रमेशकुमार मिठारे यांना आदर्श समाजसेवा गौरव पुरस्कारने सन्मानित
=========================
/
अकिवाट (ता.शिरोळ) गावचे सुपुत्र रमेशकुमार मिठारे यांनी तालुक्यात पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना पतसंस्था कर्मचारी यांना सेवानियम लागू व्हावा यासाठी प्रयत्न करत असुन, कर्मचारी व संस्थाना भविष्य निर्वाह निधी चालू करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.पतसंस्था टिकली पाहिजे यासाठी राज्य स्तरावर सुद्धा त्यांची धडपड सुरू आहे,
त्याच बरोबर ग्राहक पंचायत महाराष्ट्र या राज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना ग्राहक चळवळीचे काम करत आहेत. त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समाजकार्याची दखल घेऊन भीमक्रांती सोशल फौंडेशन हरोली ता. शिरोळ यांच्यावतीने “भारतीय क्रांतीरत्न- आदर्श समाजसेवा गौरव पुरस्कार” जालनाचे माजी आमदार मदनलाल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवादलचे- बाबासाहेब नदाफ,जेष्ठ पत्रकार व अभिनेते- दगडू माने,व्यसनमुक्तीदुत- डॉ.विकास पाटील,संजय गांधी निराधार कमिटीचे- रमेश शिंदे,यड्रावचे युवा सरपंच- कुणालराजे नाईक-निंबाळकर, सरकार, दत्तवाडचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते- शिवगोंडा पाटील; भीमक्रांतीचे संस्थापक- बाळासाहेब कांबळे,शिवाजी एडवान ,कवि- साताप्पा सुतार, पत्रकार- मार्था भोसले, संजय साळुंखे,राजेंद्र पुजारी, डॉ.अनिता खेबुडकर, डॉ.राजमा नदाफ, हास्यासम्राट- राजू शेख,सरपंच- सौ.वैशाली कुंभार, कुशेंद्र कुंभार, सिध्दाप्पा गावडे,विठ्ठल काटकर; अर्जुन जावीर ,आदि प्रमुख मान्यवरांसह विविध क्षेत्रातील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमेशकुमार मिठारे यांना सदर पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.