आदिवासी विकास परिषदेचा प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव
नंददत डेकाटे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी ✍️✍️
मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर,यांनी विविध वर्तमान पत्रा मधून जाहिरात प्रकाशित करून आदिवासी विद्यार्थ्यांना वर्ग 1 ली व वर्ग 2 करीता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात अर्ज मागविले होते. शैक्षणिक सत्र 2022_23 संपून 3 महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली नाही,आता शासकीय आश्रमशाळा, भोरगड,त काटोल जि.नागपूर,शासकीय आश्रमशाळा, जमाकुडो, त सालेकसा जी. गोंदिया,शासकीय आश्रमशाळा, तोडसा , त. एटापल्ली, जी.गडचिरोली,शासकीय आश्रमशाळा सोडे, ता . धानोरा, जी.गडचिरोली या 200 ते 300 किलोमिटर अंतरावर दुर्गम भागात असलेल्या आश्रमशाळेत प्रवेशित करण्यात आले अशी यादी प्रसिद्ध करण्यात आली.शहरी भागात दर्जेदार नामांकित इंग्रजी माध्यमाची जाहिरात देवून शहरी भागातील विद्यार्थ्यांना दुर्गम भागात पाठवून त्यांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रकार आहे व आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रकार आहे यास्तव मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर यांच्यासह सर्व 9 प्रकल्प अधिकारी यांच्यावर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अश्या मागणी साठी आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग सह,पालक व गोंडवाना गणतंत्र पार्टी, भाजप आदिवासी आघाडी व आदिवासी सामाजिक संघटनांनी मा.दशरथ कुळमेथे,सह आयुक्त, आदिवासी विकास विभाग, मा.अशोक वाहणे, प्रकल्प अधिकारी,नागपूर, मा.दीपक हेडावू , प्रकल्प अधिकारी,वर्धा घेराव घातला यावर उपसचिव,आदिवासी विकास विभाग,मंत्रालय, मुंबई यांनी उद्या प्रवेश प्रक्रिया राबविणे बाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिल्याने गुन्हे नोंदविण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले यावेळी दिनेश शेराम, पंचायत समिती सदस्य राहुल मसराम, विनोद उईके, यशवंत मसराम,स्वप्नील मसराम, विजय परतेकी,सुरेंद्र नैताम, जिल्हा परिषद सदस्य हरिष उईके,दिनेश सीडाम, गंगा टेकाम आदी उपस्थित होते.