भारताच्या 42 च्या ऑगस्ट क्रांतीचे साताऱ्याचे नऊ हुतात्मे ; गांधीजींच्या करू वा मरू या मंत्राला जागणारे हे महान सुपुत्र

भारताच्या 42 च्या ऑगस्ट क्रांतीचे साताऱ्याचे नऊ हुतात्मे ; गांधीजींच्या करू वा मरू या मंत्राला जागणारे हे महान सुपुत्र

भारताच्या 42 च्या ऑगस्ट क्रांतीचे साताऱ्याचे नऊ हुतात्मे
गांधीजींच्या करू वा मरू या मंत्राला जागणारे हे महान सुपुत्र

9 ऑगस्ट 1942 रोजिंnमुंबई येथे अनेक स्वातंत्र्यसेनानीला अटक झाल्याच्या निषेधार्थ पेटून उठणारा संपूर्ण भारतातील एकमेव अग्रेसर जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा होय सातारा जिल्हा करू किंवा मरू या गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देऊन क्रांतीच्या वेदीवर पुढे निघाला हा जिल्हा होता या जिल्ह्यातील सामान्य माणसाच्या अंतकरणांमध्ये असंतोष पेटला होता मुळात हा असंतोषाचा जिल्हा आहे येथे देशाचे जन मन ओळखण्याच्या आंतरीक प्रेरणा आहे उद्या चे भान असणारा हा इतिहास कालीन जिल्हा आहे

सातारा जिल्हा तेव्हा नव्हता उत्तर सातारा असा तो जिल्हा होता उत्तर साताऱ्याच्या या जिल्ह्याने छोडो भारत ही हाक ऐकली आणि 9 ऑगस्ट 1942 ते 26 जानेवारी 1943 या काळामध्ये 23 वेळा या जिल्ह्यामध्ये हाता पाळण्याच्या सामूहिक घटना लोकांनी केल्या 167 प्रभात फेऱ्या लोकांनी काढल्या व 145 जाहीर सभा या कालावधीमध्ये घेण्यात आले 24 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 42 या कालखंडात विविध तालुक्यांच्या कचेऱ्यांवर सहा मोर्चे काढणारा हा सातारा जिल्हा क्रांतीच्या या संघर्षात कीर्तने भजने व पोवाडे हे गाण्यालाही विसरला नव्हता भूमिगतांचा वावर या जिल्ह्यामध्ये प्रचंड होता गोपनीय पत्रके काढणे आणि ती वाढणे ही या जिल्ह्याची सामान्य बाब झाली होती

42 च्या लढ्यातील ये सातारा जिल्ह्यामध्ये लोकांच्या जनजागृतीचे साधन म्हणजे रेल्वे पाडणे आश्चर्यकारक बाब म्हणजे दिसूद भिलवडी किर्लोस्करवाडी कराड शेनोली ताकारी ही रेल्वे स्टेशनची त्या काळामध्ये घातपाताची केंद्रे बनली होती सात वेळा रेल्वे पाडण्यात आल्या दहा वेळा त्या यशस्वी झाल्या रेल्वे स्टेशन जाळणे गाड्या लुटणे आणि अपघात घडवणे हे भूमी गटांचे स्वातंत्र्यसेनानींचे ब्रिटिश राज्याविरुद्धचे हे आंदोलन हिंसक ते कडे गेले होते

संवादाची साधने तत्कालीन असलेल्या टेलिफोन व टेलिग्राफ च्या तारा तोडणे ही स्वातंत्र्याची कृती ठरवली होती या संयुक्त साताऱ्याच्या आंदोलकांनी 146 ठिकाणच्या टेलिफोनच्या तारा तोडल्या तसेच 383 टेलिफोनचे खांबो उठून टाकले आणि 542 इन्सुलिटर्स फोडून टाकले होते 42 च्या आंदोलनात क्रांतीची ही छोटी छोटी कृती ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अथक धाडसाची गोष्ट बनली होती किंबहुना याच मार्ग आंदोलन पुढे निघाले होते

महात्मा गांधींना आपल्या हिंसक आंदोलनाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील या घातपाताच्या कारवायांना काळजीच्या वाटत होत्या म्हणून गांधी हे नेहमी सातारा जिल्ह्यातील आंदोलकांना शस्त्र खाली टाका सत्याग्रहात सहभागी व्हा असे आवाहन करण्या साठी प्रयत्नशील होते अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन यांच्यामार्फत बैठका घेऊन असे संदेश ही त्यांनी पोहोचवले होते ब्रिटिशांची कार्यालय असलेल्या सरकारी इमारतींना घातपात घडवणे 33 वेळा अशा इमारती फोडण्यात आल्या त्या सहा वेळा जाळण्यात आल्या पोस्ट सेवा खंडित करण्यात आली. पोस्टाच्या पिशव्या व पत्र पेट्या पळवून नेण्यात आल्या पोस्टाच्या गाड्या लुटण्यात आल्या एक पोस्ट कार्यालय जाळण्यात आले होते

सातारा जिल्हा हा भूमिगतांचा जिल्हा होता इथे गुप्त पत्रके वाटणे ती प्रसिद्ध करणे ही सर्वात जास्त कृती त्या कालखंडात स्वातंत्र्य सेनानी करत होते पत्रके छापणे पत्रके वाटणे ही स्वातंत्र्याची कृती बनली होती असा या सातारा जिल्ह्याचा इतिहास वंदनीय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ज्या जिल्ह्याने सर्वात जास्त हुतात्मे पत्करले आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपली आयुष्य वेदी वरती अर्पण केली ते शेकडो स्वातंत्र्यसेनानी वडूच्या मोर्चा ने आणि हुतात्म्यांच्या रक्त बलिदानाने स्वातंत्र्य उत्तर काळातही अपार दुःखी झाल्याचे आढळून येते त्या वडूज च्या मोर्चाचे यशोगाण स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या राष्ट्रभक्तीच्या प्रदर्शनीय निकषाच्या कालखंडात समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे

8 ऑगस्ट 1942 सातारा जिल्ह्यातील भूमिगतांनी आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी घेतलेली गुप्त बैठक आणि त्यामध्येच 24 ऑगस्ट 1942 रोजी बाबुराव चरणकर बर्डे मास्तर जोशी काका गणपतराव पाटील इतर भूमिगत नेत्यांनी शिराळा पेट्यातून प्रशासनाचे उच्चाटन केले होते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे एसएम जोशी सुर्वे अच्युतराव पटवर्धन या समाजवादी विचारधारेच्या नेत्यांबरोबर सातारा जिल्ह्यातील भूमिगतांचे संबंध होते ते एकमेकांशी संवाद साधून होते

ऑगस्ट 1942 मध्येच रे बुद्रुक या ठिकाणी एक व्यापक बैठक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती त्यामध्ये आंदोलनाची पुढील रणनीती ठरली होती घातपाताच्या कारवाया व निदर्शनात्मक कार्यक्रम व गोपनीय प्रचार पत्र के हे कार्यक्रम वेगाने पुढे चालले होते पुढे भूमिगतांच्या सामूहिक निर्णयातून वडूज आणि इस्लामपूरचा मोर्चा निश्चित करण्यात आला होता एक नोव्हेंबर 1942 रोजी यशवंतराव चव्हाण यांचे साथीदार किसनवीर हे एरोड्याच्या जेल फोडून चार साथी दार सह बाहेर आले होते

या सर्व आंदोलकांच्या मध्ये एक्सेलचे दादासाहेब साकोळकर इंदोरीचे दिनकर निकम यांच्याशी किसनवीर यांचा संबंध होता किसनवीर यांच्यासोबत तुरुंग फोडण्यामध्ये पांडू मास्तर बोराटे हेही होते त्यामुळे जे गट तयार करण्यात आले त्यात पांडू मास्तर बोराटे यांचा गट कुंडलघट वसंत दादाचा सांगली गट यांचे एकत्रित बैठका त्या कालखंडामध्ये घेण्यात आल्या आणि पुढील आंदोलनाची सप्टेंबरमधील रणनीती ठरवण्यात आली होती
3 सप्टेंबर 1942 तासगाव चा मोर्चा यशस्वी झाला होता त्याची यशोगाथा अतिव गौरवाची नागरिकांच्या मनामध्ये पोहोचली होती सप्टेंबर 42 मध्ये अनेक लोक जनजागृती करीत होते रामभाऊ नलावडे माणिकचंद जोशी बंडोपंत लोंबट्रे बापू कचरे गौरीहर सिंहासने यांनी प्रचाराचा सपाटा लावला होता त्यातच जयराम स्वामीचे वडगाव या ठिकाणी स्वातंत्र्यसेनानी हे मुक्कामाला होते नऊ सप्टेंबर 1942 हा वडुच्या मोर्चाचा दिवस ठरवण्यात आला होता परशुराम घारगे यांची निवड प्रचारक गटाने मोर्चासाठी केली होती 1940 च्या सत्याग्रहात आपणाला सहभाग घेता आला नाही याची मनात बोचणी बाळगणाऱ्या परशुराम घारगे यांनी मोर्चाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले होते मुळात परशुराम घाडगे यांचा जन्म खटाव येथे झाला होता त्यामुळे आपण खटावडूच्या मातृभूमीसाठी मोर्चाचे नेतृत्व करतो आहे या निष्ठेमुळे त्यांची तगमग वाढली होती नऊ सप्टेंबर 1942 रोजी बैलगाडीत बसून डोक्यावर गांधी टोपी घालून हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन परशुराम घारगे वडूज च्या कचेरीकडे निघाले बंदी हुकुम होता आपणास पकडले जाईल हे त्यांना माहीत होते म्हणून तुरुंगात उपयोगी पडणारे कपडे किरकोळ वस्तू त्यांनी सोबत घेतल्या होत्या भरलेल्या वेळेप्रमाणे खेड्यातून जवळपास 2000 पेक्षा जास्त मोर्चेकरी काठ्या दगड कुराडी भाले ही शस्त्रे घेऊन वडूच्या विषयी जवळ जमा झाली होती राष्ट्रीय गाणी म्हणत होती घोषणा देत होती ठीक अडीच वाजता मोर्चा कचेरी जवळ आला घोषणा वाढू लागल्या स्वातंत्र्याचा जयघोष ऐकून तत्का तत्कालीन मामलेदार हे कार्यालयाच्या बाहेर येऊन बसले पीएसआय मेंढेगिरी यांनी मोर्चाला सांगितले खबरदार पुढे येऊ नका मोर्चा 30 यार्ड व अंतरावर पुढे आला होता घारगे यांच्यासोबत बंडोपंत लोमटे होते परशुराम घारगे यांनी मामलेदारांना सांगितले सरकारी कचेरीवर झेंडा लावण्याची आमची इच्छा आहे मामलेदार म्हणाले झेंडा लावू देणार नाही तुम्ही परत जाणे बरे हवे तर तुम्ही आमच्यावर लाठीमार करा किंवा आम्हाला कैद करा किंवा तुम्ही आमच्यावर गोळीबार करा आम्ही एक तू स्वर ही मागे फिरणार नाही असे म्हणत ते कार्यालयाच्या दिशेने जाऊ लागले ोर्चेकर्‍यांची निडर वृत्ती पाहून मेंढी गरीब म्हणाले परत फिरा परत फिरा एक फुटबॉल अंतरावर जवळ आले असता मेंढीगिरीने अंतिम सांगितले तुमच्यावर गोळ्या झाडण्यात येतील ऐकून पुन्हा जमाव संतप्त झाला नाही म्हणू लागला मेंढीगिरीने आपल्या रिवाल्वर मधून नऊ गोळ्या आणि जमावाला उपस्थित असलेल्या पोलिसांनी बंदुकीतून 38 गोळ्या मोर्चावर झाडल्या मोर्चेकरी पळून गेले परशुराम घारगेनी मात्र दोन गोळ्या छातीत झेलल्या होत्या उजव्या हातात झेंडा धरला होता डावा हात छातीवर तसाच होता परशुराम घारगे जमिनीवर कोसळले होते त्यांच्यासोबत होतात्म स्वि कारलेले स्वातंत्र्यसेनानी किसन बंडू भोसले रामू कृष्णा सुतार बाळकृष्ण दिगंबर खटावकर बलभीम हरी खटावकर सिजू भिवा पवार खशाबा मारुती शिंदे हे धारातीर्थी पडले त्यांच्यासह 23 मोर्चे करी जखमी झाले होते रामचंद्र बाळा घाडगे अशोक बंडोपंत लोमटे धोंडीराम रामचंद्र लोमटे शिधा तुकाराम घारगे आनंदा श्रीपती गायकवाड लक्ष्मण जयराम गायकवाड मारुती सिधू माने शंकर श्रीपती घारगे रघुनाथ हरी कांबळे पांडुरंग दत्तात्रेय वडगावे जगन्नाथ बाळा पंत अरविंद बंडोपंत लोमटे उद्धव गोविंद लोमटे अंतु तुकाराम गुरव दादा मारुती घारगे गोविंद राजू न्हावी नवी उस्मान शिकलगार ज्योती हरी भोसले सिद्धू केसू मोरे जगु मारुती यादव आणि काशिनाथ न्यानोबा टाकने हे जखमी झालेले स्वातंत्र्य सेनानी सातारच्या रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले होते

भारताचे माजी राजदूत आप्पासाहेब पंत यांच्या पत्नी नलिनी पंथ या डॉक्टर असल्याने त्या तात्काळ वडूज ला जखमी लोकांच्या उपचारासाठी गेल्या होत्या तुमच्या मोर्चेकर्‍यांच्या विचारपूस करण्यासाठी व भेटण्यासाठी गेलेल्या नलिनी पंत यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भेट नाकारली होती हा इतिहास जिवंत आहे

स्वातंत्र्याच्या वेलीवर सातारा जिल्ह्यातील वडूज च्या नऊ हुतात्म्यांनी जे बलिदान दिले त्या शहीद स्वातंत्र्यवीरांना संपूर्ण भारत देश कोटी कोटी अभिवादन करील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना हुतात्म्यांना अभिवादन ही राष्ट्रभक्तीच ठरते पण स्वातंत्र्य हे पुन्हा सामान्यांच्या कडून अति सामान्य तळातील भारतीय नागरिकांच्या हातात जाणे ही 75 वर्षाच्या मधील कृती घडली नाही स्वातंत्र्याने दिले काय ?आमच्या हाती आले काय? अश्या असंतोषा च्या घोषणा बहुसंख्य समाज व.पीडित वर्ग देत आहे त्याच्या न्यायासाठी हे स्वातंत्र्य ईस्ट इंडिया कंपनी कडून मिळविले आहे ते कार्पोरेट इंडियन कंपनी यांच्या हातात जावू न देणे हेच या वडुजच्या नऊ हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना दृढ संकल्प सर्व भारतीय करतील तरच हे यतार्थ ठरेल

शिवाजी
राऊत. प्रेस
सातारा
14 आगस्त 2022 वेळ 10.10

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *