स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात
“महात्मा ते महात्मा”
*टिळक आणि गांधी हे भारतीय राजकारणाचे दोन ध्रुव, एक टिळक युग तर दुसरे गांधीयुग तेल्या तांबोळ्याचे पुढारी असे म्हणून टिळकांना पुण्याने नेतृत्व बहाल केले त्यामुळे उच्चवर्णी यांच्याशिवाय अन्य जातींचे नेतृत्व टिळक सन १९२० पर्यंत करीत होते, यामुळे हे उपराधी विशेषण त्यांना लावण्यात आले होते. टिळकांचा स्वातंत्र्य लढ्यातील जीवनाच्या अंतिम क्षणा पर्यंतचा काँग्रेस हातात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न हा खूप मोठा कर्तृत्वाचा गौरवशील इतिहास आहे.*
*टिळकांचे सोबती दैनिक केसरीचे संपादक नरसिंह चिंतामण केळकर काँग्रेसचे आपसुक ताबेदार बनले होते, टिळक उत्तर कालखंडात गांधीजींच्या सर्व सहभागाला प्रखर विरोध करत होते, केसरी हा जवळपास गांधी विरोधी बनला होता, केळकर यांनी टिळकांना अभिप्रेत असलेल्या त्याच सामाजिक सुधारणांचा टवाळी सतत चालविली होती.
ही भूमिका केसरी मधून पुढे मांडत होते, वस्तुस्थिती सत्यशोधक हे पर्यायी पुरोहित शाही निर्माण करणे या विचाराने पेटून उठले होते, त्यांनी महर्षत्राच्या मनावर प्रभाव निर्माण केला होता त्याचवेळी त्या कालखंडातील वर्ण वर्चस्ववादी हे बहुजन समाजाला घडणाऱ्या वर्तमान पासून दूर ठेवत होते, हे टिळक पंथीय राष्ट्रवादी यांचे षडयंत्र सत्य शोधक समजून होते.
पुणे स्थित मराठा व माळी या जाती टिळक कछपी लागल्या होत्या, बहुतांश खालच्या जाती या सर्वापासून खूप दूर होत्या मुळात १९१५ पासून म. गांधीचे नेतृत्व काँग्रस मधून जसे पुढे आले तशी काँग्रेस बदलली जाऊ लागली होती, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर महाराष्ट्राचा प्रभाव व नेतृत्व प्रस्थापित होत होते, मुळात मुळात केळकर साहित्यातून महाराष्ट्र हलवित होते तर गांधी समतावादी विचाराने ब्रिटिश विरोधी विचाराचे आकाश हलविते होते.
हा सर्व इतिहास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना समजावून घेणे खूप महत्वाचे ठरते, केवळ गांधी विरोध पुढे पुढे निघाला होता, गांधी हे जनतेला सतत कार्यक्रम देत समाजाला आकर्षून घेत असत, गांधीचा हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस राबवित नव्हती, टिळक पंथीय तेव्हा म्हणत असत की ब्राम्हण वर्ग हाच एकमेव सुशिक्षित असून तोच फक्त खरा देश भक्त आहे. त्यामुळे त्यांचे विरोधात सत्य शोधक आक्रोश करीत आहेत.
गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत सर्व खालच्या जातीचा सहभाग घेतला, अस्पृश्य जातींना आकृष्ट करून घेतले, येथूनच गांधी विरोध सुरू झाला होता, वर्ण वर्चस्व कायम ठेवायचे आणि पोलादी ब्रिटिश विरोधी लढून स्वातंत्र्य मिळविणे हे अवघड आहे यांचे सत्य शोधक समाजाचे शहाणं पण खूप महत्वपूर्ण ठरले होते. मुळात तो टिळक पथियांचा वैदिक राष्ट्रवाद आणि सत्य शोधकांचा गांधी नेतृत्व समर्थनच लढा हे खूप संशोधन करून आज ही मांडण्याचे विषय आहेत.
सत्य शोधकांचां वैदिक विरोध आणि त्या समकाळातील सत्य शोधकांचा वर्ण वर्चस्व विरोध हे किती गुंतागुंतीचे होते खरे तर गांधी हे महाराष्ट्र देशी सत्यशोधकाना स्वातंत्र्य लढ्यातील रुपांतरीत करणारे कृतीशील वर्ण वर्चस्व विरोधक ठरतात. स्वातंत्र्य हेच अस्पृश्यता नाहीशी करू शकते हा आत्मविश्वास गांधींनी महाराष्ट्रातील जेधे जाधव जवळकर या धुरिणांना दिला होता.
गांधी नेहमी टिळक पंथीय व सत्य शोधक यांचा टिळक अनुयायासह जोडून घ्या या आग्रहाचे होते.
काय आश्चर्य आहे पहा २३ सप्टेंबर १८७३ रोजी मुंबईत्त कामठीपुरा येथे सत्यशोधक समाजाची स्थापना होते.आणि सातारा जिल्ह्यातील भिलार येथे पुण्या मुंबई नंतर पहिली सत्य शोधक समाजशाखा स्थापन केली जाते आहे, इतिहास कसा उलटा चालतो पहा, भाजपा सेना सरकार पुन्हा २०१७ राज्यात सतेवर येथे तेव्हा ते भीलार गावी पुस्तकाचे गाव हि आकर्षक घोषणा देवून तेथील कपाटे खचा खच सनातनी वांगमय भरून सत्यशोधकची पहिली शाखा भिलार येथे स्थापन झाली होती हा एका शतकात इतिहास पुसून टाकते ? हे आपसूक सहज निरहेतुक घडत असावे का?
जुलै १९२२ मध्ये गांधीजींना अटक होते, सहा वर्षाचा तुरुंगवास भोगून गांधी बाहेर येतात आणि महाराष्ट्रातील सत्य शोधक गांधीजीच्या कडे आकृष्ट होतात हे सहज घडले नाही, सत्य शोधक समाजाने महाराष्ट्राची जन मन भूमी मशागत केली होती त्यातून महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढा हा मद्रासच्या जस्टीस पार्टीने म्हटल्या प्रमाणे महात्मा ते महात्मा असा रुपांतरीत जाहला होता हे खूप मोठे घटनाचे प्रसंग याने लढा पुढे निघाला होता.
याचा महाराष्ट्राच्या ब्राह्मण इतर समाजावर फार मोठा प्रभाव पडतो, फुले उत्तर कालखंड हा सत्यशोधक समाजाच्या प्रभावाखालील महाराष्ट्र अर्थातच ब्राम्हणेतर समाज १९३१ पर्यंत कांग्रेस पासून फटकून होता, प्रांतिकचे नेते मदन मोहन मालवीय हे सर्व दुरुस्त करण्यास कराड येथे आले होते, त्या सभेचे अध्यक्ष न ची केळकर होते, व्यासपीठावर दोन खुर्च्या अध्यक्ष केळकर याना सभा गोधळ करून खुर्चीतून खाली बद्विते प्रचंड गोंधळ उडतो, गणपतराव बटने याना अध्यक्ष केले जाते, केळकर बाजूला उभे राहतात, तिसरी खुर्ची आणली जाते केळकर पुन्हा बसतात हा प्रसंग गांधी अनुयायी विरुद्ध टिळक अनुयायी म्हणून नोद विला गेला आहे. हे सर्व सत्य शोधक पत्रक दिंनमित्र साप्ताहिक चे दिनाक ८ जुलै १९३१ चे अंकात प्रकाशित तेव्हा जाहला होता.
महाराष्ट्राने कधीही विसरून नये की, १९२१ मध्ये खंडेराव बागल सत्यशोधक यांनी गांधीचे नेतृत्व सत्य शोधकानीच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राने स्विकारावे हे कसून केलेले प्रयत्न वंदनीय ठरतात,
सत्यशोधक मधील दोन गट ब्रिटिश धार्जिने व गांधी समर्थक गट यातून नेमके काय काय घडले हे तीन दशकातील विचार मंथन अद्याप मांडले गेले नाही.
आजही भारताच्या वैदिक विरोधी सत्यशोधक या लढ्याची मीमांसा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन केली जात आहे, ईश्वर नाकारणारे रामस्वामी पेरियार यांना महात्मा फुले यांच्या व राजर्षी शाहू यांच्या विचाराचे अनुबंध जोडण्याचे स्वप्न होते परंतु महात्मा ते महात्मा हा जस्टिस पार्टी ऑफ मद्रास यांचा वर्ण वर्चस्व नष्ट करण्याचा हा अनुबंध वैचारिक पातळीवर स्वातंत्र्योत्तर काळामध्येही जोडता आला नाही असे सजग प्रयत्न समाजकारणामध्ये झाले नाहीत हे दुर्दैवाने नमूद करावे लागते.
भास्करराव जाधव भास्करराव जेधे जवळकर या दोन गटांच्या मध्ये झालेले मतभेद हे स्वातंत्र्य चळवळीच्या मधील टिळक पंथीयांचे यशस्वी राजकारण मानले जाते, सत्यशोधकांचा बहुतांश गट हा गांधीजींच्या बरोबर आला यातूनच महात्मा गांधीजींचा महाराष्ट्र देशी स्वातंत्र्य चळवळीचा लढा रुजू लागला आणि तो पुढे सशक्त झाला हे महाराष्ट्राच्या सत्यशोधक समाजाचे स्वातंत्र्य पातेय आणि वैचारिक समर्थन भारत समजावून घेईल काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
१९२२ ते १९३२ हा कालखंड सत्यशोधक आणि वर्णन वर्चस्वादी टिळक बंदीआणि महात्मा गांधीजींचे नेतृत्व प्रस्थापित होणे ,जनसामान्यांचा सहभाग स्वातंत्र्यलढ्यात घेणे यासाठी झालेले वैचारिक रणकंद आणि गीता रहस्याच्या आध्यात्मिक प्रभावाला कर्म वादाच्या सिद्धांताला ब्राह्मणेतर समाजाने तसेच स्वीकारले होते समजावून घेणे खूप महत्त्वाचे ठरते ,तत्कालीने टिळक पंथीय केळकर हे सत्यशोधक समाजाची टवाळी करताना म्हणत असत की सरकारच्या भजनाची दिंडी काढून टाळ मृदुंग वाजवीत नाचणाऱ्या या प्रचंड वर्गाने सरकारी छावणीतून पळ काढला व तो राष्ट्रीय सभेच्या निशाणा खाली येऊन उभा राहिला असे हिनावणीचे उद्गार सत्यशोधक समाजाला काँग्रेसमध्ये रूपांतरित झाल्यानंतर सहन करावे लागले होते हा महाराष्ट्र देशीचा इतिहास काँग्रेसच्या सामर्थ्याचे अनुबंध इथे पाहायला मिळतात.
केशवराव जेधे यांनी पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये प्रवेश नोंदणी सुरू केली आणि सत्याग्रहींची संख्या वाढवली.
स्वातंत्र्याची गीत हातात डप घेऊन गाणारे केशवराव जेधे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात महाराष्ट्राला आठवले पाहिजेत. १९३२ ला जेजे मेंशन मध्ये सत्यशोधक ब्राह्मण परिषद घेतली होती त्या परिषदेस भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, पी सी पाटील, श्रीपतराव शिंदे इंदुलकर एवढे कार्यकर्ते उपस्थित होते तरीही त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विठ्ठल रामजी शिंदे आणि जेधे हे गावोगावी काँग्रेस प्रचाराचा दौरा करीत राहिले होते ते गावोगावच्या प्रचारात मराठी आमचा बाणा शिवाजी आमचा राणा असे गीत गात होते, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे, हे ग्रामीण महाराष्ट्राच्या मुखातून गीत गाऊन घेणारे भास्करराव जेधे व विठ्ठल रामजी शिंदे हे गांधी समर्थक सत्यशोधक भारत देशात स्वातंत्र्याच्या आंदोलनातील सामर्थ्याचे घटक म्हणून त्यांचा विचार केला जाईल काय? महात्मा गांधीजींच्या सत्यअहिंसा या विचारावर आधारित स्वातंत्र्य आंदोलनाला सत्यशोधकांनी दिलेले सामर्थ्य हे भारतीय स्वातंत्र्याचे हुतात्म्याचे स्वातंत्र्य बळ होते पुढे १९४३ च्या लढ्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक तयार झाले त्याची जनमन भूमी ही सत्यशोधक समाजाने महाराष्ट्र देशी तयार केली होती हा एक इतिहासाचा अंधकारपट कायमपणे ठेवला गेला आहे काय? असे प्रश्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मनात येतात, याचा विचार अकादमीक क्षेत्रामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये पुढे कायम केला जाईल, टिळक पंथीय वर्णवर्चस्ववादी आजचे कार्पोरेट हिंदुत्व फासीवादाचे संकट निर्माण करून उभे आहेत भारत हा वर्ण वर्चस्वादी वैदिक पुन्हा तयार करण्याचे प्रयत्न भारत देशा चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये १९२१ ते १९३२ च्या कालखंडामध्ये सत्यशोधक समाजाने वैदिक वर्णवर्चस्वादी यांच्याविरुद्ध ब्राह्मण तर संघर्षाचे एक दशक गांधी नेतृत्व समर्थनाचे म्हणून महाराष्ट्र देशी रणकंद माजवून गाजवले होते हेआज समजावून घेणे नितांत महत्त्वाचे वाटते, हे झाले तरच महात्मा ते महात्मा हा स्वातंत्र्य उत्तर भारतातील चळवळीचा पुन्हा अनुबंध जोडण्याची वैचारिक व कृतिशील भूमिका समाज धुरीन घेतील असा आशावाद वाटून राहतो.
साधार राष्ट्रीय काँग्रेस आणि टिळक या ग्रंथाचा आधार
शिवाजी राऊत प्रेस सातारा
आठ ऑगस्ट २०२२ वेळ ९.४३