
जरंडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करा – पँथर आर्मी
जरंडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील अल्पवयीन मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून राजेंद्र मोहन शिंदे व शुभम साहेबराव शिंदे या मराठा जातीतील नराधमाने दिनांक 23 / 7/ 2022 व 25 / 7/2022 रोजी रात्री दहा अकराच्या सुमारास वारंवार पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची फिर्याद दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी तासगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिली असून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे यातील शुभम साहेबराव शिंदे याला पोलिसांनी अटक केले आहे पण दुसरा आरोपी राजेंद्र मोहन शिंदे हा अध्यापही फरारी आहे
1 ) फरारी आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. 2 ) फरारी आरोपीस पाठीशी घालणारे डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांचे तात्काळ निलंबन करावे .
3 ) पीडित मुलीला योग्य ती नुस्कान भरपाई देऊन तिचे पुनर्वसन करावे .
4 ) पीडित मुलीच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण द्यावे
5 ) पीडित अल्पवयीन मुलीचा पुरवणी जबाब नव्याने नोंद करून घ्यावा . अशी मागणी पँथर आर्मीचे राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले यांनी आपले सरकार पोर्टलवर केली आहे व माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ई-मेल द्वारे कळवले आहे