून हेलिकॉप्टर मध्ये राम सीतेला बसवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदिनाथ हे जेव्हा मंत्रिमंडळाला राम सीतेच्या पाया पडावण्यास लावतात तेव्हा या भारताच्या स्वातंत्र्याची उलटी पावले पडू लागली आहेत याचे हे सूचक उदाहरण आहे दत्त याला तीन तोंडे असतात तिन्ही तोंडातूनच त्यास बोलता येते तिन्ही तोंडातून खाता येते रावणाला दहा तोंडे होती दहा तोंडातून तो संवाद करीत होता तसेच भारताच्या या भूमीवर असंख्य जनजाती जीवन जगत आहेत त्यांच्या सर्वांच्या मुखातील एक स्वातंत्र्याचा आवाज हा बुलंद केला पाहिजे टिकवला पाहिजे स्वातंत्र्य हे नष्ट करण्याचे फासीवादाचे प्रयत्न या देशात सुरू झाले आहेत हे सांगून डॉक्टर सप्तर्ष म्हणाले की स्वातंत्र्यानंतर इथे निर्माण होऊ लागलेली समानता स्त्रियांचा विकास सर्व खालच्या जातींचा विकास हा रोखण्यासाठी फाशी वाद आणला जातो आहे सन्मानाने जगण्याचा घटनात्मक अधिकाराचा संकोच कायम केला जाईल अशी भविष्य निर्माण झाले आहे म्हणून आजच्या युवकांनी जातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वातंत्र्य कायम टिकवण्यासाठी फाशीवादाच्या विरुद्ध आयुष्यातील तीन वर्षे निर्भयपणे बोलण्याचे काम करावे युवकांनी येरवडा विद्यापीठाचे पदवीधर व्हावे ती तयारी ठेवावी असेही आव्हान त्यांनी शेवटी केले स्वातंत्र्य संग्राम आणि उभारणीतील युवकांनी समोरील आव्हाने ही फासीवादाच्या विरुद्ध लढणे हीच आहेत असेही शेवटी त्यांनी सांगितले

कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य रोशन शेख म्हणाल्या की रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी कॉलेज सातारा हे कर्मवीरांच्या सत्यशोधक विचारधारेमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीशी सुरुवातीपासून जोडले गेलेले आहे आजच्या युवकांनी धोक्यात स्वातंत्र्य मूल्य चे संरक्षण करण्यासाठी आणि फासीवादाचे संकट समजावून घेऊन मार्गक्रमण करावे गांधी समजून घ्यावा तरच देश समजेल असे सांगून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला

अल्पशा भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की सातारा जिल्हा हा स्वातंत्र्याच्या चळवळीतील अग्रेसर जिल्हा आहे या जिल्ह्यातूनच पुन्हा जातीवादाविरुद्ध फासीवादाविरुद्ध लढणारा युवा वर्ग तयार होईल तो होण्याची गरज आहे गांधी समजून घेण्याची गरज आहे आज हे प्रबोधन ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून रयत शिक्षण संस्था हे ऑगस्ट क्रांतीचे प्रबोधन सत्र पुढे नेईल असेही आश्वासन त्यांनी प्रमुख वक्ते कुमार सप्तर्षी यांना

महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष शिवाजी राऊत यांनी छोटेखानी मनोगतात समतेसाठी लढूया स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी लढूया संविधानाच्या संरक्षणासाठी लढू या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढू या तूनच फासीवादाच्या विरुद्ध लढण्याची सामर्थ्य मिळेल ते ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीचे उद्दिष्ट होते आणि आजही आहे म्हणून हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले

महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे डॉक्टर मनोहर कदम यांनी नमूद केले की हे महाविद्यालय व इतिहास विभाग हे ऑगस्ट क्रांती 42 च्या प्रबोधनासाठी सतत कार्यशील राहील इतिहासातून वर्तमानाच्या समस्याकडे कसे पहावे हे इतिहास विभाग मुलांना सतत सांगत असतो त्या समस्या सोडवण्याचे उपाय प्राप्त नये होण्यासाठी अध्यापनातून आम्ही प्रयत्न करत असतो
डॉक्टर मनोहर कदम यांनी शिवाजी महाविद्यालयाच्या सर्व गौरवशाली कार्यप्रणालीची व विभागाची माहिती या प्रसंगी प्रास्ताविकात करून दिली
इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर मासाळ सर यांच्या हस्ते मान्यवरांचे रयत शिक्षण संस्था उपरणे स्मृतीचिन्ह व पुस्तके भेट देऊन स्वागत करण्यात आले
हे विशेष व्याख्यान पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे सर्व प्राध्यापक डॉक्टर विकास यलमार सीमा कदम माधवी गोडसे यांचेसह सर्वांनी अनमोल सहकार्य केले व योगदान दिले
कार्यक्रमास स्वातंत्र्य सेनानी पतंगराव फडके अरुण शेळके जालिंदर पाटील विक्रांत पवार जितू ….काँग्रेस सरकार हे सर्व प्रतिसरकार समितीचे कार्यकर्ते विशेष उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *