प्रबोधिनीत शांताराम बापूंना अभिवादन
इचलकरंजी ता. ३ समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांतारामबापू गरुड यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून संस्थात्मक प्रबोधनाचे जे काम उभे केले ते सर्वार्थाने बळकट करणे गरजेचे आहे . गेली तेहेतीस वर्षे नियमित सुरू असलेले ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिक आणि पस्तीस वर्षे सुरू असलेले ‘ प्रबोधन वाचनालय ‘या उपक्रमासह अनेक सातत्यपूर्ण उपक्रम विविध शाखांच्या माध्यमातून राबवून लोकप्रबोधनाचे काम सातत्यपूर्ण पद्धतीने समाजवादी प्रबोधिनी करत आहे. त्यामध्ये वैचारिक बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने सहभागी होणे हीच आचार्य शांताराम गरुड यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या अकराव्या स्मृतिदिनी अभिवादन करताना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी प्रकाशराव सुलतानपूरे यांच्या हस्ते आचार्य शांतारामबापू गुरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर, प्रा. रमेश लवटे ,अन्वर पटेल ,रामदास कोळी,डी.एस.डोणे, अजित मिणेकर,नौशाद शेडबाळे,सचिन पाटोळे,अशोक माने, सौदामिनी कुलकर्णी,नंदा हालभावी,अश्विनी कोळी,भीमराव नायकवडी आदी उपस्थित होते.