केनेल असोसिएशन कोल्हापूरच्यावतीने यूकेसी क्लबअंतर्गत श्वान नोंदणी कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर –
कोल्हापुरात जातीवंत श्वान पाळणाऱ्या शौकिनांची संख्या मोठी आहे पण यातील अनेक श्वान कोणत्याही क्लब कडे नोंदणी केलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या डॉग शोमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही. श्वानप्रेमींची ही गरज आणि वाढती मागणी लक्षात घेऊन कोल्हापुरात केनेल असोसिएशन कोल्हापूर ची स्थापना करण्यात आली आहे. युकेसी अर्थात युनायटेड कॅनल क्लब इंडिया यांच्याकडे या असोसिएशनची नोंदणी करण्यात आली असून युकेसीच्या माध्यमातून डॉग शोचे आयोजनही कोल्हापूरमध्ये करण्यात येणार आहे. या अंतर्गत कोल्हापुरातील श्वान प्रेमींसाठी नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर गोल्डन रिट्रीवर, यासारख्या विविध जातीच्या श्वानांची युकेसीकडे नोंदणी करण्यात आली. कोल्हापुरातील श्वानप्रेमींनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून युकेसीच्या डॉग शो मध्ये सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी युकेसीचे अध्यक्ष समरजित सिंग, सेक्रेटरी सतपाल पॉल यांच्यासह केनेल असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष अजित हरणे, सेक्रेटरी सौरभ तेंडुलकर, खजानिस मकरंद पाटगावकर, संग्राम नरके, आतिष मारोडा, समर्थ कशाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
केनेल असोसिएशन कोल्हापूरच्यावतीने यूकेसी क्लबअंतर्गत श्वान नोंदणी कार्यक्रम संपन्न
