11 सप्टेंबर रविवारी ठीक सकाळी 11 वाजता सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा महत्त्वपूर्ण निवारा हक्क मेळावा
मागील अनेक वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी आयटक कामगार संघटना सातत्याने आंदोलन करीत आलेली आहे. एक ऑगस्ट 2022 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागणीसाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली जिल्हा प्रशासकीय पातळीवर बैठक घेऊन घोषित केलेले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये ६५००० नोंदीत बांधकाम कामगार आहेत. ज्या बांधकाम कामगारांची घरकुले कच्ची आहेत किंवा अजिबातच नाहीत त्यांचा सर्वे करण्यात येऊन त्यांना शासकीय भूखंड देऊन घर प्रकल्प राबविण्यात येतील. अशी महत्त्वाची घोषणा कामगार मंत्री महोदयांनी केलेली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाचे निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने स्वागत करीत आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना घरकुले मिळण्यासाठी व घरासाठी जागा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करण्यासंदर्भात रविवारच्या मेलाव्यामध्ये बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे
या मेळाव्यास ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या महत्त्वपूर्ण मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारानी ठीक सकाळी 11 वाजता निवारा भवन डी मार्ट जवळ सांगली मेळाव्यास उपस्थित राहावे असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे यांनी प्रसिद्ध दिलेले आहे.
Posted inसांगली
11 सप्टेंबर रविवारी ठीक सकाळी 11 वाजता सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा महत्त्वपूर्ण निवारा हक्क मेळावा
