डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग जयसिंगपूर कडून शिरोळ तालुक्यातील घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन.

डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग जयसिंगपूर कडून शिरोळ तालुक्यातील घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन.

डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग जयसिंगपूर कडून शिरोळ तालुक्यातील घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन.
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या वतीने शिरोळ तालुक्यातील घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाकडून आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्ट डॉ.सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
कोरोना पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष लोकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता आला नाही तथापि गणेशाच्या आगमनासाठी लोकांनी केलेली तयारी व समाजातील उत्साह पाहता अशा स्पर्धेचे आयोजन करणे आमच्या संस्थेस उचित वाटले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रदीर्घ तीस वर्षाचा शैक्षणिक वारसा, चालू शैक्षणिक वर्षातील 350 हून अधिक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नोकरीच्या संधी,एम.पी.एस.सी. परीक्षेतील आमच्या विद्यालयाचे घवघवीत यश हे पाहता सामाजिक जाणिवेतून अशा स्पर्धेचे आयोजन करून आपल्या परिसरातील पालक, विद्यार्थी व समाजातील नागरिक यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी शिरोळ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवून हि स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. श्री.विजय मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन ॲड.डॉ.सौ.सोनाली मगदूम यांचेकडून करण्यात आले.
गणेश स्पर्धेसाठी मूर्तीची कलाकुसर, मूर्ती बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, घरातील सजावट /डेकोरेशन,नवीन तंत्रज्ञानाचा वापर तत्सम बाबीचा विचार करून नियमावली बनविण्यात आली आहे.
https://forms.gle/mUcaF7h7psLDwzcLA
सदर गुगल लिंकचा वापर करून स्पर्धक आपला सहभाग दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत नोंदवू शकतात. स्पर्धकांणी आपल्या स्वतःच्या घरातील देखाव्याचे प्रत्येकी जास्तीत जास्त दहा एम. बी.मधिल दोन फोटो काढून लिंक वरती अपलोड करायचे आहेत. सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३००१, द्वितीय क्रमांक २००१ तृतीय क्रमांक १००१ बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. स्पर्धेचे नियम व अटी महाविद्यालय प्रशासनाकडे राखीव राहतील.अधिक माहितीसाठी प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. पी.ए.चौगुले ९८८१२५१२८५ व प्रा. रोहित माने ८६६८५५१४५४ यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *