
कोल्हापूर : पॅंथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भाई इंगळे यांच्या आदेशानुसार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय मुख्य महासचिव संतोष आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध सामाजिक प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच संघटना वाढीच्या संदर्भात प्रयत्न करण्याचे एक मुखाने ठरविण्यात आले बैठकीच्या अध्यक्षांनी कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष माननीय टि के पाटील होते
यावेळी डॉक्टर शिवानंद कुंभार कर्नाटक राज्य संपर्कप्रमुख सौ चंदाताई पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी , त्रिबंक दातार जिल्हा कार्याध्यक्ष , उद्योजक महेश कांजरकर हातकलंगले तालुका अध्यक्ष कविता कांबळे आदी उपस्थित होते
स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष फिरोज मुजावर यांनी केले तर आभार महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वाती माजगांवे यांनी मानले