इंद्र मेघवालची शाळा व अन्य शाळामध्ये काय चालते ?I अस्पृश्यता निर्मूलनसाठी सर्वांना वेदनेचां नेत्र दे l

इंद्र मेघवालची शाळा व अन्य शाळामध्ये काय चालते ?I अस्पृश्यता निर्मूलनसाठी सर्वांना वेदनेचां नेत्र दे l

इंद्र मेघवालची शाळा व अन्य शाळामध्ये काय चालते ?

I अस्पृश्यता निर्मूलनसाठी सर्वांना वेदनेचां नेत्र दे l

साताऱ्याचे स्वातंत्र्यपूर्व काळातील नेते गणपतराव तपासे यांचे अस्पृश्यता निर्मूलन कायदा निर्मितीतील ब्रिटिश काळातील प्रयत्न मौलिक ठरतात भारतात चार ऑगस्ट 1923 रोजी अस्पृश्यांना सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश असायला हवा सरकारच्या निधीतून उभारलेल्या सर्व इमारतीमध्ये त्यांना वावर करता यावा प्रवेश मिळावा यासाठी तत्कालीन समाज धुरीनानी केलेला अस्पृश्यता कायदा तो निर्मूलनाचा छोटा सनदशीर प्रयत्न होता तो अपूर्ण तरतुदीचा प्रयत्न पुढे 19 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या अनुयायासह महाडच्या चवदार तळ्यात जनावरांना जिथे पाणी पिण्यास अधिकार आहे. तेथे आम्हास पाणी पिण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून सत्याग्रह करतात म्हणून सत्याग्रही ंच्यावर सनातनी यांची दगडफेक होते त्यांना तेजखमी करतात त्याच या पहिल्या प्रयत्नानंतर स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात अस्पृश्यतेचा विचार खूप गांभीर्याने म गांधींनी केला म गांधीजींचा अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार हा काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आचरणाचा भाग सक्तीने करण्याचा आग्रह गांधींनी धरला होता काँग्रेसला स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटत होते गांधींना अस्पृश्यता निर्मूलन त्याहून महत्त्वाच वाटत होते
स्वातंत्र्यानंतर अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी अस्पृश्यता पाळणे पाप मानले होते ते प्रभू विरोधी वागणे ठरविले होते पुढे 1955 मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा करण्यात आला त्या सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त प्रवेश असेल मंदिर हॉटेल्स सरकारी कार्यालय यामध्ये त्यांना प्रतिबंध करता येणार नाही असा प्रतिबंध केल्यास अस्पृश्यता विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद होईल आणि शिक्षा होऊ शकते अशा स्वरूपाचा हा कायदा पुढे गांभीर्याने साक्षरतेच्या पातळीवर जायला हवा होता भारतीय संसदेने यानंतर 1989 मध्ये तयार केलेला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा महत्त्वपूर्ण अत्याचार प्रतिबंधक कायदा होता आणि आजही आहे या कायद्याच्या मुळे दलित आदिवासी यांच्या वरील अत्याचाराला प्रतिबंध काही प्रमाणात बसला पण हा कायदा कठोर आहे याचा गैरवापर होतो आहे हि आरोळी ठोकण्यात आली याचा प्रसार माध्यमातून खूप कांगावा करून उच्चवर्णी यांनी ऑगस्ट 2018 मध्ये या कायद्यामध्ये दोन वेळा दुरुस्त्या केल्या आणि या कायद्याची तीव्रता कमी केली ॲट्रॉसिटी चा गुन्हा हा थेट न नोंदवता डिस्टिक मॅजिस्ट्रेटच्या चौकशीच्या सादर अहवालानंतरच हा गुन्हा दाखल करता येईल या स्वरूपाची केलेली दुरुस्ती हि ॲट्रॉसिटी चा कायदा मोडीत काढणारी तरतूदठरली आहे भारतामध्ये दलित आदिवासी यांच्यावरील अत्याचाराच्या त्यातूनच या गुन्ह्याला अप्रत्यक्ष अभय देण्यात आले
राजकीय सुधारणा झाल्या सत्ताही आली लोकशाही पुढे चालली पण या देशातली चातुरवर्ण व्यवस्था अस्पृश्यतेचा अमानुष मनातून काढून टाकत. नाही हा विचार भारतीय व्यवस्थेतील वर्षा जनजातींच्या मनामधून अद्याप किंचितही नाहीसा झाला नाही राजस्थानमधील जालोरच्या इंद्र मेघवाल या नऊ वर्षाच्या मुलाची पाण्याच्या डेऱ्याला हात का लावला म्हणून सवर्ण शिक्षकाने अमानुष मारहाण करून त्याचा नुकताच झालेला मृत्यू हा पाशवी अस्पृश्यता निरंतर चालू आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना इंद्र मेघवाल हा शिवा शिव केली म्हणून झालेल्या मारहाणीत मृत्यू पावतो हे स्वातंत्र्याने दलितांना आदिवासींना अस्पृश्यांना दिलेले अत्याचार पीडित होऊन मरण्याचे स्वातंत्र्य आहे का?
भारतामध्ये दोन दशकात सात लाख दलित अत्याचाराचे गुन्हे दाखल होतात आणि अडतीस हजार दलित स्त्रियांच्या वर शारीरिक अत्याचार होतात केले जातात ही राष्ट्रीय गुन्हे सर्वेक्षण नोंद विभागाची माहिती धक्कादायक आता वाटत नाही
स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य भारतीय लोकशाहीने नागरिकांना दिली आहे ते सारे सब झूट आहे सत्ता आणि अस्पृश्यता ही नेहमी एकमेकांच्या विरोधात राहिली आहे सत्तेला अस्पृश्यता निर्मूलन नको आहे आणि अस्पृश्यता वर्गातील दलित आदिवासी सह सर्व दुय्यम जाती यांना स्वातंत्र्यानंतर समतेचे अवकाश हवे आहे
हा सगळा स्वातंत्र्याच्या उपभोगाचा कालखंड भारतीय नागरिकांना रक्तपात अत्याचार हिंसा बलात्कार ही देणगी देत आहे असेच अत्याचाराची चक्र का उलटे फिरते याला कोण कारणीभूत आहे ?याला धार्मिक व जातीय मानसिकता कारणीभूत आहे का?
भारतामध्ये दलित आदिवासींच्या वरील अत्याचार हे सुडाचे विचार नाहीसे का होत नाहीत ते पुन्हा पुन्हा काव पळून येतात बंधू त्यांनी समता प्रस्थापित करण्यामध्ये राजकीय पक्षांना यश का येत नाही? राजकीय पक्षांची ही इच्छाशक्ती का नाही? राजकीय पक्षांच्या मध्ये ही अदृश्य अस्पृश्यता किती मोठ्या प्रमाणात आहे? याचा विचार मतदार म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात करत नाहीत

भारतीय समाजामध्ये विचाराची संकीर्णता मागास विचारांचा आग्रह जुनाट बुरसटलेल्या विचाराच्या आधारे जगण्याचा आटापिटा स्वतःच्या अपघाती धर्म जाती प्राप्त वांशिक तेचा अभिमान हे वर्तन सातत्याने चालू आहे समाज व्यवस्थेमध्ये अपघाती मिळालेली स्थान ही कर्तुत्व चारित्र्य व नीतीने प्राप्त केलेली गोष्ट नाही हे या वर्गाच्या सवर्ण उच्च सरंजाम जातींना अद्याप कळाले नाही असे नाही ते त्यांना मान्यच करावयाचे नाही आडनाव आणि घराणे गावे आणि सरंजामी स्थान याला चिकटून बसलेले हे सडलेल्या मानसिकतेचे बहुतांश नागरिक हे अस्पृश्यतेच्या समर्थनाचे पालनाचे घटक आहेत त्यामुळेच तर टोकाची विषमता दलित आदिवासी व अन्य जाती यांचे समाज जीवनातील अस्तित्व कर्तुत्व नाकारण्याचा तुच्छतावाद हा उच्च जातींच्या मनामध्ये पोटासारखा वाढतो आहे उच्च जाती विकासाच्या संधी आणि स्पर्धेमध्ये भय ग्रस्त झाल्या आहेत त्याच वेळी खालच्या जनजाती चा
समाज हा नेहमी बदलाच्या अवस्थेत राहत असून तो बदलत आहे त्यांच्या. मध्ये खालच्या जनजातींच्या नेहमी मध्ये आत्मविश्वास व एक आहोत हा विचार वाढतो आहे समानता व संधी यांचा आग्रही वाढतो आहे ही समानता व संधी ही उच्च जातींना अमान्य आहे सार्वजनिक जीवनात अस्पृश्यता पाळता येत नाही पण मनामध्ये अस्पृश्यतेचे विष सर्वत्र भाषेतून डोळ्यातून वर्तनातून अप्रत्यक्ष टवाळी आणि टिंगल यामधून सतत दिसून येते भारत हा देश स्वतंत्र राजकीय दृष्ट्या झाला आहे इथे लोकशाहीच्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत परंतु अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रयत्न हृदय परिवर्तनाने अद्याप सुरू होत असल्याचे आढळून येत आहे नव्या बंडखोरी विद्रोही वर्तनातूनच व्यवस्था मोडते हा विद्रोह सवर्ण उच्च जातींना अमान्य आहे बरसटलेल्या सनातन विचारांना मानतुकून स्वीकारा त्यानुसार वर्तन करा तितक्या अंतर ठेवा तितके दूर राहा इतके जवळ येऊ नका इंद्र मेघवाले पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून शिक्षकांनी केलेली मारहाण ही मानसिकता जालोर मधील आहे असे नाही भारताच्या सर्व शिक्षण व्यवस्थांच्या मध्ये अस्पृश्यता नसानसामध्ये भरलेली आहे

प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय विद्यापीठे ही ज्ञान देतात कौशल्य विकसित करतात दृष्टिकोन बदलतात अभिव्यक्ती घडवतात लोकशाहीला आवश्यक असलेले सुजाण नागरिकत्व तयार करतात संशोधक बुद्धिवंत या व्यवस्थेतून तयार होतात हे वरकरणी खरे आहे पण भारताच्या या सर्व शिक्षण व्यवस्थांच्या मधून अस्पृश्यता निर्मूलनाचा हृदय परिवर्तनाचा विचार किंचितही प्रबोधनाच्या पातळीवर सांगितला जात नाही रुजवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत या सर्व ठिकाणी असलेली अस्पृश्यता ही स्फोटक स्फोटक करण्यात येते. या सर्व ठिकाणी शिकवण्यासाठी असलेले घटक हे अस्पृश्यतेचे वाहक घटक आहेत स्वतःला ही अस्पृश्यता गेली पाहिजे हे तीव्रतेने वाटणारा अस्पृश्यता वर्ग हा आत्मविश्वासाने उभा राहत नाही बंडखोरी करत नाही सवर्ण उच्च जातींना आव्हान देत नाही त्यांच्या कुटिल कपट दुष्ट नितीला बळी पडून शरण जगण्याची धन्यता हे अस्पृश्य जातींची आहे. ती त्यांची आजची मानसिकता आहे आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून मार खाणार त्यातून मरण प्राप्त करणार ही त्यांची चूक आहे असे अद्यापही बहुसंख्यांक दलित अस्पृश्य आदिवासी व अन्य जाती यांना वाटत नाही इतकी भयग्रस्तता खालच्या जनजातींच्या मनामध्ये सवर्ण जातींनी तयार केली आहे वस्तूतः खालच्या जनजातींची भय ग्रस्त मानसिकता आव्हान न देण्याची दुर्बलता ही अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्यातील मोठे अडसर असलेली बाब आहे
मnगांधीजींच्या अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार हा हरिजन प्रेम इथपर्यंत पोहोचला साने गुरुजींचा अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मंदिर प्रवेशापर्यंत गेला. घरात घारे घरात घ्या हरीच्या लेकरांना घरात घ्या असे म्हणणारे साने गुरुजी महाराष्ट्राने तात्काळ विसरले प्रभुजी लेक रे सारी प्रार्थनेपर्यंतच सवर्णांना दिसू हे लागले मात्र हृदय शुन्य महाराष्ट्राला अस्पृश्यता निर्मूलनात सारस्य कधीच वाटले नाही जवखेडा खर्डा भोत मांगे प्रकरण. यासह
असंख्य प्रकरणांचा नुसता हिशोब करण्यात काहीही कारण नाही पोलीस उच्चारण्याचे न्यायाधीश उच्चवर्णी यांचा अधिकारी गेल्या 75 वर्षात इथे आपणास न्याय मिळत नाही हीí नैराश्य भावना मोठ्या प्रमाणामध्ये बळावली आहे. अस्पृश्यता ही कायद्याने जाईल कि नाही माहित नाही ती हृदय परिवर्तन याने निश्चित⁴जाईल यावर जाईल याबद्दल स्वातंत्र पूर्वकाळात खूप वाद यावर ⁴चर्चा मंथन झाले आहे स्वातंत्र्योत्तर काळात मात्र आम्ही प्रगत आहोत आणि प्रगती आहोत आम्ही पुरोगामी आहोत आम्ही सर्व समावेशक आहोत गुण्यागोविंदाने जगत आहोत आम्ही हे सारे काही मानत नाही असे म्हणणारा व दाखवणारा ढोंगी मध्यमवर्ग व उच्च वर्णी वर्ग हे अस्वच्छता निर्मूलनातील मोठ्या अडसर आहेत उघड अस्पृश्यतेला विरोध करणे छुप्या अस्पृश्यतेचा पर्दा फाश करणे हे काही एक न करता भयग्रस्त जगण्याचे दया आणि सहानुभूती मिळवण्यात आयुष्याचा वेळ घालवण्याचे जे प्रयत्न चालले आहेत त्यातूनच सवर्ण धनिक सरंजाम जाती या मुजोर झाल्या आहेत त्या अत्याचाराला दजवत आहेत त्यांना आव्हानास प्रति आव्हान हे देऊनच आपला समतेचा अधिकार आपल्या नागरिकत्वाचे अधिकार प्राप्त करून घ्यावे लागणार आहेत

सवर्ण उच्च जातींच्या मेहरबानी वर त्यांनी टाकलेल्या लाचारीच्या तुकड्यावर जगणाऱ्या दलित आदिवासी व खालच्या जनजातीने खूप आत्मचिंतन करण्याची गरज आहे स्वाभिमान संघर्ष स्वतंत्रता आणि आक्रमकता स्वयंअत्याचार निर्मूलनासाठी सतत सिद्ध राहणे ही नवी स्वातंत्र्योत्तर काळातील क्षमता मूल्य ही खालच्या जनजातींना दाखवून द्यावी लागणार आहे तरच समतेचे अवकाश थोडेसे प्राप्त होऊ शकते लोकशाहीतील सार्वजनिक सत्तेची सर्व ठिकाणी धनिक सरंजाम उच्च जातीने सवर्णने ताब्यात ठेवले आहेत त्यांची आंतरिक इतिहास आहे त्यामुळे अत्याचाराचा आवाज दे दडपतात खून दडपतात बलात्कार दडप तात एवढी ही साक्षरता दलित आणि आदिवासींची झालेली नाही इतकी नैराश्य अवस्था व शरणवृत्ती ही खालच्या जनजातींनी वाढलेली दिसून येते त्यामुळेच भारतीय लोकशाहीतील सर्व ठिकाणी अस्पृश्यतेचे सापळे रचण्यात आले आहेत या संवर्गातून आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना एकाकी टाकण्यात येत आहे त्यांना संधी आणि अधिकारापासून नाकारण्यात येत आहे षड्यंत्र रचून लाचलुचपत व विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येत आहे या प्रकारची कपटनीती ही इथल्या सवर्ण यांची पारंपारिक वर्तन पद्धती आहे

शाळा महाविद्यालय ही शिक्षण देत नाहीत तर विषमता बाळगा द्वेष करा फसवा लुटा अत्याचार करा असे मानव्याच्या विरोधी विचार रुजवणारे बहुतांश शिक्षक क्षेत्रात वाढत आहेत ज्या सुवर्णधनिक वर्गांच्या शैक्षणिक संस्था आहेत तेथे तर दलित अत्याचार दलित स्त्रियांच्या वरील अत्याचार हे राजरोसपणे चालू आहे खंडण्या गोळा करणे नोकरीवरून काढून ट**** पदोन्नती न देणे
पदोन्नती दिल्यास टोकाचा छळवाद करणे असं वरिष्ठ पदांवर गेलेल्या व्यक्तींचे घातपाती मृत्यू करणे अपघात घडवणे हे सवर्ण शिक्षण संस्थांच्या मधील चाललेले राजरोस कपटकारस्थान आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने याचा व्यापक स्तरावर शोध घ्यावा किती अधिकारी दलित
लाचलुचपत प्रतिबंधक गुन्ह्याखाली पकडले? किती दलित अधिकारी यांच्यावर विनयभंगाची गुन्हे दाखल झाले ?किती दलित अधिकारी यांचे अपघाती खून झाले? किती दलित महिलांवर शारीरिक अत्याचार झाले आहेत

जातीयवाद हा जमात वादापेक्षा अमानुष आहे दलित आदिवासी व खालच्या सर्व जाती यांचे जगण्याचे बळ नाहीसे केले जाते त्यांची मानवी प्रतिभा नष्ट केली जाते न्यूनगंड नैराश्य पश्या ताप हा मानवी मेंदूमध्ये इथली जातीव्यवस्था तयार करते आणि या व्यक्तीच्या मन मेंदूमध्ये आपात्रतेचे विष सुवर्ण जाती सतत भरत असतात त्यामुळे जमातवाद हा समूह वाद आहे हा धर्मवादाचा श्रद्धावाद आहे पण जातीयवाद हा अस्पृश्यता वाद आहे तुच्छता वाद आहे सूड आहे संधीचा नकार वाद आहे हे खूप भयान आहे
भारतीय समाज सुधारकांच्या परंपरा सांगत राहतो त्यांचे उदातीकरण स्वर्ण जातीच करतात आणि त्याच वेळेला वर्तमानात दलितांच्या वरील अत्याचाराचे निरंतर चक्र ते फिरवत राहतात इथे सवर्णधनिक जातींनी सुधारकांना सुद्धा नाडले छळले मारले आहे हे इथल्या सुधारक जनजातींचे अत्याचारी इतिहास वास्तव आहे त्यामुळे इंद्र मेघवाल हा नववर्षाचा मुलगा पाण्याने भरलेल्या माठाला स्पर्श केल्याने अमानुष मारहानीतून मरण पावतो ही भारतीय लोकशाहीच्या संविधान मृत्युपंथाची हळूहळू चालू झालेली घटना आहे

उच्च सवर्ण जातींची अत्याचारी मानसिकता हिचे समाजशास्त्रीय विश्लेषण झाले पाहिजे याच्यावर सांस्कृतिक आणि बौद्धिक उपाय कोणते व्यवसाय येतील याचाही विचार झाला पाहिजे आम्हाला शिक्षा होत नाही आम्ही केलेले खून माफ होतात दलित स्त्रियांवरील बलात्कार हे मी पचवू शकतो आम्ही संख्येने जास्त आहोत अत्याचार करीत राहणे यास कोणी आव्हान देत नाही आम्ही खूप पराक्रमी आहोत अत्याचार बलात्कार करणे हा आमचा पराक्रम आहे ही आमच्या पराक्रमाची व्याख्या आहे महाराष्ट्र भारत देशातील पराक्रमाचे इतिहासातील आणि वर्तमानातील व्याख्या निश्चित व्हायला हवी आकारण दुर्बळांचे निर्धारण करणे हे कामाचे वर्तन आहे काय?
उच्च जातींच्या नेनिवे मध्ये अत्याचाराचा जो डीएनए आहे
व खालच्या दलित आदिवासी इतर मागास या सर्व जातींच्या अत्याचार सहन करण्याच्या डीएनएचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा आणि त्यातूनच उपचार आत्मक विचारात्मक कायद्याने बंदोबस्त करता येणारे तसेच हृदय परिवर्तनाचे कायम बदलाचे प्रयत्न या द्वारे करता येत येऊ शकतात हे आता समजावून घेण्याची खूप गरज आहे अन्यथा दलितांवरील अत्याचाराचे मेघ बरसत राहतील आणि इंद्र मेघ वाल सारखी बालके सतत अत्याचाराला बळी जात राहतील आणि भारत हा अमृत काळाकडे निघालेला सुवर्ण युगाचा देश इथे काल होता आज आहे आणि उद्याही आहे राहणार आहे असे सांगत सवर्ण राहतील हे इथल्या संस्कृतीचे फार मोठे दुष्ट कारण कायम ठरणार नाही ना? असे वाटून राहते

सी व
जी
रो त. प्रेससातारा 19 /8/22 वेळ9.50

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *