भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मुंबईच्या बरेटो हायस्कूलच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी काढली भव्य सायकल रॅली

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईच्या बरेटो हायस्कूलच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी भव्य सायकल रॅली काढली.
रॅलीचा मार्ग बॅरेटो हायस्कूल-ऑपेरा हाऊस-गिरगाव चौपाटी-मरिन ड्राइव्ह-आझाद मैदान-चर्चगेट आणि बरेटो हायस्कूल असा होता. सकाळी 6.00 वाजता रॅलीला सुरुवात झाली आणि विद्यार्थी सकाळी 7.30 वाजता शाळेत परतले. या रॅलीत १०० हून अधिक स्काऊट आणि गाईड सक्रिय सहभागी झाले होते. प्रत्येक सायकलवर आपला राष्ट्रध्वज – तिरंगा बांधलेला होता.
सायकलचे महत्व सांगणारे फलकदेखील विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलला जोडले होते. हा अनुभव अत्यंत सुंदर होता व या रॅलीच्या निमित्ताने आपणास एक नवी सायकल नावाची मैत्रीण मिळाली अशी प्रतिक्रीया या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली.
रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांनी हिंसाचार, आतंकवाद, भ्रष्टाचार, भेदभाव, आणि नारींवरचा अत्याचार या बाबींना थारा न देता देश उभारणीसाठी बंधुभाव व राष्ट्रप्रेमाला चालना देण्यासाठी एकात्मता जोपासत भारतीयत्वाला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम शाळेचे स्काऊट मास्टर श्री.सागर वणवे सर यांनी मुख्याध्यापिका सिस्टर सिलीन डीमेलो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *