अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2022 गडहिंग्लज मध्ये व्याख्यानाचे आयोजन.
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगकडून गडहिंग्लज नगरपरिषद सभागृहामध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2022 या विषयावरती व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा फायदा होणार आहे.दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सखोल,पूर्ण माहिती नसलेने विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार महाविद्यालय व विशिष्ट शाखेत प्रवेश घेणे शक्य होत नाही त्यासाठी हे व्याख्यान निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरू शकते.
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रजिस्टेशन करणे,प्रवेश अर्जावर भरावयाचे ऑप्शन,आपल्या मार्क्स नुसार कोणते महाविद्यालय मिळेल याचा अंदाज आणि गव्हर्मेंट कडून येणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्या या सर्व गोष्टींचा खुलासा या व्याख्यानातून केला जाणार आहे विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी विविध राऊंड मधून त्याने आपले ऑप्शन कसे भरावेत यासाठी निश्चितच व्याख्यान दिशादर्शक ठरू शकते तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा एस. टी. जाधव यांनी केले आहे व्याख्यान रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी गडींग्लज नगरपरिषद सभागृह गडिंग्लज याठिकाणी सकाळी 10.00 वाजता आयोजित केले आहे.
Posted inकोल्हापूर
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2022 गडहिंग्लज मध्ये व्याख्यानाचे आयोजन.
