प्रिय अध्यापक
हमे सही रास्ते पर ले चलो
उन लोगों के पथ पर जीन पर तुमने विशेष अनुग्रह किया है
मौलाना अबुल कलाम आझाद
वर्तमान हा सर्वकाही सारखा नसतो हे खरेच वर्तमान हा समस्या घेऊन जेव्हा येतो तेव्हा वर्तमानाच्या कालखंडातील प्रत्येक घटक हा समस्यांच्या निरसनासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नरत राहत भारतामध्ये देशाचे पूर्णतः कार्पोरेट प्रायव्हेटायझेशन होत असताना या देशातील सर्व प्रकारच्या व्यवस्था दळमळीत होत आहेत विशेषतः शिक्षण क्षेत्र हे नवे शैक्षणिक धोरणाच्या घोषणेनंतर खूप अस्वस्थपणे पुढे जात आहे शिक्षण आणि समाज हे नेहमी प्रश्न आणि ज्ञान घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात भारतातील शिक्षण व्यवस्था ही प्रभुत्व जाती आणि वर्ग यांच्या हातून स्वातंत्र्योत्तर काळात बाहेर गेलेली आहे शिक्षण हे लोकशाहीला व्यक्तींना सक्षम करते अशा शिक्षण व्यवस्थेच्या डळमळीत अवस्थेबद्दल सामान्य घटकांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे पण अस्वस्थता आणि प्रयत्न हे जर एकत्रित आले नाहीत तर यातून साध्य होणे असंभव आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील अस्वस्थता ही शिक्षणाचे पूर्ण खाजगीकरण होणे ही आहे गरिबांचे शिक्षण आणि श्रीमंतांचे शिक्षण तंत्रज्ञान युक्त उच्चवर्णी यांचे शिक्षण आणि तंत्रज्ञान अभावी वंचितांचे शिक्षण असे दोन वर्ग या देशात एकाच वेळेत तयार करण्याचे मनसुबे ज्या राज्यकर्त्या वर्गाने तयार केले आहेत त्यांचे काळे कारणामे समजून घेणे हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे
शिक्षणात धोरणे असतात नियम आणि कायदेही असतात धोरणे आकर्षक असतात नियम आणि कायदे किचकट असतात नवे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारताच्या विभाजनाची रणनीती आखलेली आहे आकर्षक घोषणांचा पाऊस आहे अर्थत्वदनाशी शिक्षण जोडण्याचे अभिवचन दिले आहे समस्येला सामोरे जाणारे शिक्षण दिले जाईल असेही म्हटले आहे संस्कृतीचे उदात्तीकरण शिक्षणातून करणे इतिहासाचे पुनर्लेखन करणे अनामिकांचा इतिहास नष्ट करणे भाषेच्या मौखिक परंपरा पुनर् स्थापित करणे गणित विज्ञान यासारखे विषय हे दैनंदिन जीवनाशी जोडणे परिसराच्या गरजा समजावून घेणे त्यानुसार अभ्यासक्रम व व्यवसाय कोर्सेस तयार करणे तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन शिक्षणाचे क्षेत्रात काम करणे प्रत्येकाने शिक्षण दूत होणे शिक्षण ही सामूहिक जबाबदारी ठरवणे सरकारने शिक्षणाची जबाबदारी हळूहळू कमी करणे आणि ज्याच्याकडे क्षमता आहे तो शिकेल ज्याच्याकडे क्षमता नाही तो पारंपारिक व्यवसायांच्या मध्ये जीवनाची रोजी रोटी शोधत राहील अशी एक विषमता अधिष्ठित व्यूहरचना नव्या शैक्षणिक धोरणात केलेलीआहे
अशा वेळेला भारतातील आणीबाणीत शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्यार्थी शिक्षक पालक हे घटक संभ्रमित होणे स्वाभाविक आहे पण हा संभ्रम भयाकडे न जाता कृतीच्या दृढ संकल्प मध्ये याचे रूपांतर होणे अत्यंत आवश्यक आहे शिक्षण आणि शिक्षक याचे नाते नव्याने सांगण्याची गरज नाही वर्तमानाचे ज्ञान समस्यांचे ज्ञान प्रश्नांचे ज्ञान उपायांचे ज्ञान अनुभवाचे ज्ञान कृतीचे ज्ञान आणि नवनिर्माण चे ज्ञान हे शिक्षणातून मिळते शिक्षण हे क्षमता देते शिक्षण हे जीवन साक्षरता देते शिक्षण वेदना देते शिक्षण वेदनेचे हात देते शिक्षण वेदनेचा नेत्र देते शिक्षण सहजीवनाचा धडा देते शिक्षण स्वातंत्र्य देते शिक्षण विचार देते शिक्षण विचारातून नवनिर्माणाचे आकलन विकसित करते शिक्षण हे क्षमतांचे विकासाचे अविष्कृत असे पर्यावरण असते. शिक्षण हा बौद्धिक विकास आहे शिक्षण ही विचार प्रक्रिया विकसित करण्याची निरंतर प्रक्रिया आहे शैक्षणिक क्षमतांच्या विकासाची संधी आहे शिक्षण हा मन मेंदू मनगटांचा विकास आहे त्याचबरोबर शिक्षण हे जीवन उन्नयनाचे मूल्य विकासाचे निरंतर आकलन आहे या प्रकारचा शिक्षणाचा मूलभूत विचार नव्याने रुजण्याची नितांत आता गरज आहे स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा विचार साक्षरता वाचन लेखन स्मरण पाठांतर आणि शक्य तेवढे उपयोजन असा शिक्षणाचा मर्यादित विचार शिक्षण धुरीनांच्या मनामध्ये होता शिक्षकांची तीच भूमिका होती
आजचा शिक्षक हा पारंपरिक शिक्षणाच्या अध्यापन पद्धतीतून पूर्णता बाहेर पडलेला नाही कथन या भूमिकेत तो आहे शिकवणे या भूमिकेत तो रमतो आहे पाठय क्रमाला प्रमाण मानणारा शिक्षक हा भविष्याला समजून घ्यायला कमी पडतो आहे गतिमान काळाचे परिणाम वेगाने होत आहे याचे परिपूर्ण आकलन आजच्या शिक्षकांना करून घेताना आणि अडचणी येत आहेत तंत्रज्ञानाचा वेग विज्ञान क्षेत्रातील नवनवीन मज्जा विकासाचे निष्कर्ष प्राप्त पर्यावरण शिक्षण संधीचा अभाव व नियमाने कायद्यांच्यामुळे होत असलेले समाजाचे विभाजन यामुळे समाजामध्ये जे वर्ग तयार होतात त्याचा विस्फोट कधी होईल याचे आकलन आजच्या शिक्षकांना नाही गरिब यांच्यामध्ये भीती आणि असंतोष वाढतो आहे ही व्यवस्था आपली नाही असा निराशावाद शिक्षणाची संधी नाकारल्यामुळे रुजू लागला आहे याचा विचार करून आजच्या शिक्षकांनी अमुलाग्र आपल्या व्यक्तिमत्व अध्यापन पद्धतीत बदल करण्याची गरज आहे
आजच्या शिक्षकाची मानसिकता परिपूर्णपणे बदलण्याची नितांत गरज आहे मी नोकर आहे मर्यादित वेळेत मी अध्यापन करणार आहे माझ्या विषया पलीकडे मी पाहणार नाही माझा आणि विद्यार्थ्यांचा अध्यापना इथपर्यंतच संबंध आहे मूल्यमापनाच्या पलीकडे माझ्या हातात काही नाही अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाण्याची मला गरज वाटत नाही नेमून दिलेले काम करणे एवढेच माझे प्रामाणिक कर्तव्य आहे या मर्यादित भूमिकेतून पुढे निघालेले शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांचे वर्तन यामध्ये खूप आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे
आजचा शिक्षक हा सतत बदलणारा क्षमता प्राप्त करून घेणारा काळानुरूप आकलनामध्ये वाढ करणारा हे तयार करण्याची गरज आहे आजच्या शिक्षकांची मानसिकता त्रयस्थ उदासीन व सर्वात जास्त नकारात्मक व बंदिस्त अशी आहे ही बंदिस्त मानसिकता बदलून खुल्या मानसिकतेचा सकारात्मक विचाराचा ऊर्जावान शिक्षक हा प्रशिक्षणातून तयार करण्याची गरज आहे प्रशिक्षण हे वेळ वाया घालवणारे आहे असा कांगावा करण्याची गरज नाही जागतिक स्तरावरील प्रयोग नवे दृष्टिकोन नवे आकलन नवनवीन उपक्रमशीलता ही ज्या अनुभवी व्यक्ती आणि प्रशिक्षकांच्या अंगी असते त्या तज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा हा नव्या पिढीतील शिक्षकांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे आजचा शिक्षक हा सतत ज्ञानार्थी व्हायला हवा तो प्रयोग करता व्हायला हवा तो विद्यार्थी केंद्रित असायला हवा तो समस्यांच्या निरसनासाठी अग्रेसर भूमिका घेऊन पुढे असायला हवा त्याचा दृष्टिकोन हा ज्ञानप्राप्तीचे मार्ग दाखवून देणे ज्ञान प्राप्त कसे करता येते ती कौशल्य कोणती आहेत हे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवणे हे आजच्या शिक्षकाचे काम आहे विद्यार्थी ही एक ऊर्जा असते विद्यार्थी ही एक बुद्धीचे क्षमतेचे संचित असते त्याची भाषा त्याचे उपजत गुण त्याची कौशल्य ही निवडून त्याच्यावर प्रायोगिक पद्धतीने अध्यापन करणे आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला सतत उन्नयनाचा अवकाश प्राप्त करून देणे हे शिक्षकाचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे
आजचा शिक्षक मातृदयी समतावादी असायला हवा तो सकारात्मक विचाराचा असायला हवा शिक्षकाला सर्व समजते ही अधिकार शाही टाकून द्यायला हवी समाजाच्या असंख्य क्षेत्रात ज्ञानाचे खूप भांडार आहे म्हणून आजच्या शिक्षकांनी कला साहित्य संगीत नृत्य संशोधन याचबरोबर पारंपारिक व्यवसायातील मातीकाम सुतारकाम चित्रकला सुतक ताई रंगकाम सर्व प्रकारच्या कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधनाच्या बागा विकसित करणे वितरण व्यवस्था बाजारपेठ फळ प्रक्रिया यासारख्या अनेक जीवनाला व्याप्त असलेल्या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास शिक्षकांचा असायला हवा त्यातूनच आजचा विद्यार्थी हा जीवनाच्या गरजा आणि प्रश्न सोडवण्याच्या क्षमता प्राप्त करू शकतो किंबहुना या क्षमता त्यांच्या अंगी येण्यासाठी शिक्षकाने कल्पक संयोजित संलग्न असे अध्यापन ग्रामीण स्तरावर रचना करून करण्याची गरज नव्या शिक्षणामध्ये निर्माण झालेली आहे ती अभिप्रेत धरण्यात आली आहे
शिक्षकाची मानसिकता ही राष्ट्र निर्माण करण्याच्या कार्याची असायला हवी माझे त्याच्याशी कर्तव्य नाही ही अलिप्तता हे विभाजन आहे माझ्या सांस्कृतिक विचारधारा दूर ठेवून मी राष्ट्रीय विचारधारेच्या संविधानात्मक मूल्यांचा प्रबोधन करणारा घटक आहे याचे आकलन आजच्या बहुतांश शिक्षकांना नाही हे आगामी काळात फार मोठे आव्हान असणार आहे अभ्यासक्रमाने संविधान अभ्यासक्रमाने राष्ट्रीय एकात्मता अभ्यास क्रम आणि दारिद्र्य याचा संबंध काय आहे हा संबंध दाखवून देणे त्याची कारणे सांगणे त्या कारणांच्या निर्मूलनासाठी कोणते प्रयत्न सामूहिकपणे करण्याची गरज आहे हे शिक्षकांनी समुपदेशकाच्या पातळीवर विद्यार्थ्यांना सांगण्याची नितांत गरज आहे आजचा शिक्षक ही भूमिका पार पाडत नाही मुळामध्ये शिक्षक हा राष्ट्र निर्माण करणारा दुःख निर्मूलन करणारा असा परिवर्तनाचा मुख्य घटक आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षण आणि समाज परिवर्तन हे एक होते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये परिवर्तन आणि शिक्षण या दोन्हीही क्षेत्रामध्ये जमीन आसमानच् अंतर हेतूता हा निर्माण करण्यात आले आहे त्याचे दुष्परिणाम समाज विघटित झाला आहे समाजा समाज मध्ये द्वेष आणि असंतोष निर्माण झाला आहे हे आजच्या शिक्षकाला समजते आहे परंतु त्याची काही एक भूमिका नाही त्यामुळे शिक्षणाच्या उद्दिष्टातील समाजाचे ऐक्य राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य कागदावर पाठ्यपुस्तकातच राहात असल्याचे आढळून येत आहे म्हणून आजच्या शिक्षकाने स्वयं एकात्मतेची भूमिका घेणे समतेचे वर्तन करणे विषमतेच्या निर्मूलनासाठी अग्रभागी असणे आणि आदर्श कृतीतून समाज बदलासाठीची हृदय परिवर्तनाची भूमिका विचारातून परिवर्तित करणे अत्यावश्यक आहे आजचा शिक्षक हे समजावून घेईल तरच नव्या बदलायला सुरुवात होऊ शकेल
शिक्षण ही कथनाची अंशतः गोष्ट आहे त्याहून शिक्षण हे कृतीचे हस्त उद्योगाचे अनुभवाचे तर्काचे अंदाजाचे ज्ञान आहे शिक्षण हे ज्ञान आहे शिक्षण हा विचार आहे शिक्षण ही क्षमता आहे शिक्षण ही निव्वळ अक्षर ओळख नाही शिक्षण हे श्रम निर्माण आहे शिक्षण हे अर्थ उत्पादन आहे शिक्षण ही मानव्याची विकसित अशी तत्त्वज्ञानाची निरंतर चालणारी समाज प्रक्रिया आहे हे शिक्षकांना सदोदित प्रतीत व्हायला हवे हे प्रतीत होण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत गरज आहे शिक्षकांचा दृष्टिकोन राष्ट्रवादी संविधानवादी अर्थोत्पादनवादी असा निर्माण होण्याची गरज आहे समाज आणि शिक्षण हे वेगळे नसते समाजातील सर्व प्रश्नांना भिडण्यासाठी क्षमता निर्माण करणे हे शिक्षक आपले मुख्य कर्तव्य मानतील तो दिवस भारतीय शिक्षणाच्या क्रांतीचा क्षण असेल
स्मरण आणि श्रम यांच्यात विभाजन करणारे शिक्षक समाज विभाजित करतात श्रमही महत्त्वाचे आहे आणि स्मरण विकासही महत्त्वाचा आहे श्रम ही श्रेष्ठ आहेत आणि स्मरणही श्रेष्ठ आहे स्वातंत्र्योत्तर काळात अक्षर स्मरणाच्या अहंकाराने विकसित झालेल्या पुढे गेलेल्या अनेक पिढ्यांनी श्रमक्षेत्राला तुच्छतेने पाहिले वागवले त्यामुळे श्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा तुच्छतावाद हा भारतीय शिक्षणाला कळाला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते
राष्ट्रपती महात्मा गांधींच्या नई तालीम या शिक्षण प्रणालीत जीवनाच्या हरेकक्षेत्राची क्षमता व्यक्तीच्या अंगी आली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने जीवनाच्या मर्यादित गरजां ठेवल्या पाहिजेत हृदयाचा हाताचा व मेंदूचा विकास ही त्रयी नई तालीम शिक्षणामध्ये आहे आजच्या शिक्षण क्षेत्रात मज्जा विकास हे प्रधान सूत्र आहे पण ते हृदय विकासाशी जोडले नाही तर हिंसा आणि भ्रष्टाचार हे शिक्षणातून निर्माण होणाऱ्या राष्ट्रविरोधी खूप प्रवृत्ती देशाला उध्वस्त करतात हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे शिक्षणातून सहृदयता संवेदनशीलता व कृतिशीलता अविष्कृत झाली पाहिजे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट अनेक शिक्षण तज्ञांनी मान्य केले आहे समाज आणि शिक्षण व्यक्ती आणि शिक्षण यांचा अनुबंध या मूल्यांच्या विकासाला शिवाय जोडला जात नाही आणि म्हणूनच शिक्षकांनी शिक्षणाचा निरंतर विचार हा कौशल्याने मूल्य या अंगाने करण्याची स्मरण आणि गुण आणि मूल्यमापन हे शिक्षणाचे सोपस्कार आहेत ते कर्मकांड आहे त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी हा प्रधान घटक आहे त्याचे संचित कौशल्यज्ञान विकसित करण्याचे अविरत प्रयत्न आजचे शिक्षक करतील तर त्यासाठी त्यांच्या सर्वांगीण प्रशिक्षणाची गरज आहे
शिक्षकाची भाषा आत्मपौळीची असता कामा नये. शिक्षकाची भाषा विचारशील तर्कयुक्त अनुमान काढणारी अशी असायला हवी केवळ माहितीची बंबाळता आणि विचार संकल्पनाचा अभाव ही भाषा शिक्षकांनी टाळायला हवी मुळात माहिती खैरात ही ज्ञान निर्माण करत नाही विचारपुढे नेत नाही विचार कसा करावा हेही शिकवत नाही शिक्षकांनी शिकायला शिकवावे शिक्षकांनी विचार करायला शिकवावे विचार कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्येक शिक्षक होय शिक्षक ही ऊर्जा आहे शिक्षक हे नेतृत्व आहे शिक्षक हे ज्ञानाचे प्रात्यक्षिक आहे शिक्षक ही कृतिशीलता आहे शिक्षक ही सेवावृत्तीची जीवनसाधना आहे असे विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या वर्तनातून अनुभवास या वयास हवे असे शिक्षक आपले वर्तन सतत सुधारणावादी करीत राहतील यासाठी शिक्षकांच्या अध्यापन काळात निरंतर कल्पक प्रशिक्षणांची आयोजनाची गरज आहे
आपण सतत अपूर्ण आहोत आपण अनेक क्षमता प्राप्त करायला हव्यात त्यातूनच विद्यार्थी हे शिक्षकाला आदर्श मानून अनुकरणातून त्या आदर्श व्यक्तिगत जीवनात स्वीकारतात हे ज्ञानाचे गुणांचे संक्रमण वर्तन शिक्षकाला माहित आहे म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रसंगी नेता सततचा मित्र सततचा मार्गदर्शक सततचा आत्मविश्वास देणारा अनुभवाचा आधार म्हणून भूमिका निभवायला हवी यासाठी आजचे शिक्षक हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून घेताना स्वयंक्षमतांच्या विकासाचा अविरत प्रयत्न करतील तो त्यांनी करायला हवा असा अपेक्षा वाद त्यांच्याबाबत बाळगणे गैर ठरणार नाही आजचा त्याचे प्रयत्न त्याचे ज्ञान त्याची कृतिशीलता हीच उद्याची राष्ट्र निर्माण ची विकसित होणारी पाऊलवाट आहे हे कधीही न विसरता शिक्षण आणि राष्ट्र एक असतात राष्ट्र आणि शिक्षण हे एकमेकाला परिपूर्ण संपृक्त विकसित करण्याचे संयुक्त प्रयत्न करीत असतात हे न विसरता नवे शैक्षणिक धोरण 2020 या सामोरे जाताना प्रशिक्षणाच्या नव्या आयोजनाची खूप गरज प्रतीत होते हे लक्षात घ्यायला हवे
समाजात प्रचंड ज्ञान आणि क्षमता प्रयोगशीलता नाविन्य अर्थक ऊर्जा असते या सर्वांची एकत्रित जोड करणे आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला हे सगळे अनुभव क्षण प्राप्त करून देणे यासाठी खूप उपक्रम व विचारशीलता अमलात आणण्याची नितांत गरज आहे आजचे शिक्षण क्षेत्रातील धुरीन संस्थाचालक राज्यकर्ते परिवर्तनाच्या क्षेत्रातील कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातील असंख्य तळमळीचे घटक या सर्वांचा विचार करतील प्रत्येक नवा क्षण नवा अनुभव नव्या क्षमता नवे आकलन हा दृष्टिकोन हरेक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतील तरच हे शिक्षण क्षेत्र शिक्षकांनी पुन्हा राष्ट्र निर्माणच्या कार्याला जोडले असे म्हणता येईल अन्यथा नवे शैक्षणिक धोरण 2020 हे गोंडस जरी असले तरीही ते पूर्णतः आकर्षक म्हणूनच राहील हे होऊ द्यायचे नसेल तर खूप गांभीर्याने शिक्षक प्रथम शिकतो विद्यार्थी नंतर आत्मसात करतो या नव्या सूत्राने प्रशिक्षणाची गरज सर्वांना प्रतीत होईल असा आशावाद गैर ठरणार नाही
शिवाजी
राऊत शिक्षण अभ्यासक
सातारा11 आगस्त 22 वेळ 9.10