मुख्यमंत्र्यांची – राज्यपालांच्या निवासस्थानी गणरायाची आरती;
राज्यपालांच्या गणरायाला दिला निरोप
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या 'जल भूषण' या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली.
राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते. त्यामुळे आरतीनंतर उभयतांनी गणरायाला निरोप दिला व बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत काही वेळ भाग घेतला.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे चालली.