दीप पब्लिक स्कूल जयसिंगपूर मध्ये कृष्णा सहोदया अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा भव्य समारोह–
राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथे मंगळवार दिनांक 6-9-2022 रोजी कृष्णा सहोदया अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा साकारण्यात आला. या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून डॉ. मधुकर नायर यांची उपस्थिती लाभली. तसेच कृष्णा सहोदयाच्या सेक्रेटरी सौ. मिनल दीक्षित व कोषाध्यक्षा सौ. शारदा खोत यांची देखील उपस्थिती लाभली.
या भव्य सोहळ्यामध्ये एकूण पंचवीस शाळेच्या प्राचार्या व प्रत्येक शाळेचे आदर्श शिक्षक आले होते. सर्व आदर्श शिक्षकांचा अतिथी सत्कार करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरान्वित करण्यात आले. दीप पब्लिक स्कूल चे आदर्श शिक्षक म्हणून सौ. शहिदा शेख यांची निवड झाली. सर्व आदर्श शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अॅड.सोनाली मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या प्राचार्या सौ. नमिता जैन आणि मुख्याध्यापिका सौ. विद्या मशाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर मिष्ठान्न भोजनाने या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
दीप पब्लिक स्कूल जयसिंगपूर मध्ये कृष्णा सहोदया अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा भव्य समारोह-
