नवे दानवाड ता.शिरोळ येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वजास पूजन व श्रीफळ तसेच तिरंगा ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना हरिश्चंद्र कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सर्वच माझी सरपंच यांचा व देशाची सेवा बजावणारे आजी माझी सैनिकाचे लोकनियुक्त सरपंच व सर्व विद्यमान ग्रा. प.सदस्य- सदस्या यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच इयता 10 वी मध्ये दत्तवात केंद्रात प्रथम गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या तसेच गावामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 1.अलीशा महमद लाडखान 2.सृष्टी पोपट सुतार 3.श्रुती उमेश पोळ या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच लोकराजा शाहू सार्वजनिक ग्रंथालय येथील प्रांगणात राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व श्रीफळ अर्जुनसिंग रजपूत यांच्या हस्ते तर तिरंगा ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक श्रीकांत बेरड यांच्या शुभहस्ते करण्यात आले
त्यानंतर कुमार विद्यामंदिर प्राथमिक शाळा येथील प्रांगणात 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास आला. राष्ट्रीय ध्वजास पूजन व श्रीफळ शाळा व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत बेरड यांच्या हस्ते तर तिरंगा ध्वजारोहण ग्रा. प.सदस्य पांडुरंग धनगर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमध्ये भाषण केले. अनेक गावातील आजी माझी पदाधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याबाबत मार्गदर्शन करत शाळेबाबत झालेल्या व होणाऱ्या विकास कामाबाबत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना हरिश्चंद्र कांबळे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
वरील सर्वच कार्यक्रमास प्रसंगी गावातील विद्यमान सर्व ग्रा.पं. सदस्य सदस्या, सर्व माझी सरपंच, आजी माझी सैनिक, आरोग्य सेवक सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, विविध संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, पदाधिकारी, प्राथमिक शाळा व आश्रम शाळेचे शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय ध्वजास मान वंदना दिले.
Posted inकोल्हापूर
नवे दानवाड ता.शिरोळ येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
