मुंबई/धुळे:- आज देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात दलीत समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहे. दलीत समाजावर जातीवादी मानसिकतेने बहिष्कार टाकण्याचा पण संतापजनक घटना घडत आहे. त्यामुळे आज अनेक दलीत परिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात धुळे जिल्हात पोळ्याचा सणाच्या दिवशी घडलेल्या घटनांमुळे तर सर्व राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पँथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना यांनी धुळे येथील जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे म्हणून निवेदन दिले.
महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे असे म्हणत असलो तरी ते मात्र दिसत नाही. जातीवादी विचार फार मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. भय मुक्त समाजाची संकलपणा कुठे गेली? हा संशोधनाचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे अल्प असलेल्या दलीत वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
25 ऑगस्ट रोजी बैल पोळा साजरा होत असतांना गावातील जतिवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी दलीत तरुणांना अडवून बैल पोळ्यात घेऊन जाऊ नका या द्वेष भावनेने व जातीवादी मानसिकतेतून जबर मारहाण करून लाठ्या काठया, लोखंडी रॉडच्या साहाय्याने तरुणावर हल्ला केला होता. त्यानंतर स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन सर्व आरोपीवर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे परत आरोपींनी कायद्याचा गैरवापर करून उलट बौद्ध समाजाच्या तरुणावर 395 सारखा गंभीर गुन्हा दाखल केला. आणि गावातील दलीत वस्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. ही बाब गंभीर असून लोकशाहीला मारक आहे.
बौद्ध समाजाच्या तरुणावर पोलिस प्रशासनाने लावलेल्या कलमामुळे त्याच आयुष्य उद्धवस्त झाल आहे. ही कलम तात्काळ मागे घेऊन आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना रस्ता रोको आंदोलन करेल असे निवेदन यावेळी धुळे जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी चेतन इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष, चंद्रकांत मुळे महाराष्ट्र अध्यक्ष, कैलास वानखेडे महाराष्ट्र राज्य महासचिव, पृथ्वीराज नेटकर प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य, कैलास वानखेडे महाराष्ट्र राज्य महासचिव, दीक्षा गायकवाड उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, सिद्धार्थ रणदिवे धुळे जिल्हा संघटक, गौरव बिऱ्हाडे जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.