बहुजन जनता दला कडून कोल्हापूर येथे प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेला सुरुवात
कोल्हापूर दि. बहुजन जनता दल राज्यस्तरीय प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहीम अंतर्गत बहुजन जनता दल कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क सुरुवात करण्यात आली आहे प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेचे कोल्हापूर जिल्हा शाखेचे उद्घाटन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी आणि नव्या युवा पिढीने बहुजन जनता दलाच्या प्राथमिक सभासद नोंदणी करून बहुजन जनता दलामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेचा प्रसार आणि प्रचार करावा असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेची जबाबदारी बहुजन जनता दलाच्या अनेक कार्यकर्त्यांवर देण्यात आली असून जबाबदारी देण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनीआप आपल्या मतदार संघात आणि परिसरामधिल नागरिकांना जास्तीत जास्त बहुजन जनता दलामध्ये सहभागी करुन घ्यावे असे आदेश पंडित भाऊ दाभाडे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे
यावेळी बहुजन जनता दलाचे कोल्हापूर जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष बारकू मामा कांबळे संजय शिंदे राजेश मते शिवलाल मांजरे शांताराम मानकर योगेश पाटकर दिनेश बोरकर नितीन सरोदे भगवान काटे यांच्यासह बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते