इचलकरंजी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशभर साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले. गेल्या अनेक वर्षांपासून लायन्स क्लबने गुणवंत शिक्षक पुरस्काराची परंपरा जोपासली आहे. कोणतेही अर्ज किंवा शिफारस न मागविता ही निवड करणेत येते. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व अधिक उंचावले आहे.
यावर्षीच्या लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठीची निवड कमिटी चेअरमन ला. गजानन होगाडे यांनी केली. यासाठी त्यांना ला. लिंगराज कित्तुरे व ला. सुरज दुबे यांचे सहकार्य लाभले. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष ला. महेंद्रकुमार बालर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली.
विविध शैक्षणिक विभागातून निवडण्यात आलेल्या गुणवंत शिक्षकांमध्ये महाविद्यालयीन विभागातून प्रा. डॉ. महेश यल्ल्लापा गुडीयावर (दत्ताजीराव कदम टेक्सटाइल अॅण्ड इंजिनीअरीग इन्स्टिट्यूट), उच्च माध्यमीक विभागातून श्री प्रा. कपिल प्रकाश पिसे (श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी.), माध्यमिक विभागातून श्री. मंगेश केशव खोत (सरस्वती हायस्कूल), प्राथमिक विभागातून सौ. अलका आप्पासो खोचरे (शेलार) (रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन) व बालवाडी विभागातून सौ. रुपाली संदिप थोरात (एकात्मिक बालविकास सेवा योजना, बालवाडी क्रमांक ५९), विशेष कला शिक्षक पुरस्कार श्री. विश्वराध्य महादेव होनमुर्गीकर (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी) यांचा समावेश आहे. या निवडी जाहीर झाल्यावर पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या आयोजित केलेल्या संचालक मंडळ मिटींगमध्ये हे पुरस्कार जाहीर केले यावेळी MJF ला. डॉ. विलास शहा, क्लबचे सचिव ला. सुभाष तोष्णीवाल, खजिनदार ला. संदिप सुतार, ला. लेडीज विंग चेअरमन सौ. कनकश्री भट्टड, लेडीज विंग कोर्डीनेटर सौ. कांता बालर विनय महाजन, ला. महेश सारडा, व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.