संपुर्ण घटकांच्या सामाजिक न्याय व आर्थिक विकासासाठी बहुजन जनता दल राज्यात व्यापक लढा तीव्र करणार.पंडितभाऊ दाभाडे

संपुर्ण घटकांच्या सामाजिक न्याय व आर्थिक विकासासाठी बहुजन जनता दल राज्यात व्यापक लढा तीव्र करणार.पंडितभाऊ दाभाडे

हर घर बहुजन जनता दल जळगाव जिल्हा प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेचे उद्घाटन


संपुर्ण घटकांच्या सामाजिक न्याय व आर्थिक विकासासाठी बहुजन जनता दल राज्यात व्यापक लढा तीव्र करणार.पंडितभाऊ दाभाडे


जळगाव दि राज्य सरकार हुकूमशाहीच्या विरोधात बहुजन जनता दल दलित मुस्लिम बहुजन अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त आदिवासी वंचित पीडितांच्या यासह संपूर्ण घटकांच्या सामाजिक न्याय शैक्षणिक व सामाजिक न्याय हक्कासाठी बहुजन जनता दलाच्या माध्यमातून राज्यात व्यापक लढा तीव्र करणार असून खासदार आमदार आणि मंत्री असंवेदनशील आहेत लोकसभा आणि विधानसभा सभागृहात दलित वंचित बहुजन मराठा आणि इतर घटकांच्या सामाजिक न्याय शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच वाली नाही असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले आहे हर घर बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमे अंतर्गत बहुजन जनता दल जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने आकाशवाणी चौक परिसरात आयोजित घर घर बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहीम चे उद्घाटन बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते
शिंदे आणि फडणवीस सरकारातील आमदार व मंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंडशाही हिटलर शाही आणि हुकूमशाहीच्या प्रकृतीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आमदार यांच्याकडून सहकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर दमदाटी व मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत लोकशाही फक्त नावाला राहिली असून दलित आणि दिनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार करून त्यांनाच बंदिस्त करण्याचा डाव आखला जात आहे गुलामगिरीच्या आणि व्यसनाच्या भयान संकटात आजचा युवा वर्ग भरत भटकला जात आहे दलित वंचित बहुजन समाज शिक्षण व विकासापासून कस दूर गेला आहे त्यांना बेघर सुद्धा केले जात आहे आणि या सर्व दलदलीत वंचित दलित बहुजनांचे मूलबाळ अडकविलेले जात आहे तेव्हा महाराष्ट्रात समानता व मानवता जिवंत राहण्यासाठी इंद्रकुमार मेघवाल हत्याकांड भ्रष्टाचार दलितांवर होणारे अन्याय अत्याचार युती आणि महिला वर बलात्कार करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करा घरगुती गॅस पेट्रोल डिझेल महागाईच्या दरवाढीबाबत संविधान बचाव भीमा कोरेगाव दंगलीतील तरुणावर गुन्हे दाखल झालेले ते त्वरित मागे घेण्यात यावे अवैधरित्या आणि खुलेआम व बेजबाबदारपने शस्त्र बागळणाऱ्या आर एस एस यासारख्या संघटनेवर बंदी घालुन त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी युवा बेरोजगारांना रोजगार भत्ता देऊन ओबीसी आरक्षणाची तरतूद लवकर जाहीर करावी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दापत्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात यावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेले वाटेगाव येथे त्यांचे स्मारक भव्य दिव्य बांधण्यात यावे. वीर पुरुष फकीरा साठे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत करावी दलित हत्याकांडातील आरोपीवर कारवाई करून त्यांना अटक करावी राज्यातील दलित हत्याकांडातील तुटताना राजने शासनाने मदत करावी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे बिहार आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावे ऑटोसिटी कायदा अंतर्गत विशेष बाबत व इतर देशव्यापी मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात अनेक प्रश्न घेऊन मनुवादी व जातीवादी सरकारला जाब विचारण्यासाठी बहुजन जनता दल राज्यस्तरीय आंदोलन लवकरच करणार अशी माहिती ही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *