विचाराचे कर्तुत्व

विचाराचे कर्तुत्व

विचाराचे कर्तुत्व

कॉर्पोरेट साम्राज्य वाद हा वंश वादी घराण्याचा विल खाअसून भारतात यांचे स्वरूप हे कार्पोरेट हे मूलतत्व वादी विचार धारा पुढे नेऊ पाहणाऱ्या हिंदुत्व वादी यांचे संयुक्त सत्ता कारण आहे हाच तो येथील उजवा सूर्विलान्स ऑफ इम्प्रलिस्म आहे थोडक्यात तो नृशंस हीसा प्रेरित हिंदुत्व वाद आहे या कालखंडात
हिंदुत्वाच्या झंजावातात विचाराचे कर्तुत्व काय असले पाहिजे? विचाराचे कर्तुत्व म्हणजे काय असते? हिंदुत्वाचा झंजावात म्हणजे नेमका काय असतो? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे म्हणजे विचाराचे कर्तृत्व समजून घेणे होय विचाराचे कर्तुत्व ही सर्वकालिक गोष्ट आहे विचार आणि माणूस यांचा अन्योन्य संबंध आहे माणूस शिकणारा प्राणी आहे माणूस बदलणारा प्राणी आहे माणूस संपन्न होत राहतो माणूस तशी वाटचाल करतो ग्रहण विचाराच्या आधारे तो सामर्थ्याने पुढे जातो ही मानवी विचाराची परिणामकारकता उपयुक्तता माणसाला प्रारंभिक अवस्थेत कळत नाही असे का होते? भावना गैरसमज अविश्वास चुकीच्या गृहीत कल्पना यांच्या आधारे मानवी जीवनाचा प्रवास हा दीर्घकाळ चालतो हा प्रवास बदलवता येतो किंवा नाही असे प्रश्न माणसाला सतत पडले पाहिजेत जेव्हा असे प्रश्न पडतात तेव्हा मानव्य शिल्लक आहे असे मानता येते मानवता ही विचाराने प्रगल्भ होत जाणारी गोष्ट आहे पण यासाठी विचार म्हणजे काय विचाराचे कर्तृत्व कसे ठवावयाचे ? या सगळ्या प्रश्नांच्या साठी स्वतःला सतत तपासून घेणे हे फार महत्त्वाचे आहे म्हणून हा प्रयत्न येथे केला आहे

आजचे जग प्रत्येकाला वेगवेगळे वाटते बहुसंख्य्यांक धर्मवाद्यांना आपले जग आपल्या धर्माचे वाटते जागतिक साम्राज्यवाद यांना जग आपले वाटते वांशिकता ही श्रेष्ठ असते असा विश्वास असणाऱ्यांना जग हे वांशिकता वाटते काळे आणि गोरे या भेदावर विश्वास ठेवणाऱ्या वर्ण वाद्यांना काळे आणि गोरे हा भेदच खरा आहे जग हे असेच आहे असे वाटते भारतामध्ये मात्र देवाच्या मालकांना पुरोहित पुजाऱ्यांना आम्ही श्रेष्ठ आहोत आम्हाला ईश्वराच्या पूजेचे अधिकार आहेत म्हणून ते तामिळनाडू मध्ये एम के स्टॅलिन यांनी नेमलेले सरकारी पुजारी पुरोहित उच्च न्यायालय धाव घेवून पुन्हा देव मालकी स्वतः कडे नुकतीच मिळविली आहे .याचे कारण आम्ही श्रेष्ठ आहोत आणि जग हे आमच्या श्रेष्ठत्वाच्या आधारे चालले पाहिजे आमचा रंग आमचा वंश आमची भाषा आमची जात आमचा धर्म आमची संस्कृती आमची पूजा आर्चा हेच आमच्या विचाराचे प्रभाव आहेत परिणाम आहेत त्याच्या आधारेच आजचे वर्तमानाचे जग चालू आहे हे सर्व आम्हाला आमच्या पूर्व संचित पुण्यातून कर्तुत्वातून वंशाच्या वर्षातून प्राप्त झाले आहे असा मानणारा भारतीय जनसमुहाचा विचार हा मुळामध्ये प्राचीन संकेत प्राचीन प्रतीके यांच्यावरील आढळ श्रद्धेतून पुढे निघाला आहे हे सगळे प्राचीन विचाराचे जंजाळ त्याचे ओझे तो घेत आहे हे ओझे इतरांच्या डोक्यावरती तो ठेऊ पाहतो आहे आणि त्यामध्ये सनातन प्राचीनतेच्या जर्जर विषमतेच्या जर्जर दारिद्र्याच्या निर्मम शोषणाच्या निर्मम अत्याचाराच्या या अवस्थेमध्ये सर्व समाजाला हा वर्ग दरीत संकटात लोटू पाहतो आहे
माणूस आणि प्राणी ही दोन्ही वैशिष्ट्ये माणसाच्या अंगी आहेत गोरिला चिंपाजी या पूर्व वंशाच्या सर्व गुणदोषासह माणूस उत्क्रांत पावला आहे तो पुढे आला आहे त्यामुळे त्याला प्राप्त झालेला विचाराचा गुण हा खूप महत्त्वाचा आहे तो विचार ऐकतो तो विचार स्वीकारतो तो विचार कथन करतो तो विचार शिकवतो तो विचा रातून बदलतो
माणसाचे शिकणे आणि विचार करणे यामध्ये नेमके कोणते एक वैशिष्ट्य प्रथम सुरू होते याचा खूप तपास केला गेला आहे शिकताना विचार माणूस करतो विचार करताना माणूस शिकत राहतो ही प्रक्रिया बालपणापासून सुरू होते आणि त्यातूनच माणूस हा प्राप्त केलेले ज्ञान व्यवहारात वापरण्यासाठी साधनांचा हत्याराचा वापर करतो त्यातून तो प्राण्यांच्या पेक्षा आगळे वेगळे वर्तन करतो आणि प्रगत मानव म्हणून पुढे जाऊ लागतो हे प्रगत माणसाचे जगणे प्रगत होत राहणे हे खूप मौलिक गोष्ट आहे मानव जातीचा इतिहास हा परिवर्तनाचा इतिहास आहे हा बदलाचा इतिहास आहे हा शिकण्याचा इतिहास आहे हा शिकवण्याचा इतिहास आहे हा विचाराचा इतिहास आहे हा विचाराच्या कर्तुत्वाचा इतिहास आहे या समग्र दृष्टिकोनाने मानवी जीवनाकडे पाहण्याचे विनम्रभान प्रत्येक जनसमूहाला प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी माणसाने वर्तमान समजावून घेणे वर्तमानाची संकटे याची बीजे इतिहासात असतात वर्तमानाचे संघर्ष याची कारणे इतिहासात असतात हे समजून घेतले पाहिजे आजचे दुःख शोषण अत्याचार फसवणूक याचे मुख्य कारण माणसाचा विचार न करण्याचा दुर्गुण होय विचार न करणे म्हणजे दुखात्याचाराचे निमंत्रण स्वतः देणे होय म्हणून माणसाने वर्तमानातील खरा आणि खोटा विचार कोणता आहे हे सतत तपासले पाहिजे मी विचार करत नाही माझा विचार अशी काही संबंध नाही इतकी उदासीनता व्यक्तिगत जीवनात जोपासून कोणताही माणूस पुढे जाऊ शकत नाही किंबहुना समाजापासून तुटणे ही प्रक्रिया आशा वर्तनातून होते म्हणून माणसाचे विचार आणि कृती माणसाचे कार्य आणि विचार याची एकरूपता एक संघातता असायला हवी ती असली तरच विचाराची सिद्धता पुढे जाते आणि विचार हा कृतीला यशस्वी करतो म्हणून विचाराचा इतिहास म्हणजे मानव जातीचा अभ्यास करणे होय मानव जातीच्या इतिहासात ग्रीक लोक श्रेष्ठ आहेत त्यांनी जगभरचे मध्ययुग हे विचाराने थक्क करून सोडले आहे इतिहास एक हजार वर्षाचा आहे पुढे आलेल्या बुद्धाने क्रांती घडवली बुद्ध क्रांती ही विचार कोणती आहे ती सर्वश्रेष्ठ दुःख कारणाचा शोध घेणारी विचार क्रांती म्हणून मानव जातीने काही काळ स्वीकारली होती मात्र पुढे बुद्ध क्रांतीला पराभूत करण्यात आले भारत वर्षाच्या बाहेर बुद्ध विचार आणि प्रचारक यांना फेटाळण्यात आले हाकलण्यात आले भारतातील धर्मग्रंथ नसलेल्या गीता या ग्रंथाने गीतेतील विचाराने इथल्या विचाराचा इतिहास चालत आलेला वारसा सतत अस्थिर करण्याचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे गीता हिसे चे समर्थन करते गीता विश्वदर्शन दाखवते गीता ग्रंथ फसवून केलेल्या हत्याचे समर्थन करते गीता शत्रू व स्वकिय यांच्या हि हत्यांचे उदातीकरण करते हा सगळा कालखंड ख्रिस्त पूर्व 551 ते 479 एवढा आहे . अश्या प्रकारे. जग विचाराने पुढे आलेले असून जगाचा प्रवास. हा तिसऱ्या शतकापर्यंत धर्म प्रभावा खालीच होता .

आजचे जग धर्म हा क्ट्ट रता व क्रूरता यासाठी कसा वापरता येईल याचा विचार करून वर्तन करीत आहे कट्टरता व क्रूरता हि हिंसा पूर्व रचना तयार करण्यात आली आहे त्यातून धर्म प्राबल्य व वंश वाद पुन्हा प्रस्थापित करता येतो अभिव्यक्ती ची असमानता तयार करता येते फ्रीडम ऑफ चॉईस चे लढे चलविणा ऱ्या स्त्रीमुक्ती दायी चलवलिना नियंत्रित करता येते तसेच ज्ञान निर्माण करणारे सूर्जून क्षेत्रातील प्रत्येकास फ्रीडम ऑफ इमेजीन या नव्या आविष्कार स्वातंत्र्य ला निर्मम हत्या करून रोखता येते म्हणून विचाराचे विवेकाचे तर्क व चिकित्सेच् जग निर्माण प्रत्येक कालखंडात तयार करीत राहण्या साठी विचाराचे कर्तुत्व अनन्य साधारण महत्व आहे
शिवाजी
पांडुरंग प्रेस
सातारा
27/8/22वेळ
9.02

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *