आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राने पुन्हा आमदार विरोधी शिक्षक संघर्ष पेटण्याची शक्यता

आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राने पुन्हा आमदार विरोधी शिक्षक संघर्ष पेटण्याची शक्यता

आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राने पुन्हा

आमदार विरोधी शिक्षक संघर्ष पेटण्याची शक्यता !

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी एक पत्र
मा.सरपंच/उपसरपंच/सदस्य, शालेय समिती अध्यक्ष/सदस्य, यांना लिहिले आहे. या पत्रानुसार दिनांक .०५ सप्टेंबर सोमवारी अर्थात शिक्षक दिनानिमित्त आपल्या गावांतील मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पुजन करणे बाबत विनंती त्यांनी केली आहे.
उपरोक्त विषयान्वये मी विधानसभा सदस्य या नात्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य तसेच शालेय समिती अध्यक्ष/सदस्य यांना विनंतीपुर्वक कळवू इच्छितो को, आपल्या गावांतील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांबद्दल येत्या दि.०५ सप्टेंबर रोजी अर्थात शिक्षक दिनानिमित्त गावांत मुख्यालयो राहत असलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांचे पुजन करुन, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विनंती आहे. तथापी जे शिक्षक मुख्यालयी राहत नसतील त्यांचे गावाच्या नांवासह माहिती prashantbumb111@gmail.com या माझे ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावी. असे पत्रात नमुद केले आहे.

पत्र व्यवहाराचा पत्ता: औरंगाबाद

तार कार्यालय पत्ता मु.पो. लासुर स्टेशन, ता. गंगापुर जि.

प्लॉट नं. 3-बी, छाबडा बिल्डींग गुरुद्वाराच्या समोर

सिंधी कॉलनी, जालना रोड, औरंगाबाद पीन 431005.

मुंबई कार्यालयाचा पत्ता (संपर्क)

दुरध्वनी (0240)2333435 फेंक्स (0240) 2343535.

महाराष्ट्र 423702.

क्र. 220.शवानी, आमदार निम्स

फंक्स (022)22886917

या पत्रा विरोधात प्रा.नरेंद्र लखाडे अकोला संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक जागर मंच यांनी जाहीर निषेध केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बन्सीलाल बंब या माथेफिरू आमदाराने महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या विरोधात आपल्याअकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गावागावातील सरपंचांना पत्र देऊन केले आहे. यापूर्वी त्यानी आपल्या विधानसभेच्या विखारी भाषणात घरभाडे भत्त्यासंदर्भात वक्तव्य केलेले आहे .माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला सुद्धा आहे की अशा प्रकारे शिक्षकांना अपमानित करणे आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर आहे का? जर तसे नसेल तर मग आतापर्यंत अशा माथेफिरू आमदाराला समज का देण्यात आली नाही? अन्यथा या आमदाराला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असेल तर तसे जाहीर करावे मग शिक्षक येणाऱ्या निवडणुकीत आपला निर्णय घेण्यासाठी मोकळे राहतील आणि त्याचे परीणाम पक्षाला नक्कीच भोगावे लागतील दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जे काम महाराष्ट्राच्या ग्रामविकास खात्याचे आहे ग्रामविकास मंत्री मुख्य सचिवाचे आहे ते काम नियमबाह्य पद्धतीने या आमदाराने हाती घेतले आहे असे सदरहू पत्रावरून दिसून येत आहे यामध्ये ग्रामविकास खात्याची भूमिका शिक्षण खात्याची भूमिका काय असावी हे सुद्धा नवीन तयार झालेल्या सरकारने लवकरच जाहीर करावे अन्यथा या महाराष्ट्रातील शिक्षक राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून या आमदाराला वठणीवर आणतील यामध्ये साशंकता नक्कीच नाही. ५ सप्टेंबर हा शिक्षकांना गौरवण्याचा दिन असताना अशा प्रकारची अविश्वासाची व्यवस्था या आमदाराने निर्माण करावी हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरांनी लिहिल्या जाईल . यामध्ये सरपंचांना आदेश देणाऱ्या या पत्रामुळे एखादा सरपंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सदर व आमदाराची तक्रार सुद्धा करू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही कायद्यामध्ये असे पत्र देणे बसणार नाही ही शक्यता पाहता सदर आमदारावर तातडीने कारवाई व्हावी यासंदर्भामध्ये लवकरच राज्यपाल विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री ग्रामविकास मंत्री यांना राज्यव्यापी निवेदने शिक्षकांनी पाठवावीत सादर करावीत व जाहीर निषेध शिक्षकदिनी नोंदवावा अशी नम्र विनंती मी सर्व शिक्षकांना करत आहे व या माथेफिरू आमदाराचा पुनश्च जाहीर निषेध करत आहे,

प्रा.नरेंद्र लखाडे अकोला
९८८११०८०१५
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक जागर मंच
सदर पत्र व शिक्षक संघटनेच्यावतीने काढण्यात आलेले पत्र जसेच्या तसे आम्ही वाचकांसाठी देत आहे. या पत्राची पुष्टी समर्थन व निषेध आम्ही करत नाही.
पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन मात्र या संघर्षांत” दीन “होणार आहे अशी शक्यता आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *