इचलकरंजीत शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी/प्रतिनिधी –
दोन वेळचा महापूर आणि सलग तीन वर्षे कोरोना महामारी यामुळे गत तीन वर्षांपासून निर्बंधामुळे होऊ न शकलेल्या दहीहंडीचा थरार यंदा इचलकरंजीकरांना पाहता आणि अनुभवता येणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या वतीने राहुल आवाडे युवा सेना आयोजित दहीहंडी स्पर्धा शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी ही दहीहंडी असणार असून विजेत्या गोविंदा पथकास तब्बल 3.51 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. इचलकरंजीकरांसह सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राहुल आवाडे यांनी केले आहे.
राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी पूर्णत्वास येत असून स्पर्धा नियोजन संदर्भात नुकतीच बैठकही पार पडली. त्यामध्ये युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बैठकीमध्ये युवकांनी विविध सूचना केल्या. त्यावर डॉ. राहुल आवाडे यांनी सूचनांचा निश्चितपणे विचार करुन स्पर्धा अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडली जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेत सहभागी गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा अगर गैरसोय होऊ दिली जाणार नाही. स्पर्धास्थळी आवश्यक त्या सर्व उपाययोजन केल्या जाणार असून रुग्णवाहिका, डॉक्टर्स, परिचारीका आदी तैनात असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्पर्धा शासनाचे सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळून आयोजित केली जाणार आहे.
दहीहंडी स्पर्धेसाठीच्या स्टेज व मंडप पूजन ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी दहीहंडी नियोजन समिती अध्यक्ष महेश पाटील, अहमद मुजावर, चंद्रशेखर शहा, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नरसिंह पारीख, राजेंद्र बचाटे, बाळासाहेब माने, रवी जावळे, सचिन हेरवाडे, अजिंक्य रेडेकर, सुहास कांबळे, नरेश हरवंदे, विनायक बचाटे, महावीर कुरुंदवाडे, सचिन माछरे, राजू दरीबे, कपिल शेटके, राकेश मगदूम, प्रशांत होगाडे, संग्राम सटाले, स्वप्नील पाटील, विजय पाटील, बाबासो कोतवाल, अनिल शिकलगार उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
इचलकरंजीत शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
