डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीमधील सिव्हिल विभागाच्या ३० विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल विभागातील ३० विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत विविध पदांवर निवड झाली. त्यापैकी सहा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (एम.पी. एस. सी.) परीक्षेत अ श्रेणी मिळवत उत्तीर्ण होऊन व इतर २४ विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, नगररचना, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी विविध शासकीय पदांवर रुजू झाले आहेत, अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये यश संपादन करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये दादासाहेब गडदे, योगेश मोरे, अक्षया बेडककर,रोहित कोळी,सौरभ पाटील,वसीम जमादार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दीपा मुलिया,सतीश सरगर, श्रीकांत मोठे,अनुजा पाटील, सूरज वाघमारे,अभिजीत सातपुते, अतुल वाघमारे, शब्बीर फकीर, पूनम वर्मा, अझीम जमादार, नितीन पाटील, सचिन पोळ,धनंजय निर्मळे, सोनाली खडतरे, अमित साळे, स्मिता पाटील, प्रशांत चव्हाण, महेश चौगुले, योगिता पाटील, दत्तात्रय पाटील, गणेश कोरे, अविनाश मस्के, हरिश्चंद्र पाटील, उमेश परीट यांची निवड जिल्हा परिषद, बी.एम.सी.सी., वन विभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी विविध विभागात प्रथम व द्वितीय वर्ग अधिकारीपदांवर झाली आहे.
या सर्वांचे अभिनंदन करतांना चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हा.चेअरपर्सन अॅड.डॉ. सोनाली मगदूम यांनी ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करताना सर्वांनी याचा उपयोग समाज व आपल्या महाविद्यालयात सद्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना पुढचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सक्तारमुर्तीनी विद्यार्थ्यांना आम्हा सर्वांचे सरकारी नोकरीसाठीचे मार्गदर्शन व मदत नक्कीच राहील याची ग्वाही देताना अनुभवी व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग, अभ्यासासाठी उत्कृष्ट ग्रंथालय व इतर विद्यार्थीकेंद्रित सोयीसुविधा या गोष्टींमुळेच हे यश मिळवू शकलो असे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. जगदीश लंबे, माजी विद्यार्थी विभागाच्या समन्वयक प्रा. सौ. ए. पी. चौगुले व यांच्या सोबत सहकाऱ्यांनी केले.
