एस एम फाउंडेशन व ए.डी पाटील साहेब सार्वजनिक वाचनालय गुडाळ मार्फत शांताई वृद्धाश्रमास एलईडी बल्ब,ब्लॅंकेट ग्राहक उपयोगी वस्तूचे वाटप….
(प्रशांत कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी!!
गुडाळ प्रतिनिधी संभाजी कांबळे
जनहित फाउंडेशन संचलित शांताई वृद्धाश्रम कसबा तारळे तालुका राधानगरी या संस्थेस एस एम फाउंडेशन व ए डी पाटील साहेब सार्वजनिक वाचनालय मार्फत गणेश चतुर्थीचे औचित्य साधून एलईडी बल्ब ,ब्लॅंकेट व ग्राहक उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संभाजी कांबळे म्हणाले की जनहित फाउंडेशन संचलित शांताई व वृद्धाश्रम भोगावती तालुका करवीर, येथे कार्यरत असून संस्थेमार्फत ग्रामीण भागातील निराधार वृद्धांना वृद्धाश्रमाची सोय उपलब्ध करून दिली आहे, संस्थेमार्फत गेली सहा वर्षांपासून निस्वार्थी व विना मोबदला काम सुरू असून शासनाचा कोणताही एक रुपये मोबदला न घेता त्याचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन पत्रकार संभाजी कांबळे यांनी केले सद्यस्थितीमध्ये संस्थेत दर महा 50 हजाराचा इतका खर्च अपेक्षित असून या संस्थेचे सदस्य यांच्यातून केला जातो परंतु हा खर्च न परवडणारा न पेलणारा नसल्याने, संस्थापक अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी या संस्थेत लक्ष देऊन आर्थिक मदत करावी असेही आव्हान त्यांनी केले
यावेळी पत्रकार संभाजीराव कांबळे गुडाळ गावचे माजी उपसरपंच सौ गौतमी कांबळे मेघा कांबळे शिवाजी कांबळे आशाताई कांबळे समीक्षा कांबळे,श्यामल कांबळे,स्नेहल शिशिर ऋग्वेद ,संस्थापक प्रशांत कांबळे, अर्चना कांबळे, संचालक गजानन साळुंखे ,सिद्धताई शिरोळे, विश्वास शिरोळे, शीला हेगडे (जरग नगर कोल्हापूर) बाबाजी पाटील, विजय देसाई सर्व स्टाफ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रशांत कांबळे यांनी केले तर आभार बाबाजी पाटील यांनी मांडले.
फोटो ओळ: वृद्धाश्रमास ब्लॅंकेट व ग्राहक उपयोगी वाटप करताना पत्रकार संभाजीराव कांबळे माजी उपसरपंच गौतमी कांबळे मेघा कांबळे शिवाजी कांबळे आदी मान्यवर…