गावभाग येथील राहूल जगताप यांनी मोबाईल चा अतिवापर यावर हालता देखावा सादर
इचलकरंजी ता. ०७ सप्टेंबरः इचलकरंजीमधील गावभाग येथील वास्वव्यास असलेले राहूल जगताप व कुटुंबीयांनी मोबाईल चा अतिवापर यावर सामाजिक संदेश देणारा हालता देखावा सादर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामासाठी मुलांच्या हाती मोबाईल आला आणि मुले मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे गेम्स, सोशल मेडिया यामध्ये गुंग झाली तेंव्हापासून मुलांच्या हातातील मोबाईलचे व्यसन कमी होईना व याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिसून येत आहे. या मोबाईलच्या अतिवारामुळे मुलांची शारिरीक व मानसिक वाढ देखील कमी झाली आहे तसेच मुलांनी मैदानी खेळामध्ये सहभाग घेण्याचे अवाहन देखील केले आहे हे या देखव्याचे वैशिष्टये आहे.
गणेशोत्सव काळामध्ये ठिकठिकाणी अभिनव उपक्रम चालू आहेत याची दखल घेत जगताप कुटुंबीयांनी यावेळेचा गणेशोत्सव सामाजिक बांधीलकी जपत करण्याचा मानस केला सध्या प्रत्येक घरामध्ये मोबाईलच्या अतिवापरावरुन दररोज पालक व मुलांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत आणि या वादाने मुलांनी टोकाची भुमिका घेवून वाईट पाउल देखील उचलले आहे तसेच या वादाचे परिणाम मुलांची मानसिकता देखील बिगडवत आहेत हे चित्र आज संपूर्ण समाजासमोर उभे आहे यातून चांगला मार्ग निघावा या हेतूने जगताप कुटुंबीयांनी आपल्या घरामध्ये मोबाईलचा अतिवापर यावर एक चांगला संदेश दयायच्या हेतून हा देखावा सादर केला आहे व सदर देखाव्यास नागरिकांतून चांगला प्रतिसाद देखील येत आहे.
सदर देखावा पूर्णत्वास किरण लंगोटे, संजय जगताप, अविनाश दत्तवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
गावभाग येथील राहूल जगताप यांनी मोबाईल चा अतिवापर यावर हालता देखावा सादर
