धुळे – स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सव निमित्त धुळे पोलिस अधिक्षक मा. प्रविण कुमार पाटील यांना आजाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या वतीने भरतीत राष्ट्रध्वजाची प्रतीकात्मक फ्रेम भेट देण्यात आली.
संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सव निम्मित विवीध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.आजाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका निहाय सर्व अधिकाऱ्यांना तसेच महाविद्यालय , विविध सामाजिक संस्था यांना आपल्या दालनात व कार्यालयात लावण्यासाठी भारताचे राष्ट्रध्वज तिरंग्याची प्रतीकात्मक फ्रेम भेट दिली जात आहे. यामागील सामाजिक बांधिलकी वाढून देशातल्या विवीध जाती धर्माच्या झेंद्यांपेक्षा आपला तिरंगा हा सर्वोपरी आहे. भारतीय राज्यघटना आणि आपला राष्ट्रध्वज याच्या बद्दल प्रत्येक अधिकारी, कर्मचारी,नागरिक, विदयार्थी,विद्यार्थिनी आणि लहान मोठे सर्वच याने प्रेम अणि स्वाभिमानाने त्यांचे पालन करावे. व जगात सर्वात सुंदर अशी लोकशाहीचा मान उंचावण्यासाठी आपले राष्ट्रप्रेम खर्ची करावे.असे मत आनंद लोंढे यांनी व्यक्त केले.
तसेच घरघर तिरंगा या मोहिमेतून प्लास्टिकचे अथवा चुकीच्या मापाचे , रंगाचे राष्ट्रध्वज बाजारात आले आहेत.अश्या व्यापाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी.अशी मागणी केली.
यावेळही आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, समाज समता संघ जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, धुळे जिल्हाध्यक्ष,अनिल ठाकुर, जिल्हा संघटक रवी कढरे, तालुका अध्यक्ष सुदाम भामरे, राहुल पाटील, सुधीर फुलपगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
