हाजी शौकत बागवान स्मृति भव्य खुल्या एकदिवशी जलद बुद्धीबळ स्पर्धा इचलकरंजीत रविवार
इचलकरंजी मंगळवार दि.23 ऑगस्ट:- मराठा सांस्कृतिक भवन, तांबे माळ,इचलकरंजी येथे इचलकरंजी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी , हाजी शौकत बागवान स्मृति भव्य खुल्या एकदिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नियमानुसार नऊ फेऱ्यात होणार आहेत.इचलकरंजीच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वाधिक बक्षीस रकमेची एक दिवशीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसांची एकूण रोख रक्कम 78,600/- आहे याशिवाय सर्व बक्षीस विजेत्यांना चषक व मेडल्स देण्यात येणार आहेत.
खुल्या गटात पहिल्या 20 क्रमांकाना रोख बक्षीसे व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.स्पर्धा विजेत्याला रोख आठ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकापासून अनुक्रमे 2) रु.7000/- 3) रु.6000/- 4) रु.5000/- 5) रु.4000/- 6) रु.3000/- 7) रु.2500/- 8) रु.2000/- 9) ते 15) प्रत्येकी 1000 रुपये 16) रु.700/- 17 ते 20 प्रत्येकी 500 रुपये अशी बक्षीस ठेवली आहेत. याशिवाय विविध वयोगटात उत्तेजनार्थ ७१ रोख बक्षिसे सोबत चषक/पदक दिले जाणार आहे. मुख्य 20 बक्षिसे व उत्तेजनार्थ 71 बक्षीसे अशी एकूण रोख 91 बक्षिसे व चषक/पदक बक्षीस म्हणून ठेवले आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच इचलकरंजी मध्ये एकदिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा होत असल्यामुळे महाराष्ट्र,गोवा व कर्नाटकातील बुद्धिबळपटू मध्ये चैतन्य निर्माण झाला आहे. सर्व खेळाडूंना स्पर्धा स्थळी मोफत चहा नाश्ता दुपारचे जेवण देण्यात येणार आहे.कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांना मुख्य पंच म्हणून नियुक्ती केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पंधरा वर्षाखालील मुलांना 350 रुपये व पंधरा वर्षावरील सर्वांना 450 रुपये प्रवेश फी ठेवली आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली नावे प्रवेश फी सह खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
1) रवींद्र निकम :- 93 71460068
2) उमेश कुंभीरकर :- 8380972403