राजस्थान मधील ९ वर्षीय विद्यार्थी इंद्रकुमार मेघवालयाला न्याय द्या! महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे आझाद समाज पार्टीची मागणी- आनंद लोंढे

धुळे- राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावातील दलित बालकाची जातीय द्वेषातून फक्त माठातील पाणी पिले म्हणून मुख्याध्यापक कडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निषेधार्थ सर्व भारतभर आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार जोरदार तीव्र निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आजाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार आज महामहीम राष्ट्रपती यांना धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, प्रदेश प्रवक्ते राहुल वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकुर, जिल्हा संघटक रवी कढरे, उपाध्यक्ष सुकलाल बैसाणे तालुका अध्यक्ष सुदाम भामरे, पापा भाई, राहुल पाटील, अॅड. अमोल सिरसाठ, सुधीर फुलपगारे, तौफिक तडवी समाधान चंदनशिवे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.