ईश्वर श्रद्धा आणि निंदा समजावून घेताना
नास्तिकांचं जगणं ही एक सध्या अशक्य प्राय गोष्ट ठरते आहे याची कारणे कोणती आहेत ?
समाजाची नीतीची धारणा ही जाती आणि वर्ण दिसत आहे उच्च वर्ण जाती शुद्ध पवित्र नीतिमान असतात उलट वैश्य शूद्र वर्ण जाती या शुद्ध अपवित्र दृष्ट आणि अ नीतिमान असतात अशी पारंपारिक गृहीत विचार धारणा ज्या समाजाची शतकानुशतके तयार झालेले आहे त्या समाजामध्ये नीती आणि नास्तिकता आस्तिकता आणि नीती यांचा अभ्यास होणे असंभव वाटते हे तपासावे याचीही गरज समाजामध्ये दिसून येत नाही तरीही नीती आणि नास्तिकता ही स्वजीवनाच्या पातळीवर स्वतःला तपासण्यासाठी समजावून घेणे हे प्रत्येक व्यक्तीला करावे लागणारे वर्तन आहे
नास्तिकता म्हणजे ईश्वर विरोध नाही नास्तिकता म्हणजे ईश्वर निंदा नाही नास्तिकता म्हणजे सर्वतः श्रद्धेला विरोध नाही नास्तिकता म्हणजे इतरांच्या पूजा अर्चा विधी आणि कर्मकांड यांना विरोध करणे नव्हे नास्तिकता ही एक विचारशील वृत्ती आहे वास्तवाचा विचार करणे कल्पना नाकारणे अमूर्त कल्पनांचा स्वीकार न करणे भयकारी कल्पना जीवनात न स्वीकारता वस्तुनिष्ठ वर्तन करणे तर्क चिकित्सा सत्य अनुभव आणि यानुसारचे वर्तन ही नास्तिकतेची गुणवैशिष्ट्ये आहेत नास्तिकता हे निरंतरचे सदोदित वर्तन नसते घटना आणि प्रसंगा नुसार वर्तन करताना मूर्तिपूजा कर्मकांड त्यातील अंधश्रद्धा नाकारणे ही एक प्रसंग कृती असते ती तात्कालीक असते नास्तिकता हे तात्कालीक वर्तन असते नास्तिकता हा बहुसंख्यांकाच्या वर्तनाला विरोध नसतो बहुसंख्य अंकांच्या शोषण फसवणूक श्रद्धावादांचा पसारा याबद्दलची नापसंती असते यातूनही बहुसंख्यांक जन मुक्त व्हावे अशी एक आंतरिक तळमळ असते नास्तिकता ही श्रद्धेचे शोषण नाकारते नास्तिकता अपवित्रता व पवित्रता या खुळचट कल्पनांना स्थान देत नाही नास्तिकता ईश्वर भयवाद नाकारते नास्तिकता मूर्ती पूजेचा थाटमाट नाकारते नास्तिकता मूर्ती पूजेच्या शोषण व्यवस्थेला देवळे मूर्ती पूजा चर्च मशीद यामधील सुप्त शोषणवादाचा पर्दाफाश करू पाहते नास्तिकता हा फसवणूक वादाच्या विरुद्धचा उघड उघड लढा असतो नास्तिकता हे भूत आणि भविष्य यावर विश्वास ठेवत नाही
नास्तिकता ही सत्याचरणाचा आग्रह धरते नास्तिकता स्वयंनिती मूल्यांच्या वर्तनाचा परिशिलनाचा प्रयत्न करते नास्तिकता ही नैतिक मूल्यांच्या आढळ श्रद्धेतून स्वयंजीवनानंद प्राप्त करू पाहते नास्तिकता ही व्यक्ती व सार्वजनिक जीवनात निर्म म शोषणापासून दूर राहू इच्छिते नास्तिकता केवळ शोषणापासून दूरच राहत नाही तर शोषण करणाऱ्या व्यक्तींना उघडे करू पाहते ती परदा फाश करते नास्तिकता भोळ्या अंदजन श्रद्धाळू दैववादी शरण भाविकांच्या जीवनाबद्दल अंतरिक कळवळा बाळगते नास्तिकता हा एक भावनां व श्रद्धा यांच्या मधील सतत संघर्षाचा प्रवास प्रत्येक व्यक्तीने शुद्ध आचरण पातळीवर करत राहावा असा आग्रह धरते भावनेला विवेकाचा पाया द्या हा नास्तिक वाद्यांचा आग्रह असतो श्रद्धेला तपासून पहा हा नास्तिक वाद्यांचा वाद असतो
नास्तिक वादी हे समूहाच्या श्रद्धा उन्मादाला बळी पडत नाहीत समूहाच्या संमोहित वर्तनाला साथ देत नाहीत भक्ती श्रद्धा अनुभूती अनामिक शांती यांच्या बद्दल नास्तिक वादी हे प्रश्न उपस्थित करतात आणि यामुळेच श्रद्धेच्या आणि उपासनेच्या व्यापक क्षेत्रामध्ये खळबळ तयार होते अस्वस्थ निर्माण होते नास्तिक हे निंदा करत असतात अशा अफवा पसरवल्या जातात नास्तिकांची बदनामी केली जाते नास्तिकांना आरोपी ठरवले जाते समूहाच्या साक्षीने नास्तिकांना गुन्हेगार दोषी दुष्ट आणि आरोपी ठरवून समूहाच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल शत्रुभाव वाढवण्याचे काम चाणाक्ष श्रद्धावादी करीत असतात नास्तिकांना शत्रू ठरवल्याशिवाय श्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या वर्चस्ववादी वंशवादी सरंजामवादी यांचे भावले जात नाही त्यांचे स्थान रुजत नाही विचार शून्य विवेक शुन्य तर्कशून्य समूह समोर असल्याशिवाय आपले प्रभुत्व तयार होत नाही आपण श्रेष्ठ मानले जात नाही म्हणून नास्तिकांना शत्रू बनवण्याची धर्मवाद्यांची रणनीती ही प्राचीन कालखंडापासून इथे चालत आली आहे नास्तिकांना पाखंडी धर्मद्रोही ठरवले जाते नास्तिकांना ईश्वर निंदक म्हणून घोषित केले जाते नास्तिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची कृती टाळली जाते श्रद्धावाद्यांनी पुरोहित मांत्रिक याद्निक यांनी तयार केलेला कल्पनेचा ईश्वर हा त्यांच्या कल्पनेचे स्वातंत्र्य असते त्याला बहुसंख्यांक सम्यक बळी पडला जावा हे त्यांना अभिप्रेत असते त्यातून त्यांचा सुरक्षित ईश्वरवाद पुढे जातो तो त्यांना न्यावयाचा असतो ईश्वराची कल्पनेच्या ईश्वराची सुरक्षितता ही नेहमी सर्वोच्च गोष्ट श्रद्धेच्या पातळीवर धर्मवादी पुरोहित मांत्रिक बनवतात हे त्यांना श्रेष्ठ कर्तव्य वाटते भूक दारिद्र्य अत्याचार शोषण हे नाहीसे करण्याऐवजी ईश्वराच्या मूर्ती पूजेचा श्रेष्ठ पसारा कायम अबाधित ठेवणे हे धूर्त काम शोषणवादी करीत असतात आज जगभर हे चालू आहे श्रद्धेच्या पसाऱ्याला स्वच्छ करू पाहणाऱ्या कोणत्याही छोट्या मोठ्या व्यक्तीला लेखकाला कवीला कादंबरी कराला धर्मद्रोही ईश्वर निंदक ठरवून त्याच्या कल्पनेच्या स्वातंत्र्याच्या लेखनाला बंदिस्त केले जाते म्हणूनच विवेक वाद्यांच्या कल्पनेच्या स्वातंत्र्या चा आधार घेऊन प्रश्न विचारणाऱ्या प्रतिभावंतांना संपवले जाते आहे प्रश्न हेच ईश्वर प्रतिक आला आव्हान देणारे ज्ञान साधन आहे
प्रश्न तर्क चिकित्सा अन्वेषण ही ज्ञानसाधने नास्तिक वाद्यांची प्रिय साधने असतात उलटी ईश्वर वाद्यां ना अंधश्रद्धा भोळेपणा अढळ श्रद्धा प्रश्न विहीन शरणवर्तन करणारा समूह त्यांना हवा असतो म्हणून समाज विचारशील होऊ नये समाज विवेकशील होऊ नये ही काळजी ईश्वरवादी घेत असतात त्यासाठी ते नास्तिक वाद्यांना आरोपी बनवतात
समाज विचारशील होणे हेच ईश्वर वाद्यांचे संकट असते धर्मशरण समाज श्रद्धा शरण समाज प्रतिक् शरण समाज हेच खरे जीवन आहे सत्य आहे हीच जीवनप्राप्ती आहे अशी मानसिकता तयार करण्यामध्ये ईश्वरवादी यशस्वी होतात आणि त्यासाठीच ते असंख्य प्रतीके असंख्य कर्मकांडे असंख्य धर्मग्रंथ असंख्य पोत्यापुराने असंख्य कल्पित कथानके रचत असतात आणि सत्य अनुभूतीचे दैवी शक्तीचे खोटे कथन सतत करीत असतात आणि श्रद्धां वंत भोळे भाविक हे ऐकत असतात हे भारताचे आजचे वास्तव आहे
अंधानुकरण भयवाद व शरण वर्तन हेच पवित्र धार्मिक वर्तन आहे असे वर्तन करणारा बहुसंख्यांक सर्व धर्मातील अनुयायी वर्ग हा अनितीला टाळत नाही शोषणाला दूर ठेवत नाही आत्याचार करण्यापासून स्वतः दूर राहत नाही फसवणूक आणि भ्रष्टाचार हे वाईट मानत नाही दुसऱ्याच्या दुःखाला आपण कारणीभूत आहोत हे तो समजावून घेऊ इच्छित नाही इतरांचे अस्तित्व अमान्य करीत स्वयं श्रद्धेच्या भारलेपणात आणि मुक्तीच्या लालसे ने तो पुढे निघाला आहे
नास्तिकता ही निर्भयता आहे नास्तिकचा हा वर्तमानाचा श्रद्धावाद आहे नास्तिकता हा प्रत्यक्ष वाद आहे नास्तिकता अनुभव आला आहे नास्तिकता हा जीवन अनुभव सत्यावरील विश्वास आहे आणि म्हणून ही स्वयं कर्माची स्वयं नीतीची प्रचिती आणि अनुभूती घेत जगणारा समूहाच्या मुक्तीसाठी सदाचारी वर्तन करणारा नास्तिक बंधू जन हा सर्व धर्मात वाढणे सर्व जातीत वाढणे अत्यावश्यक आहे हे होणे म्हणजेच धर्मवाद्यांचे प्रभुत्ववाद्यांचे शोषण रोखणे होय त्यांनी चालवलेल्या अत्याचाराला आव्हान देणे होय आज हे होताना दिसत नाही याचे कारण अस्तिकांच्या कट्टरता व क्रूरता यातून हिंसेचे तांडव सुरू झाले आहे कल्पनेचे स्वातंत्र्य घेणाऱ्या प्रतिभावंतांच्या चिकित्सा कृतीला रोखले जात आहे आणि जागतिक हिंसेचा भयवाद तयार करून ईश्वराचे कल्पना अस्तित्व हे अबाधित्व श्रेष्ठ आहे हे रुजवण्याचेही रचना रूप प्रयत्न सर्व कश सत्तेच्या द्वारे चालू आहेत
अस्तिकांच्या वर्तनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात नाहीत आस्तिक नीतिमान सदाचारी असतातच असेच गृहीत धरून जगणारा बहुसंख्यांक समाज अस्तिकांच्या अत्याचाराला सतत बळी पडतो शोषणाला तो मान्यता देतो अस्तिकांनी केलेल्या अत्याचार हे दैवी आहेत त्याला आपण प्राप्त ठरलो आहोत हेच आपले सदभाग्य आहे अशा प्रकारचे विचार मानस अस्तित्वाने तयार केले आहे हा इथला अस्तिकांचा चमत्कार भयावह आहे अस्तिकांचे अस्तित्व हे इथल्या याद्निक व पुरोहित क्षत्रियांच्या वर्णीय अवस्थेवरून कायम सुरक्षित ठेवण्यात आले आहे वैश्य शूद्रांच्या नास्तिक परंपरा म्हणूनच हिंसेच्या साह्याने चार्वाक ते नागसेन गौरी लंकेश कुलबर्गी पानसरे दाभोलकर ते सलमान रश्दी पर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर यांना संपवण्यात आले आहे येत आहे
अस्तिकांचा असत्यवाद अस्तिकांचा शोषण वाद अस्तिकांचा अत्याचार वाद अस्तिकांचा संमोहन वाद याची चिकित्सा करणारे विचार करणारे निर्भय जनमन तयार करण्याशिवाय तुर्त इथे नास्तिकांच्या आशेला वाव नाही
शिवाजी पांडुरंग प्रेस
30
ऑगस्ट 2022 सातारा वेळ 9:45