फासी वाद साक्षरता
_ काही मुळा अक्षरे ____________
हि हि – हिंसेचा
व वं – वंशाचा
ज ज जातीचा
ध ध. धर्माचा
सूड आणि हिंसा एकच असतात, सूड हा मानवी बुध्दीतील नैनिवेचा उफाळून येणारा अविवेकी वर्तन प्रकार असून तो उन्मादी वादी पना त्या वर्चस्ववादी समाजाचा असून तो पशुत्वपणा असतो , तो वंशवादाचा एक अंश असतो, सूड हा इतिहासा- तील त्या जातीचे, वंशांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित करू पाहतो, सूड हा बदला आणि विजय यामध्ये विकृतपणे रूपांतरित होत असतो. सूड ही हिंसा असते हे खरेच पण त्याची वंश आणि धर्म यांच्या आधारे जोडणी चालू असते,हिंसा इतिहासाच्या सर्व कालखंडात पुढे चालत आलेल्या आहेत, वंश आणि धर्म हे प्रभुत्व आणि सनातनपणा याला पुढे नेत असतो, प्रभुत्व टिकवण्यासाठी वंश हवा असतो, वंशवाद हा प्रभुत्वासाठी आवश्यक असतो आणि धर्म हा वंश टिकवण्यासाठी समर्थनाचे खोटे असत्य कथानक सर्व कालखंडामध्ये रचून पुढे आणले जाते.
जगभरच्या सूड आणि हिंसेच्या खूप सत्य कथा आहेत, इतिहास अभ्यासात त्यांचे खरे खोटे रणकंदन चालू आहे.
- जर्मनीचा नर संहार कर्ता हिटलर हे त्याचे नजीकच्या कालखंडातील दुसऱ्या महायुध्ा काळातील क्रौर्याचे उदाहरण जगाने अनुभवले. आहे हिटलरने, ज्यूच्या हत्या करून त्यांच्या शरीराच्या कवट्यांचे ढीग खंदकात ठेवले होते, लाखोंच्या शरीरा तील चरबी काढून, त्याने साबण बनविले होते, लाखो ज्युं स्त्रियांच्या डोक्यावर केस कापून त्याचे जान बनविले होते यासारखी नृशंस हिंसा करणारा अडाल्फ हिटलर हा जगभर लोकशाही स्वातंत्र्य विचारसरणीचा विरोधक ठरलाहोता , तो वंश वाद्यांचा आवडता हुकूम शाह बनला होता तो कुप्रसिद्ध तो वंशवादाचा समर्थक होता, त्याला आदर्श मानून भारतातील संस्कृतिक वादी काही वंशवादी संघटना हिंदू राष्ट्रवादाची प्रतीके उभी करून लोकशाही आणि स्वातंत्र्य हे नष्ट करण्याचा जो छुपा प्रयत्न करीत होते ते आता उगड फासीवादाचा प्रयत्न पुढे नेहत आहेत हा फासी वाद भारताच्या वंशवाद्यांना, प्रभुत्वद्यांना हिंदुत्वद्यांना प्रिय वाटत आहे याचे पुरावे म्हणजे भारतभर विविध विचारसरणीच्या विवेकवादी चळवळीतील डॉ. दाभोळकर कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी या विवेकी विचार नायकांच्या प्रायोजित केलेल्या अप्रत्यक्ष हत्यांचे सुत्रधार कोण आहेत? हे न शोधण्याचे ते एक कारण आहे.*
*हिंसा आणि विचारसरणी यांच्यामध्ये नेहमी गतिरोध असतो, एक विचारसरणी दुसरे विचारसरणीचा पराभव हिंसेने जेव्हा करू लागते, तेव्हा विचार संपतो आणि तेथे हिंसा मोठी होते, विचाराचे राजकारण जिथे यशस्वी होत असते तेथे हिंसेचे प्रभुत्व लादून काळाच्या पटलावर न टिकणारा आधुनिक उत्तर काळात न स्वीकारला जाणारा विचार हा सशक्त करण्याचे प्रयत्न हिंसावादी नेहमीच करीत आहेत
विचार हा विवेक निर्माण करतो, विचार चिकित्सा निर्माण करतो, विचार इतिहासाचे परिशिलन करण्याचे धाडस देतो, विचार वर्तमानाचे भान देतो, विचार हिसेची कारणे समोर आणतो, विचार हा नेहमी प्रभुत्वाची कारणे स्पष्ट करतो, शोषणाची कारणे अत्याचार करणाऱ्या व्यक्तींचा पर्दाफाश करीत असतो,विवेकी विचार समाजाचा गमावलेला आत्मविश्वास प्राप्त करून देत असतो, विचारातून संघटन, संघटनातून संघर्ष, संघर्षातून रचना ही आधुनिक समाजाच्या बदलाची परिवर्तन साधने आहेत, इथे देश नसलेल्या, धर्म असलेल्या ,आत्मा, मोक्ष, नरक या कल्पनांनी जर्जर झालेल्या भारतामध्ये लोकशाही अधिक जर्जर होत चालली आहे.
लढ्यातून लोक शाही आली आहे, हे स्वातंत्र्य ७५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण करते आहे, अशा भारतीय लोकशाहीमध्ये विषमता ,शोषण वंशवाद यांना विरोध करण्याचे विरोधी विचार मांडण्याचे व सनदशीर आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकारातच आहे. भारतीय संविधानाने दिलेले विचार स्वातंत्र्य अर्थातच अविष्कार स्वातंत्र्य हे भारतीय सनातन संस्थांच्या पुढील सतत आव्हानात्मक ठरलेली कारणे आहेत, भारतातला सनातनपणा हा संमिश्र आहे, हटवादी, वैदिक पुरोहित, साध्वीक हे मूळ द्रविड संस्कृतीला हरवित पुढे आले आहेत, त्यानी नष्टकरण केलेच आहे, सुफी मुस्लिम, ख्रिश्चन यासह अनेक बाहेरून आलेल्या नी आक्रमण शक्तीनी भारताला कालसापेक्ष सनातन पणातून सतत मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, बाहेरून आलेले लोक हे संस्कृतीवर आक्रमण करतात, संस्कृती नष्ट करतात आपली संस्कृती आपला धर्म,आपला वंश वाढवतात, आपला विचार आणतात, आपले राजकारण रुजवतात, यातूनच भारताची बहुसंस्कृतिकता तयार झाली आहे, बहुसंस्कृतिकता आणि एकधर्मीय वांशिकता याचीच साक्षरता ही लोकशाही साक्षरते, इतकेच विवेचन सतत करण्याची नितांत गरज आहे, लोकशाही साक्षरता म्हणजे निवडून येण्याची साक्षरता नव्हे, लोकशाहीच्या लोकप्रतिनिधित्वाच्या त्रिस्तरीय रचनेतील सत्ता संघर्ष हे भारतीय लोकशाहीचे हिनकस विकृत चित्र अनेक वेळा भारतीय जनतेने पाहिले आहे, लोकशाही ही स्वातंत्र्याची रक्षण कर्ती आहे, लोकांचे जीवन सार्वभौम मानून ते प्रस्थापित करण्यासाठी सर्वांकष कायद्याने धोरणांची अंमलबजावणी लोकशाहीच्या कारभारातून अभिप्रेत आहे.
अशा या भारतीय लोकशाहीच्या प्रवासाचे दोलायमान अवस्थेचे चित्र सनातन विचार व स्वातंत्र्यविरोधी विचार या दोन्ही दिशेने लोकशाही डळमळीत होत आहे, झाली आहे, लोकशाही राज्यव्यवस्था ही स्वातंत्र्याचे जीवनगाण सामान्य माणसाला गाऊन आश्वासक बनवते, स्वातंत्र्य ही निर्भयता असते, न्यायाचा क्रोश असतो, स्वातंत्र्य हे समतेच्या न्यायाच्या दिशेने समाज जीवनात अविष्कृत होऊ पाहते, स्वातंत्र्य ही राजकीय निव्वळ स्वातंत्र्याची गोष्ट नाही ती व्यक्ती आणि समाज जीवनातील सर्व हक्काने अधिकारांच्या प्रस्थापनेसाठी व्यवस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी न्यायाने वर्तन करण्याच्या आग्रहाचा तो शपथपूर्वक प्रयत्न असतो, तो असायला हवा.
लोकशाही आणि सनातन विचार, लोकशाही आणि धर्मवादी, लोकशाही आणि वंशवादी, लोकशाही आणि राष्ट्राच्या नावाखाली राष्ट्र देवतेची प्रतिक्रिया उभी करून पुण्यभूमीची यशोगाण गाणारे कोण आहेत? जनसामान्यांना यांचे कुटील राजकारण कळत नाही, जनसामान्य हे धर्म जात इथपर्यंतच विचार करतात, वंशाचा विचार करतात तेच त्यांच्या विचाराचे अंतिम स्वरूप असते त्यामुळे धर्म आणि जातीचा विचार जिथे शिकवला जातो तेथे विवेक पराभूत होतो, तिथे स्वातंत्र्य ही सतत विकसित होणारी विचार प्रक्रिया आहे, आचरण मूल्य आहे हे विचार रुजलेले नसतात नाहीत, स्वातंत्र्य हे मानवी जीवनाच्या सार्वभौमतेचे सतत उन्नत जगण्याचे अधिकार बहाल करणारे एक अमूर्त मूल्य आहे, जगाच्या विचार क्रांती लढ्यात तयार झालेले स्वातंत्र्य भारतीय सनातन अध्यात्मात कुठेच नव्हते, नाही, असणारही नाही, त्यामुळे भारतीय सनातनी अध्यात्मवादी हे लोकशाही विरोधी आहेत,बहुसांस्कृतिकतेच्या विरोधी आहेत.
*जग हे बहुसंस्कृतिक होत आहे, एक धर्म एक राष्ट्र, एक भाषा हे अस्मिता आणि सनातनपणाच रक्त संघर्षाचे रचलेले हिंसा षडयंत्र आहे, बहुसंस्कृतिकता ही भारतीय लोकशाहीने धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाअंतर्गत मान्य केलेली सर्व श्रेष्ठ राष्ट्रीय एकात्मता कायम टिकवून ठेवणारी अनमोल गोष्ट आहे,
भारतीय लोकशाहीच्या वाटचालीचे ते पथदर्शन असेल असेच म्हटले आहे, धर्मनिरपेक्षता आणि बहुसंस्कृतिकता याला सणातण्यांनी शत्रू ठरवलेले आहे, इथला समाज धार्मिक आहे, इथला समाज श्रद्धेय आहे, हे सतत सांगून सांगून या समाजाला पुन्हा पाप,-पुण्य, मोक्ष नरक या भयकल्पानात अडकवणारे सनातनी, धर्मवादी, हिंसावादी, हिंदुत्ववादी हे एकमेव आहेत असे नाही सर्व धर्मांच्या मध्ये याच स्वयं-धर्माच्या प्रभुत्वाचा, श्रेष्ठत्वाचा विचार टोकाला नेणारे हटवादी धर्मवादी ही खूप आहेत, त्यांच्या या क्रिया आणि प्रतिक्रियावादी वर्तनामध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षेतर अशीच धर्मनिरपेक्ष विचार प्रबोधन न करता, तो तळापर्यंत न रुजवता संभ्रम आणि गोंधळामध्ये केलेली आहेत.
श्रद्धा म्हणजे विवेकमूल्य असते, श्रद्धा म्हणजे अंधकार नसते,श्रद्धा म्हणजे भीती नसते, श्रद्धा म्हणजे अज्ञात अशा शक्तीचा शरण वाद नसतो, तर श्रद्धा म्हणजे डोळस विचाराचा ,दृढ संकल्प असतो, श्रद्धा म्हणजे सहअस्तित्वाचे नीतिमान वर्तन करण्याचे अभिवचनअसते ते असायला हवे, श्रद्धाही समूहाच्या भयातून स्वीकारण्याची भयकारी गोष्ट नसते,समूह हा श्रद्धेचा धर्माच्या अनेक कर्मकांडातून आविष्कृत होत राहणारा असा एक कायम समाज स्थितीशील गट असतो, हा गट प्रभुत्वाचे नेहमी षड्यंत्र रचत असतो ,समाज हातात ठेवण्यासाठी तो नवनवीन कथानक करतो,
त्यापैकीच स्वातंत्र्याच्या पूर्वार्धात तिसऱ्या दशकात १९२४ महासभेची स्थापना होय, महात्मा गांधींचा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वार्धात नेतृत्व म्हणून भारतीय क्षितिजावर झालेला प्रवेश आणि उदय ही न आवडलेली गोष्ट व पुढे नथुराम गोडसेने त्यांचा खून करे- पर्यंत अर्थातच ३० जानेवारी १९४८ पर्यंत वंशवाद्यांची भळभळती जखम कायम वाहत होती हे इतिहास वास्तव आहे.
सनातनपणा आणि प्रभुत्व हे स्वातंत्र्य आंदोलनात या देशात प्रथमच डळमळीत झाले, धर्मवादी व राजेशाहीवादी पुरोहित वंशवादी सरदार हे आपल्या देवळांचे अधिकार गेले, जमिनीचे अधिकार गेले यामुळे अस्वस्त झाले होते, त्यामुळे ते प्रारंभापासून स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात होते, ते ब्रिटिश धार्जिने होते.
लोकशाहीमध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संस्थात्मक विकास आणि तळातील जनजातींचे उत्थान ही काही अंशी स्वातंत्र्याच्या प्राप्तीची फार मोठी मिळकत भारतीय नागरिकांनी अनुभवली आहे, जनजातींच्या मध्ये वंशांच्या मध्ये विभागलेल्या भारतीय समाजाला जगण्याचा अवसर लोकशाहीने प्राप्त करून दिलेला होता आणि आहे, पण या लोकशाहीमध्ये तळातील जनजाती शिखर स्थानी येतात, त्या समता आणि स्वातंत्र्याचा बुलंद आवाज करतात, हे सनातनी, प्रभुत्ववादी, हिंदुत्ववादी यांना कधीच सहन होत नव्हते, म्हणून ते एक राष्ट्र ,एक धर्म, एक वंश अशा भ्रमक घोषणांच्या मधून हिंदुत्व नावाच्या अस्तित्वात नसलेल्या मायावी कल्पनेत इथल्या जनसामान्यांना अडकवून हिंसेला चितावणी देत सतत पुढे नेत आले आहेत ,त्यामुळे भारतामध्ये सनातनअध्यात्मिक विचारसरणीच्या संघटनांनी राजकीय पक्षावर कब्जा केला आहे, आपला आध्यात्मिक अजेंडा पुढे नेण्यासाठी निरंकुश सत्तेचा राजकीय पक्ष हा तयार करणे, तो ईव्हीएमच्या पक्ष फोडीच्या विकत घेण्याच्या अनेक मार्गातून पाशवी बहुमताचा स्वयंपाक बनवणे व इथे पक्षीय राजकारण करू पाहणारे धर्मनिरपेक्ष व बहुसंस्कृतिक हे वास्तव मान्य करून तो संविधानाचा मार्ग स्वीकारून पुढे जाणारे संसदीय राजकारण करणारे विरोधी राजकीय पक्ष भारतभरचे संपवणे हे सध्या चालू आहे, जर येथील केंद्रस्थानी असलेल्या सरकारचे मनसुबे असतील तर भारतातील फासी वाद हा कसा येतो आहे हे समजावून घेणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे, भारतात येऊ घातलेला फासी वाद हा अनेक विकृत नृशंस निर्मम पद्धतीने पुढे येत आहे, तो विचार करणारे संपवणे ,त्या विचाराचे नायक संपवणे ,लोकशाहीच्या संस्थात्मक सर्व संस्था ताब्यात घेणे, राजकीय पक्षाचे नेते समाजाच्या नजरेतून आरोपी आणि गुन्हेगार ठरवणे ,त्यांना तुरुंगात टाकून ते राष्ट्रद्रोही,
ते कायद्याच्या दृष्टीने कायम गुन्हेगार आहेत हे सतत बाजारी कार्पोरेट प्रसार माध्यमांच्या मार्फत भारताच्या जनतेच्या मनावर सतत बिंबवण्याचे प्रयत्न इडापिडा टळो या बळीराजाच्या प्राचीन संस्कृतिक आक्रोशाचे रूपांतर इथे केंद्र स्थित सरकारने एक्सटेन्शन पार्टी या नव्या खात्याला आता तयार केले आहेत.
भारतातला येऊ घातलेला फासी वाद हा सतत ऑक्टोपस सारखा आकार बदलत तोंडे बदलत, चेहरा बदलत पुढे निघाला आहे, तो भारतातील सर्व नैसर्गिक साधन संपत्ती कार्पोरेट घराण्यांच्या हातात देत आहे. भारताची सर्व सार्वजनिक प्राधिकरणे विकत आहे. भारतातील सर्व राजकीय पक्षांना भयकंपित करत आहे, भारतातील जनमनातील नेते यांना षडयंत्र रचून प्रतिमा व शरीर रूपाने संपवण्याची नृशंस रणनीती सतत आखत आहे, भारताच्या फाशीवादाच्या वाटा आडवळणाने तुरुंग, राष्ट्रद्रोही, गुन्हे ,सायबर गुन्हे, जामीन नाकारणे, ईडीच्या चौकशीत अडकवणे, एक समाज एक गट दुसऱ्या समाज गटावर शत्रू भावी पद्धतीने संघर्ष करेल असे सांस्कृतिक राजकारण पेटते ठेवणे, एक अल्पसंख्यांक जनसमुहांना अराष्ट्रिय ठरवणे, दुय्यम नागरिकत्व स्वीकारण्यास भाग पाडणे, आतले आणि बाहेरचे असा सनातन संघर्ष उभा करणे, मार खाणारे, मारणारे असे शत्रू तयार करणे, संस्कृती धर्म भाषा हे धोक्यात आले आहेत असा शत्रू सतत दाखवणे आणि समाज नेहमी भय ग्रस्त व सुडवादी तयार करणे यातून भारताचा फासिवाद हा समाज समाजाच्या संघर्षाच्या ठिणगीपर्यंत नेण्याचे डाव रचले गेले नाहीत असे नाही, भारतातील फा सी वाद हा लोकशाही संविधानाचे महत्व कमी कमी करत नष्टीकरण करत पुढे जाणार आहे, एक धर्मराष्ट्र यातूनच प्रस्थापित करता येऊ शकते याचे जागतिक साम्राज्यवाद्यांच्या शी मिळवणी करून चाललेले प्रयत्न हे जनसामान्यांना कळत नाहीत, कळले तर इथले युवक लेखक इथले शिक्षक इथले कार्यकर्ते हे रस्त्या रस्त्यावर फाशीवादाबद्दल बोलत नाहीत,
भारतातील फाशीवाद पोलीस, मिलिटरी, प्रशासकीय यंत्रणा, न्याय करणारी यंत्रणा, कार्पोरेट यंत्रणांचा शोषण वाद त्यांच्या हातात आपसूकपणे मिळत जाणारी या देशाची सार्वजनिक संपत्ती या स्वरूपात भारतीय फासिवाद पुढे निघाला आहे, त्यामुळे भारतीय फासीवादाचा मुकाबला करणे म्हणजे ७५ वर्षाच्या स्वातंत्र्य महोत्सवात स्वातंत्र्यानंतर फाशीवादासी लढण्याचा दृढ संकल्प करण्याची नितांत गरज आहे एवढेच.
शिवाजी राऊत
प्रेस सातारा
दिनांक ९ ऑगस्ट २०२२
वेळ साय ७.०५