कमळवेल्ली ग्रामपंचायत कडून तिरंगा जनजागृती रॅली

कमळवेल्ली ग्रामपंचायत कडून तिरंगा जनजागृती रॅली

कमळवेल्ली ग्रामपंचायत कडून तिरंगा जनजागृती रॅली.

या रॅलीत जि.प.व.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा व सर्व शिक्षकवृंदाचा सहभाग

सुनील शिरपुरे/झरीजामणी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कमळवेल्ली ग्रामपंचायतच्या वतीने जि.प.व.प्राथमिक शाळेच्या सहभागासह आयोजित ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये १५० ते २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्य ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या जनजागृतीसाठी ग्रामपंचायत कमळवेल्लीच्या वतीने जि.प.प्राथमिक शाळेच्या सहभागासह आयोजित तिरंगा जनजागृती रॅलीत जि.प.व.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी रॅलीत देशभक्तीपर घोषवाक्य, भारत माता की जय, वंदे मातरम्‌ अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये ग्रामपंचायत कमळवेल्लीचे सचिव श्री पी.एन.बद्दमवार, सरपंच पुष्पाबाई चुक्कलवार, उपसरपंच वामनराव हलवेले, सदस्य गणेश नुगुरवार, शिपाई मोहन शिरपुरे, संगणक चालक विपुल कर्णेवार, अंगणवाडी सेविका उमाताई बारेवार, आशावर्कर मिनाताई परचाके, नागरिक मोहनराव कोरेवार, श्रीकांतभाऊ बारेवार, पवन गेडाम, महेश चुक्कलवार, कृषी उमेदच्या कार्यकर्त्या अश्विनी चुक्कलवार, बचतगटाच्या कार्यकर्त्या वर्षा गेडाम, विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा सहभाग होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *