बेडकिहाळ येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या देसाई व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुमित्रा पाटील कोल्हापूर, अशोक झेंडे. ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ,दत्तकुमार पाटील, व सर्व ग्रा.प.सदस्य बेडकिहाळ तसेच सर्व कार्यकर्ते व पर्यावरण मित्र म्हणून सर्व उपस्थितित होते. हा झाडे वाटप चा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बेडकिहाळ सर्कल जवळ पार पडला. त्यावेळी बेडकिहाळ व परिसरातील 10 खेड्यांमध्ये व संघ संस्था व प्राथमिक शाळेमध्ये झाडे वाटप करण्यात आले.
त्यावेळी आपल्या मनोगतामध्ये
डॉ सौ.सुमित्रा पाटील म्हणाल्या की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम म्हणजे परिसराला आदर्श घेण्यासारखे असतात असे म्हणाल्या.
ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ अशोक झेंडे म्हणाले की झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम म्हणजे ऐतिहासिक पर्यावरण उपक्रम आहे. प्रत्येकजण असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे. कारण पर्यावरण दुषित होऊ नये यासाठी प्रत्येक जण झाडे लावा झाडे जगवा असे आव्हान केले.
तरी जीवन यादव ग्राम पंचायत सदस्य यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व आभार ऍड.प्रिती हट्टीमणी यांनी केले.
Posted inBlog
बेडकिहाळ येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ध्वजारोहण
